मानवीय दलाली

दलाली विरुद्ध वेश्यावृत्ती दलाली म्हणजे वेश्यावृत्ती नव्हे. ते समानार्थी नाहीत. दलाली समजुन घेण्यासाठी, आपण दलालीला वेश्यावृत्ती पासून वेगळे ठेवू या. अनैतिक दलाली (निवारण) कायदा १९५६ (आय.टी.पी.ए) या आजच्या कायद्या प्रमाणे, जर एखाद्या व्यक्तिचे व्यावसायिक शोषण होत असेल तर तो अपराध आहे. जर महिला किंवा बालिकेचे लैंगिक शोषण होत असेल आणि कोण्या व्यक्तीला जर त्यामुळे फायदा किंवा नफा होत असेल, तर त्यास व्यावसायिक लैंगिक शोषण (सीएसई) म्हणतात. असे शोषण कायदेशीरीररित्या शिक्षापात्र आहे आणि तो अपराध मानला जातो ज्यात दोषी हा गुन्हेगार असतो. दलाली ही एक प्रक्रिया आहे ज्यात सीएसईसाठी एखाद्या व्यक्तिला कामाला लावणे, त्यासाठी ठेका/ कंत्राट घेणे, एखाद्याला विकत घेणे किंवा भाड्याने आणणे हे सर्व येते. म्हणून, दलाली ही एक प्रक्रिया असून सीएसई त्याचा शेवटचा टप्पा आहे. सीएसई मधील मागणी दलालीच्या व्यापाराला सुरुवात करते, वाढविते किंवा पूर्ण करते. हे एक भ्रष्ट चक्र आहे. दलाली ही काही वेगळ्या कारणांसाठीदेखील असू शकते जसे अश्लील सामग्रीच्या विकासासाठी, लैंगिक पर्यटनाच्या बढतीसाठी, पडद्याआडून होणा-या लैंगिक शोषणासाठी, मसाज पार्लर इ., किंवा शोषकांसाठी जेथे लैंगिक शोषण असते किंवा नसते. आय.टी.पी.ए. संकल्पनेत फक्त सीएसईमधील दलाली पाहिली जाते. व्यावसायिक वेश्यावृत्तीची कामे एका वेश्यालयातच होतील असे जरूरी नाही, तर ते घरामध्ये, गाडीत इ. मध्ये देखील होऊ शकतात. त्यामुळे आय.टी.पी.ए. संकल्पनेत पोलीसांना अशा प्रकारच्या परिस्थितीत घडत असलेल्या कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलण्याचा अशा प्रकारच्या सीएसई विरुद्ध कारवाई करण्याचा हक्क आहे. मग त्यात भिंतीआडच्या मसाज पार्लर, बारबाला, पर्यटन चक्र, सहायक सेवा, मित्र क्लब इ. चा देखील समावेश होतो. दलालीची व्याख्या दलालीची व्याख्या आय.टी.पी.ए.च्या वेगवेगळ्या विभागात पाहायला मिळते. विभाग ५ मध्ये वेश्यावृत्तीसाठी प्रवृत्त करणे, त्यासाठी भाग पाडणे किंवा त्यात एखाद्याला ढकलणे असे व्याख्येचे संदर्भ दिले आहे. या विभागाप्रमाणे, अगदी एखाद्याला प्रवृत्त करणे आणि त्याला वेश्यावृत्ती करण्यास भाग पाडणे किंवा त्यात त्याला बेमालूमपणे ढकलणेदेखील दलाली ठरते. म्हणून दलाली एक व्यापक विस्तार आहे. दलालीची सविस्तर व्याख्या गोवा बालक कायदा २००३ मध्ये आहे. जरी त्यात बाल दलालीवर भर दिला असला तरी त्यातील व्याख्या विस्तृत आहे. विभाग २ (झेड) मध्ये, “बाल दलाली” म्हणजे “कायदेशीर किंवा बेकायदेशीररित्या, कक्षेत किंवा कक्षेबाहेर, जबरदस्तीने किंवा एखाद्या दबावाखाली किंवा काही इतर कारणाने, पळवून नेऊन किंवा कारस्थान रचुन किंवा