भगवा ध्वज आणि संत तुकाराम महाराज

तुळापुर येथील संभाजी महाराज यांच्या हातमधील भगवा ध्वज,गौतम बुध्द – सम्राट अशोक – वारकरी संप्रदाय – आणि शहाजीराजे यांचे स्वराज्याचे भारतीय निवासी यांचे प्रतिक आहे...तो हिंदू धर्माचा ध्वज नव्हे....सनातनी आर्य समाज यांचा स्वास्तिक चिन्ह असलेला काळा ध्वज आहे.

             भारत देशाला गौतम बुध्द यांनी भगवा ध्वज देऊन त्याचे चीवर म्हणून परिधान केले आहे.सम्राट अशोक यांनी संपूर्ण भारतात हा भगवा ध्वज भारतीय निवासी यांचा सन्मान म्हणून सर्वत्र पोहचविलेला आहे.त्याकाळी आर्य समाज वैदिक धर्म पंडितांचा ध्वज हा स्वस्तिक असलेला काळा ध्वज होता.त्यांचा आणि आपल्या भगव्या ध्वजाचा कोणताही संबध येत नाही.भगवान गौतम बुद्धापासून चालत आलेला भगवा ध्वज नंतरच्या काळात संत नामदेव महाराज यांनी वैदिक धर्म पंडितांच्या विरुध्द लढा उभारण्यासाठी वारकरी सांप्रदाय निर्माण करून तो भगवा ध्वज त्यांच्या हातामध्ये दिला.भारताच्या हिंदू संस्कृतीच्या परंपरागत तो भारतीय मुळ रहिवासी म्हणजे नागवंशी लोकांचे प्रतिक होते.शहाजीराजे मोगल साम्राज्यात असताना स्वराज्य संकल्पित ध्वज हा भगवा ध्वजच त्यांनी केला होता.आणि हा भगवा ध्वज शिवराय यांचे हाती स्वराज्याचे भगवे निशाण म्हणून दिला होता.संत तुकाराम महाराज यांनी हाच भगवा ध्वज हाती घेऊन स्वराज्य सेना निर्माण केली होती.नंतरच्या काळात पेशव्याने याच स्वराज्याचा भगवा ध्वजाच्या निशाणाखाली लाल महालावर शनिवार वाडा बांधून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास बुजवून त्यांचे विचार लपवून स्वत: राजा झाला होता.मात्र सिद्ध्नाक महार या स्वराज्याच्या सरदाराने भीमा कोरेगाव याठिकाणी लाल महालावर ताबा मारलेल्या शनिवार वाड्याच्या विरोधात भगवा ध्वज हातात घेऊन पेशवाई संपवून टाकली...आणि स्वराज्याचा भगवे निशाण पुन्हा लाल महाल म्हणून प्रस्तापित करणार तेव्हा वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी विचारांनी तो शनिवार वाड्यावरील भगवा ध्वज उतरून स्वत:च्या हाताने ब्रिटीशांचा कंपनी जॅक त्या लाल महालावर म्हणजे शनिवार वाड्यावर चढविला आणि स्वराज्याचा पाडाव पुन्हा एकदा या वैदिक धर्म पंडितांनी केला...आणि स्वराज्यातील शिवराय आणि संभाजीराजे यांचा इतिहास लपवून टाकला....मात्र भगवा ध्वज त्यानी कधीही हातामध्ये घेतला नाही.महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली आणि त्यांचे समतावादी विचार लोकामध्ये पोहचविण्यासाठी त्यांनी शिवरायांची जयंती उत्सव सुरु केला.यावरून लक्षात येते की,वारकरी संप्रदाय आणि शिवजयंती उत्सवामध्ये भगवा ध्वज हा काही वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी धर्माचे प्रतिक नव्हते.महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक धर्म स्थापन केला होता.तेव्हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी हिंदू धर्म स्थापन करून या भगव्या ध्वजावर ताबा मारण्याचे कार्य केले...आणि हा हिंदू धर्माचा ध्वज वाटावा म्हणून मोदक खाणारा गणपती याचा जन्म झाला.बाळकृष्ण गंगाधर टिळक यांनी हा भगवा ध्वज हिंदू धर्माचा आहे हे भासविण्यासाठी गणेश उत्सव सुरु करून या उत्सवाचे प्रतिक म्हणून भगवा ध्वज उभा केला.त्यानंतर संभाजी ब्रिगेड नावाची संघटना अस्तित्वात आली....आणि त्यांनी हा भगवा ध्वज हिंदू धर्मियांचा नसून समतावादी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा आहे असा प्रचार सुरु केला.हे पाहून सनातनी हिंदू धर्मीय पुन्हा गडबडले आणि त्यांनी तुळापुर आणि वढू येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ ताब्यात घेऊन त्याठिकाणी धर्मवीर संभाजीराजे यांचा पुतळ्यावर संभाजीराजे यांच्या हातातील भगवा ध्वज हिंदू धर्माचा असून छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी बलीदानी झाले असा खोटा प्रचार जोरात सुरु केला आहे.