अधिकारांचा दुरुपयोग करुन किंवा असुरक्षित परिस्थितीत, किंवा कोण्या तिस-या व्यक्तिच्या फायद्यासाठी त्याच्या पैशाच्या व्यवहारांसाठी कोणत्याही व्यक्तिंस किंवा एका व्यक्तिस वेशावृत्तीसाठी प्रवृत्त करणे, भर्ती करणे, व्यापार करणे, परिवहन, हस्तांतरण, किंवा देवाण घेवाण करणे यांस दलाली म्हणतात ”. दलालीच्या अपराधात, मूळतः, निम्नलिखित तत्व आहेत : एखाद्या व्यक्तिचे एका समूदायातून विस्थापन. विस्थापन हे एका घरातून दूस-या घरात, एका गावातून दूस-या गावात, एका राज्यातून दूस-या राज्यात किंवा एका देशातून दूस-या देशात असू शकते. विस्थापन हे एकाच इमारतीत देखील असू शकते. ह्या उदाहरणाने समजण्यास सोपे होईल. गृहीत धरा की वेश्यालयाचा प्र्मुख ब-याच तरुणींना कैदेत ठेवून त्यांना ताब्यात ठेवतो आणि त्यांच्या बरोबर एखाद्या बाईची वयात येणारी मूलगी देखील राहत असेल आणि वेश्यालयाचा प्रमुख त्या बाईला तिच्या मूलीला सीएसईस लावण्यासाठी जोरजबरदस्ती करत असेल किंवा तिच्यावर त्यासाठी दबाव आणत असेल आणि मग त्या बालिकेला आईच्या समूदायातून वेशाच्या समूदायात विस्थापित केले जाते. अशा प्रकारचे विस्थापन हे समूदाय विस्थापनाचे उदाहरण आहे. दलाली केलेल्या व्यक्तिचे शोषण. आय.टी.पी.ए. आणि इतर कायद्यामध्ये दलाली करण्यात आलेल्या व्यक्तिच्या शोषणाची परिकल्पना केली गेली आहे. हे शोषण घोषित जसे वेशालयात, अप्रत्यक्ष किंवा मसाज पार्लर मध्ये, डान्स बार इ. मध्ये असू शकते. ज्यात हे एका वैध व्यावसायिक कामाच्या मुखवट्याअंतर्गत चालते. शोषणाचे व्यावसायीकरण आणि शोषीत व्यक्तिचे सह संशोधन. शोषीत व्यक्ति ही उपयोगी वस्तू म्हणून शोषली जाते (उल्लंघनाची विस्तृत यादी खालील धड्यात पहायला मिळेल). हे शोषण करणारे त्या शोषणातून पैसा मिळवतात. काही वेळेला ह्या पैशातील काही भाग हा शोषित व्यक्तिला दिला जातो. शोषीत व्यक्ति ज्याला ह्या पैशातील काही भाग मिळत असतो ती शोषीत व्यक्ति नेहमी गृहीत धरली जाते वा पकडली जाते/ तिच्या विरुद्ध अरोप पत्र सादर केले जाते आणि तिला शिक्षादेखील होते. दलालीच्या शोषितांना एकटे बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य देखील, शोषक ठरवतात, त्यांना सहयोगी म्हणून कधीच वागविले जात नाही. जरी तिला “कमाई” चा हिस्सा मिळत असला तरी, तथ्य असे आहे की दलाली करवून सीएसईसाठी आणलेल्या ह्या शोषितांच्या स्थितीत काही बदल होत नाही. दलालीचा संघटीत अपराध मानव तस्करी हा सर्वात वाईट ्गुन्हा आहे. दलाली ही एक गुन्ह्यांची पिशवीच आहे. ह्या पिशवीतून आपण अपहरण, पळवापळवी, अवैध पकडून ठेवणे, अवैध प्रसूति, आपराधिक त्रास, मार, लैंगिक शोषण, चारित्र्यहनन, बलात्कार, अनैसर्गिक अपराध, मानव तस्करी, गुलामी, गुन्हेगारी षड्यंत्र रचणे, त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे इत्यादी तत्वे बाहेर काढू शकतो. म्हणून, वेगळ्या ठिकाणी राहणारे वेगवेगळ्या वेळी हे एकाधिक अपराधी आणि शोषित दलालीचा संगठित गुन्हा करत असतात. मानव अधिकारांचे उल्लंघन जसे गोपनीयतेचा नकार, न्यायापासून वंचित करणे, न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेपासुन वंचित ठेवणे, मुलभूत अधिकार नाकारणे आणि व्यक्तीचा स्वाभिमान दुखावणे यासारखे गुन्हे हे शोषणाचे अन्य प्रकार आहेत. म्हणून, दलाली हा एक संघटीत अपराध आहे ह्यात काही संशय नाही. शोषित व्यक्ति आय.टी.पी.एचे संदर्भ (खासकरुन एस.५ आय.टी.पी.ए) आणि संबंधित कायद्यात, सीएसईसाठी दलाली करण्यात आलेली, वेश्यालयातील किंवा अन्य ठिकाण जेथे सीएसई राबविण्यात येते अशा जागांवरील शोषित व्यक्ति ही माणूस किंवा बाई आणि कोणत्याही वयाची असू शकते. व्यक्तिची दलाली करण्याच्या प्रयत्नालादेखील आय.टी.पी.ए मध्ये शिक्षा आहेत. म्हणून, व्यक्तिची शारिरीक दलाली होण्याआधी, कायदा लागू होतो. लहान मुल १८ वर्ष वय पूर्ण न केलेली व्यक्ति ही लहान मुल होय. दलाली करण्यात आलेल्या कोणत्याही असूरक्षित लहान मुलांना “संरक्षण आणि संगोपनाची गरज असते.” किशोर कायद्यांतर्गत (मुलांचे संरक्षण आणि देखभाल) कायदा, २०००(जेजे कायदा). कायदा प्रवर्तन संस्था अशा मुलांना वाचविण्यास, त्यांना बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यास आणि त्यांचे संरक्षण आणि संगोपन करण्यास कर्तव्य बांधील आहेत. शोषित प्रौढ प्रौढ व्यक्तिबद्दल सांगायचे झाले तर, व्यक्तिच्या सहमतीविरुद्ध अवैध व्यापाराची संभावना नाकारता येत नाही. जर सहमती दबावाने, बलात्काराने, काही धमकी देऊन किंवा जोर टाकून प्राप्त केली असेल तर सहमतीला काही अर्थ रहात नाही आणि म्हणून अशा घटनादेखिल दलालीत मोडतात. म्हणून अशा प्रौढ महिला जेव्हा वेश्यालयातून ‘वेश्यावृत्ती’ अंतर्गत ‘उचलतात’, त्यावेळी, जोपर्यंत ‘मनुष्यवृत्ती’ (उद्देश) शोधली जात नाही तोपर्यंत असे गृहीत धरता येत नाही की ती व्यक्ति गुन्हेगार आहे. जी महिला सीएसईसाठी दलाली करण्यात येते ती शोषीत असते, गुन्हेगार नाही. दलाल आणि इतर शोषक दलाली हा एक संघटीत गुन्हा आहे. ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या व्यक्ति असातात, (अ) भरतीला सुरुवात होते त्या जागा, (ब) दळणवळणाच्या जागा आणि (c) जेथे शोषण होते त्या जागा. म्हणून शोषकांची यादी खालील प्रमाणे असते : वेश्यालयाचा प्रमुख आणि वेश्यालयातील इतर दलाल किंवा शोषणाच्या मुख्य जागेवरील व्यक्ति ज्यात खालीलप्रमाणे व्यक्तिंचा समावेश होतो : वेश्यालयाची “मावशी” किंवा ‘डान्सबार’चा प्रमुख किंवा ‘मसाज पार्लर’चा प्रमुख किंवा अशा शोषणाच्या स्थळांचे अधिकारी जेथे शोषण घडते. अशा स्थळांवरील ‘अधिकारी’ आणि इतर पात्र. जेथे शोषण घडते तेथील हॉटेल व्यावसायिक किंवा हॉटेलमधील अधिकारी व्यक्ती, वेश्यालय म्हणून उपयोग झालेली स्थळे (एस.