                                                                                                       राजेश खडके
                                                                                              अध्यक्ष वतन बचाओ आंदोलन

संभाजी ब्रिगेडचे ७२ मावळे इतिहासातून गायब.....सर्वत्र आनंदोत्सव साजरा....!



छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येपासून...आपण “बलिदान” नावाची बाबच विसरलेलो आहे काय...?


जेम्स लेन नावाचा एक विदेशी लेखक होता,,,,त्याने “द हिंदू किंग इस्लामिक इंडिया” नावाचे एक पुस्तक लिहिले होते.या पुस्तकामध्ये माता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय यांचे बदनामीकारक लिखाण केले होते....लिखाण इतक्या खालच्या पातळीवर झाले होते की,जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला त्याचा संताप येणारच....आजच्या बोली भाषेत म्हणायचे झाले तर आपल्याला नुसते कोणी “तुझ्या आईला” असे म्हटले तरी प्रत्येक व्यक्तीचे मस्तक हलल्या शिवाय रहात नाही....आणि माता जिजाऊ तर स्वराज्याच्या माता होत्या…..त्यांच्या बदनामीचा राग तर प्रत्येकाला येणारच.....! विषय असा आहे की,भारतीय निवासी यांचेवर या ब्राह्मणी व्यवस्थेने पूर्वीपासून हल्ला केला आहे...त्रास दिलेला आहे.सामान्य जनता कुटुंबाच्या चौकटीतून बाहेर यायला तयार नाही.त्यांना स्वत:च्या आत्मबलावर विश्वास राहिलेला नाही.त्याने आपले जीवन तेहतीस कोटी देवांच्या हातामध्ये दिलेले आहे...त्या तेहतीस कोटी देवांच्या नावावर सर्व सामान्यांना वेड्यात काडून भरकटायला लावणारी ब्राह्मणी व्यावस्थेवर विश्वास ठेऊन आपल्या जन्म दिलेल्या आई पेक्षा तो अशा भुरट्या बामनावर विश्वास ठेऊन आपल्या जीवनाचे बलिदान करीत असतो.अश्या ब्राहमणी व्यावस्थेने असुरवंशीय बळीराजापासून ते गौतम बुद्धापासून ते छत्रपती संभाजी महाराज यांचे पर्यंत हत्या घडविलेल्या आहेत....आणि हत्या केल्या आहेत.महापुरुषांची बदनामी करणे हे त्यांचे “ब्रह्म अस्त्र” आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर याच अस्त्राचा भयानक वापर करून त्यांनी त्यांचे कर्तुत्व संपविण्याचा प्रयत्न केला होता.त्यांच्यावर याच मनुवादी विचारांनी तीन वेळा विषप्रयोग केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी विषप्रयोग करून हत्या केली अशा लोकांना संभाजीराजांनी हत्तीच्या पायाखाली देऊन काहींचा कडेलोट करून तर काहीना सुळावर चढवून शिक्षा दिली.मात्र याच लोकांच्या वंशजानी मनुस्मृतीनुसार संभाजी महाराजांना हाल हाल करून मारले.अशा लोकांचे अधिष्टान असणारा मोदक खाणारा गणपती आपला पूजक करून प्रत्येकाच्या घराच्या देवाऱ्यात नेऊन बसविला आहे.मग तो टिळकांचा असो किंवा भाऊ रंगारीचा असो......शेवटी संभाजी ब्रिगेडच्या सामजिक संघटनेचा पक्ष झालेल्या लोकांनी तुम्हा आम्हाला “सुखकर्ता आणि दुख:हर्ता” म्हणायला लावले आहे.ज्या गणपतीने स्वराज्य संपविले तुमच्या आमच्या पासून माता जिजाऊ – छत्रपती शिवाजी महाराज – संभाजी महाराज दूर केले.त्यांनाच आज आपण ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती म्हणून पुजत आलेलो आहे.सत्यनारायण महापूजा करून आपले जीवनातील स्वराज्यातील अस्तित्व आपण संपवीत आहोत.असे का घडले आहे...? आणि असे का घडत आहे...? याचा विचार कोणी करीत नाही.आपण “बलिदान” नावाची बाबच का विसरलो आहे...? हे मला आज कळायला मार्ग नाही.मी जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचला तो आत्मसात केला तेव्हा मला अक्षरशः रडू कोसळले.....माझे मन हेलावून गेले.त्याचे तसे कारणही आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येपासून...आपण “बलिदान” विसरलेलो आहे.शहाजीराजे यांनी पुणे प्रांतातील “नांगरवास” या गावी हत्तीच्या वजनाची तुळा करून त्याच्या वजना एवढे सोने चांदी गोरगरीब दुष्काळग्रस्त रयतेसाठी देऊन त्यांना मदत केली....आणि  तुळा केलेवरून याच “नांगरवास” गावाचे “तुळापुर” असे नामकरण झाले.आणि याच तुळापुरमध्ये शहाजीराजांनी स्वराज्य संकल्पित केले.