३.१. आय.टी.पी.ए), वेश्यालय म्हणून वापरण्यास दिलेल्या जागेचे मालक (एस.३.२. आय.टी.पी.ए), वेश्यालयात शोषित व्यक्तिला डांबून ठेवणा-या व्यक्ति(एस.६ आय.टी.पी.ए), आणि जे सार्वजनिक स्थळे वेश्याव्यवसायासाठी वापरण्यास देतात अशा व्यक्ति (एस.७.२. आय.टी.पी.ए) इत्यादींचा समावेश होतो. दलाली करुन आणलेल्या महिलेचे शोषण करणारा “ग्राहक” किंवा “शोषक”, निःसंशयीतपणे, शोषणकर्ता मानला जातो. ही ती व्यक्ति असते जी ‘गरज’ आणि सीएसई निर्माण करते, म्हणून आय.टी.पी.ए आणि इतर कायद्यांतर्गत अशी व्यक्ति गुन्हेगार मानली जाते. (विस्तारित माहितीसाठी प्रकरण ३.२.३. पहा). # निर्माता: दलालीच्या कामातील विविध टप्प्यांना वित्त पुरविणारे सर्व ह्या संघटनांचे हिस्सेदार आहेत. ह्यात पैशाने भागीदारी करणारे, दळणवळण, मुक्काम, निवास आणि वेश्यालयाला पैसा व्याजावर देणारे आणि घेणारे यांचा समावेश होतो. प्रोत्साहन देणारे जे प्रोत्साहित करतात आणि त्यास शोषणास सहाय्य करतात किंवा जे कोणत्याही प्रकारच्या दलालीत कोणत्याही कारणाने सहभागी होतात ते सर्व आय.टी.पी.ए अंतर्गत शिक्षापात्र आहेत. (भाग ३,४,५,६,७,९ आय.टी.पी.ए, आयपीसीचा धडा ५ ज्यात अपराधांना प्रोत्साहित करण्या विरुद्ध उपाय नमूद केले आहेत ते वाचावे) जे सीएसईच्या कमाईवर जगतात: कोणतीही व्यक्ति जाणतेपणी किंवा अजाणतेपणी वेश्याव्यावसायाच्या पैशांवर पुर्णपणे किंवा काही अंशी उदरनिर्वाह चालवत असेल तर तीदेखील गुन्हेगार ठरविली जाते. (एस ४ आय.टी.पी.ए). ह्यात अशा सर्व व्यक्तिंचा समावेश करण्यात येतो जे अशा प्रकारच्या अनाधिकृत शोषण व्यवसायाचे हिस्सेदार होतात किंवा त्यातून वाटा घेतात. जे वेश्यालयांना (किंवा हॉटेलांना) पैसा व्याजावर देतात किंवा घेतात आणि त्याचा व्यापार करतात अशा व्यक्तिदेखील या कायद्यांतर्गत गुन्हेगार ठरतात. हॉटेल व्यावसयिक जे मुलींच्या वेश्याव्यावसायातून नफा कमावतात असे लोक निःसंशयितपणे आय.टी.पी.ए अंतर्गत शिक्षापात्र आहेत. शोध घेणारे, भर्ती करणारे, विकणारे, विकत घेणारे, ठेकेदार, एजंट किंवा अशा व्यवसायासाठी काम करणारे कोणीही. दळणवळण करणारे, आयात-निर्यात करणारे आणि जे अशा व्यवसायांना जागा देतात ते सर्व ह्या कपटाचे भागीदार मानले जातात. सर्व कपटी जवळजवळ सर्व शोषित घटनांमध्ये, बहुतांश व्यक्ति ह्या कपटाच्या वेगवेगळ्या कारणांमुळे वेशाव्यावसायात समाविष्ठ झालेल्या अढळतात, अशा प्रकारे त्यांच्या विरुद्ध षडयंत्र रचले गेलेले असते. जर मनाच्या बैठकीतून विचार केला तर आपणाला ह्या कपटाचा कायदा (एस १३० बी आयपीसी) आकर्षीत करतो. आय.टी.पी.ए प्रमाणे, जे कपट करुन वेशाव्यावसाय करण्यासाठी आपली स्थळे वापरण्यास देतात (एस.३) किंवा जे ह्यावरील कमाईवर जगतात, भागीदारीत (एस.४), किंवा जे प्रोत्साहन देतात किंवा जबरदस्ती करतात किंवा व्यक्तिला वेश्याव्यावसायास भाग पाडतात (एस.५) असे सर्व कपटी मानले जातात. मुलांचा अनैतिक व्यापार फेब्रुवारी 1998 च्या आकडेवारीनुसार 200 बांगलादेशी मुले आणि स्त्रिया भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी स्‍वदेशी जाण्‍याची वाट पहात होते. (उंटाच्‍या शर्यतीत उंटाच्‍या पाठीवर बसण्‍यासाठी मुलांचा अनैतिक व्‍यापार केला जात असतांना त्‍यांची सुटका भारतातच करण्‍यात आली, www.elsiglo.com, 19 फेब्रुवारी 1998) भारत, थायलंड आणि फिलीपिन्स येथे एकूण मिळून शरीरविक्रियाच्या बाजारात सुमारे 1.3 लाख मुले आहेत. ही मुले गरीब घरांतून येतात आणि श्रीमंत लोकांसाठी अनैतिक कामे करतात. (सोमा वधवा, 'फॉर सेल चाइल्‍डहुड’, आउटलुक, 1998) सीमेभोवतालच्‍या क्षेत्रातील अनैतिक व्यापारात भारतामध्ये अनेक मुलांची राजरोसपणे ने आण केली जाते. (कार्यकारी निदेशक SANLAAP, इंद्राणी सिन्हा, ‘पेपर ऑन ग्‍लोबलाझेशन एण्‍ड ह्यूमन राइटस्’) दक्षिण आशियात पाठविण्‍यात येत असलेल्‍या 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्‍या मुलांच्‍या अनैतिक व्यापारासाठी भारत आणि पाकिस्‍तान मुख्य ठिकाणे आहेत. (मसाको आइजिमा, "एस एशिया अर्जड टू युनाइट अगेन्‍स्‍ट चाइल्‍ड प्रॉस्टिट्यूशन" रॉयटर, 19 जून 1998) 1996 मध्‍ये मुंबई येथील वेश्‍यागृहांमध्‍ये मोठे छापे घालून सुटका करण्‍यात आलेल्‍या 484 पैकी 40% मुलींना नेपाळहून आणले होते. (मसाको आइजिमा, "एस एशिया अर्जड टू युनाइट अगेन्‍स्‍ट चाइल्‍ड प्रॉस्टिट्यूशन" रॉयटर, 19 जून 1998) भारतात कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, आणि तामिळनाडु या राज्यांत वेश्याव्यवसायातील स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो. विजापूर, बेळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतून स्त्रिया मोठ्या शहरांत एका संघटित अनैतिक व्‍यापार समूहाच्‍या नेटवर्कचा एक भाग म्‍हणून स्‍थलांतरीत केल्या जातात. (सेंट्रल वेलफेअर बोर्ड, मीना मेनन, "दि अननोन फेसेस्") महाराष्ट्र आणि कर्नाटक जिल्‍ह्यांच्‍या सीमा ‘देवदासी पट्टा’ (देवदासी बेल्‍ट) म्‍हणून ओळखला जातो. ये‍थून विभिन्न पातळीवर अनैतिक व्यापार करण्‍यात येतो. येथील स्त्रिया वेश्याव्यवसायामध्‍ये असण्‍याचे कारण म्‍हणजे त्‍यांच्‍या पतींनी त्‍यांना सोडलेले असते किंवा त्‍यांना विश्‍वासघात व बलात्‍कार यांसारख्‍या प्रसंगातून