त्यामुळे खरी स्वराज्यची पायाभरणी शहाजीराजांनी याच तुळापुर मध्ये केली होती...परंतु ब्राह्मणी व्यावस्थेने मुगल सरदार “मुरार जगदेव” या धर्म पंडिताने हत्तीच्या वजनाची तुळा केली असल्याचे जाहीर केलेले आहे.जर हा मुरार जगदेव एवढा रयतप्रिय होता.तर त्याने लाल महालावर हल्ला करून पुणे प्रांत बेचीराग कसा काय केला असा माझा प्रश्न आहे.त्यामुळे शहाजीराजे आणि स्वराज्याचा काहीही संबध येत नाही.शहाजीराजे मोघलांचेच फक्त मांडलिक कसे होते हे दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे.लाल महाल आणि दादोजी कोंडदेव यांचा कोणताही संबध नसताना पुणे महानगरपालीकेच्या वतीने बनावट उभा केलेल्या लाल महालामध्ये दादोजी कोंडदेव बनावट उभा करून माता जिजाऊची बदनामी करण्यासाठीच हा प्रकार केल्याचे इतिहासकार व संशोधक यांच्या समोर आले होते.याचाच फायदा घेऊन भांडारकर इतिहास संशोधन मंडळातील बारा धर्म वैदिक पंडितांनी अशी माहिती पुरविली की,दादोजी कोंडदेव हा छत्रपती शिवराय यांच्या कुटुंबातील अविभाज्य घटक आहे....आणि त्या लेखकाने तसे लिखाण त्याचे पुस्तक “द हिंदू किंग इस्लामिक इंडिया” यामध्ये केले आहे.आता हे पुस्तक इंग्रजीमध्ये आहे त्यामुळे सामान्य लोकांना ते लवकर समजणार नव्हते.छत्रपती संभाजी महाराज यांचेवर मनुवादी बामनानी केलेले अत्याचार आणि त्यांची औरंगाजेबाच्या माध्यमातून केलेली अमानुष हत्या त्यामुळे पुरुषोत्तम खेडेकर यांनी काही तरुण उभे करून तुळापुर येथील संभाजी महाराज यांचे समाधीला साक्ष ठेऊन “संभाजी ब्रिगेड” या नावाची संघटनेची स्थापन केली.याच संघटनेच्या ७२ कार्यकर्त्यानी भांडारकर इतिहास संशोधन मंडळावर हल्ला करून अशा बनावट इतिहासाची तोडफोड केली...त्या ७२ कार्यकर्त्यांना पोलिसांनी तोडफोड केल्याप्रकरणी अटक केली.ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली गेली.सदर विषयावर खूप मोठा उहापोह झाला त्या बारा बामनावर कारवाई करून सदरच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी जोर धरु लागली जनता कारवाई होण्याची वाट पहात होती. “संभाजी ब्रिगेड” च्या त्या ७२ कार्यकत्यांना आता लोक मावळे म्हणू लागली....त्यांची नोंद इतिहासाच्या पानामध्ये झाली.त्यानंतर सर्व ७२ मावळे जामिनावर बाहेर आले न्यायालयाच्या पायऱ्या चढणे उतरणे सुरु झाले.संभाजीराजांच्या छाव्यांनी दादोजी कोंडदेव या बनावट वैदिक धर्म पंडितांचा पुतळा लाल महालातून बाहेर काढून टाकला.आता वैदिक धर्म पंडित मुक्त लाल महाल झाला होता....आता खरा लाल महाल शोधण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.आताचा शनिवार वाडा पूर्वीचा लाल महाल होता असे पुरावे बाहेर येऊ लागले होते.शनिवार वाड्याला लाल महाल घोषित करा अशी मागणी पुढे येऊ लागली. भांडारकर इतिहास संशोधन मंडळावर झालेल्या हल्लेचा निकाल जाहीर झाला आणि संभाजी ब्रिगेडच्या ७२ मावळ्यांची निर्दोष सुटका करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.सर्वत्र आनंदोत्सव उत्सव साजरी करण्यात आला.परंतु हा आनंदोत्सव साजरी करण्याचा विषय नाही असे मला वाटते.त्याचे कारण असे की,जर यांची निर्दोष सुटका झाली असे म्हटले तर त्या बारा वैदिक धर्म पंडितावर कारवाई झाली पाहिजे होती.त्याची इतिहासात नोंद होणे आवश्यक होते....परंतु तसे झाले नाही.त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या ७२ मावळ्यांची निर्दोष सुटका होणे हा खरा इतिहास बुजविण्याचे कार्य झाले असल्याचे माझे स्पष्ट मत आहे.याचा अर्थ स्पष्ट असा आहे की,या ७२ मावळ्यांचे कार्य वाया गेले असल्याचे माझे मत आहे.जर या मावळ्यांना जर न्यायालयाने शिक्षा सुनाविली असती...तर त्याची इतिहासात नोंद झाली असती.परंतु निर्दोष मुक्तता म्हणजे त्या संभाजी ब्रिगेडचे ७२ मावळे इतिहासातून गायब होणे असा आहे.त्यामुळे अशा प्रकारचा सर्वत्र आनंदोत्सव साजरा करणे ही आनंदाची बाब नाही.म्हणून मी म्हणतो छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येपासून...आपण “बलिदान” नावाची बाबच विसरलेलो आहे.
 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India