वेश्‍या बनण्यास भाग पाडले जाते. पुष्‍कळशा देवदासींना वेश्याव्यवसायासाठी देवी यलम्‍माला समर्पित करतात. कर्नाटक येथील एका वेश्यागृहातील सर्व 15 मुली देवदासी आहेत. (मीना मेनन, "अननोन फेसेस्") शेकडो बांगलादेशी स्त्रिया आणि मुले परदेशी तुरूंगांत वर्षानुवर्षे डांबून ठेवलेली आहेत. भारतात 26 स्त्रिया, 27 मुली, 71 मुलगे आणि अज्ञात लिंगाची 13 मुले लिलुआ आश्रय, कोलकाता; शेहा आश्रय, कोलकाता; आनंदो आश्रम, कोलकाता; अलिपुर बाल गृह, दिल्ली, निर्मल छाया बाल गृह, दिल्ली; मुलांसाठी प्रयास निरीक्षण गृह, दिल्ली, तिहाड कारागृह, दिल्ली; उदवम् कलंजर, बंगलोर; उमर खादी, बंगलोर; किसलय, पश्चिम बंगाल, कुहेबिहार, पश्चिम बंगाल आणि बहरामपुर, पश्चिम बंगाल येथे डांबून ठेवली आहेत. (बांगलादेश नॅशनल विमेन लेयर असोसिएशनच्‍या फौजिया करीम फिरोज आणि सलमा अली) "बांगलादेश देश कंट्री पेपर: लॉ एण्‍ड लेजिसलेशन") भारतातून अनेक स्त्रिया आणि मुलांना दररोज मध्य-पूर्व राष्ट्रांमध्‍ये पाठविले जाते. भारत, पाकिस्‍तान आणि मध्‍यपूर्वेतील घरकाम करणार्‍या आणि वेश्याव्यवसायातील मुलींना यातना दिल्‍या जातात, कैदेत ठेवले जाते आणि बलात्‍कार करण्‍यात येतात. (इंद्राणी सिन्हा, SANLAAP भारत, ‘पेपर ऑन ग्‍लोबलिएशन एण्‍ड ह्यूमन राइटस्’) मुंबईमध्‍ये, 60,000 रुपये किंवा $ 2000 यूएस डॉलर्समध्‍ये 9 वर्षांपेक्षा कमी वयाच्‍या मुलांचा लिलाव करण्‍यात येतो. कुमारिकेशी शारीरिक संबंध ठेवल्‍याने गनोरिया किंवा सिफलिस नावांचे रोग बरे होतात असा अंधविश्‍वास ठेवणारे अरब लोक त्यांच्यासाठी बोली लावतात. (रॉबर्ट आय. फ्रेडमन, "इंडियाज् शेम: सेक्‍शुअल स्‍लेव्‍हरी एण्‍ड पॉलिटिकल करप्‍शन आर लीडिंग टू ऍन एडस् कॅटास्‍ट्रोफ, ‘द नेशन’ 8 एप्रिल 1996) 160,000 नेपाळी स्त्रियांना भारतातील वेश्‍यागृहात ठेवलेले आहे. (कार्यकारी संचालक SANLAAP, इंद्राणी सिन्हा, ‘पेपर ऑन ग्‍लोबलिएशन एण्‍ड ह्यूमन राइटस्’) सुमारे 50,000 किंवा मुंबईमधील वेश्याव्यवसायातील किमान अर्ध्‍या स्त्रियांना नेपाळहून आणले जाते. (रॉबर्ट आय. फ्रेडमन, "इंडियाज् शेम: सेक्‍शुअल स्‍लेव्‍हरी एण्‍ड पॉलिटिकल करप्‍शन आर लीडिंग टू ऍन एडस् कॅटास्‍ट्रोफ, ‘द नेशन’ 8 एप्रिल 1996) भारतातील वेश्‍यागृहांमधील 100000 ते 160000 नेपाळी स्त्रिया आणि मुलींना (म्‍हणजे सुमारे 35 टक्‍के) चांगली नोकरी देण्‍याच्‍या आमिषाने किंवा लग्‍न करण्‍याच्‍या खोट्या आश्‍वासनावर येथे आणलेले आहे. (राधिका कुमारस्‍वामी, यूएन स्‍पेशल रिपोर्ट ऑन व्‍हायोलंस अगेन्‍स्‍ट विमेन, गस्‍टावो कॅपडेलिव्‍हा, आईपीएस, 2 एप्रिल 1997) भारतामध्‍ये दररोज सुमारे 5,000-7,000 नेपाळी मुलींचा अनैतिक व्‍यापार केला जातो. 100,000-160,000 नेपाळी मुली भारतातील वेश्‍यागृहांमध्‍ये डांबलेल्‍या आहेत. सुमारे 45,000 नेपाळी मुली मुंबईतील वेश्‍यागृहांमध्‍ये आहेत आणि 40,000 कोलकातामध्‍ये आहेत. (विमेन्‍स ग्रुप्‍स् इन नेपाल, ट्रॅफिकिंग इन विमेन एण्‍ड चिल्‍ड्रन: द केसेस ऑफ बांगलादेश, pp.8 व 9, UBINIG, 1995) मुंबई ते पाकिस्तान पर्यंतच्‍या अनैतिक व्यापारासाठी कोलकाता एक महत्त्वाचे शहर आहे. 99% स्त्रियांना भूमार्गे जैसोर, सतखीरा आणि राजशाहीसारख्‍या बांगलादेश आणि भारताच्‍या सीमावर्ती क्षेत्रांतून बांगलादेशमधून बाहेर काढले जाते. (ट्रॅफिकिंग इन विमेन एण्‍ड चिल्‍ड्रन: द केसेस ऑफ बांगलादेश, pp.18 व 19, UBINIG, 1995) भारतातील आश्रयस्‍थानांमध्‍ये 200 बांगलादेशी स्त्रिया आणि मुलांचा अनैतिक व्यापार करण्‍यात आला आहे जे मायदेशी परतण्याची वाट पहात आहेत. (http://www.webpage.com/hindu/daily/980220/03/03200004.htm, 19 फेब्रुवारी 1998) यांतील वार्षिक स्‍वरूपात अनैतिक व्यापारासाठी भारतात आणलेल्‍या 5,000-7,000 नेपाळी मुलींचे वय मागील एका दशकात 14-16 वर्षे पासून 10-14 वर्षपर्यंत खाली आले आहे. (CATW - एशिया पॅसिफिक, ट्रॅफिकिंग इन विमेन एण्‍ड प्रॉस्टिट्यूशन इन द एशिया पॅसिफिक) मुंबईमध्‍ये, एका वेश्यागृहात फक्‍त नेपाळी स्त्रियाच आहेत ज्‍यांची खरेदी पुरुष त्‍यांच्‍या सोनेरी त्वचेसाठी आणि विनम्र व्यक्तिमत्‍वासाठी करतात. (रॉबर्ट आय. फ्रेडमन, "इंडियाज् शेम: सेक्‍शुअल स्‍लेव्‍हरी एण्‍ड पॉलिटिकल करप्‍शन आर लीडिंग टू ऍन एडस् कॅटास्‍ट्रोफ, ‘द नेशन’ 8 एप्रिल 1996) भारतातील वेश्यांमध्‍ये 2.5% नेपाळी आणि 2.7% बांगलादेशी आहेत. (देवदासी सिस्‍टम कंटीन्‍यूज टू लेजिटिमाइज प्रॉस्टिट्यूशन: द देवदासी ट्रेडिशन ऍण्‍ड प्रॉस्टिट्यूशन,’ TOI, 4 डिसेंबर 1997) काही भारतीय पुरुषांचा विश्वास आहे की डोक्‍याला एक्जिमा झाला असलेल्‍या वेश्येशी यौन संबंध ठेवल्‍याने सद्भाग्‍य येते. अशा प्रकारच्‍या रोगाने ग्रस्‍त असलेल्‍या ‘पस बेबीज्’ म्हणजे अर्भकांना त्‍यांचे आई-वडील चांगली मोठ्ठी रक्‍कम उकळून वेश्‍यागृहाला विकून टाकतात. (रॉबर्ट आय. फ्रेडमन, "इंडियाज् शेम: सेक्‍शुअल स्‍लेव्‍हरी एण्‍ड पॉलिटिकल करप्‍शन आर लीडिंग टू ऍन एडस् कॅटास्‍ट्रोफ, ‘द नेशन’ 8 एप्रिल 1996) एका उच्च वर्गीय हायस्‍कूलचे सर्वेक्षण करतांना असे आढळले की 70% विद्यार्थ्‍यांना संघटीत गुन्हेगारीमध्ये करियर करायचे आहे कारण त्यात ‘खूप पैसे आणि खूप मजा’ असते. (विद्यार्थी सर्वेक्षण, रॉबर्ट आय. फ्रेडमन, "इंडियाज् शेम: सेक्‍शुअल स्‍लेव्‍हरी एण्‍ड पॉलिटिकल करप्‍शन आर लीडिंग टू ऍन एडस् कॅटास्‍ट्रोफ, ‘द नेशन’ 8 एप्रिल 1996)
 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India