वृषाली हटाळकर देशातील आठ भाषेतील लोकांच्या मनात ठसा उमठविणारी एक मराठी अभिनेत्री

वृषाली हटाळकर कोण ? असे जर मी म्हटले तर तुम्ही आश्चर्याने माझ्याकडे बघितल्याशिवाय राहणार नाहीत.आणि तुम्हाला विचार पडेल की,हा माणूस मराठी आहे काय ? तुमचे बरोबर आहे हा माझा प्रश्न नाही.काही पंजाबी तरुण माझे मित्र आहेत त्यांनी मला सांगितले की,वृषाली हमारे पंजाब से है,उसकी फिल्म “कॅनडा द फ्लाइट” हमने देखी है ! मग मी थोडासा आवक झालो ती मराठी असल्याचा माझ्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण झाला.सोशल मिडीयावर तिची माहिती घेऊ लागलो.माझी आणि वृषालीची फेसबुक मैत्री झाली मी तिच्या बरोबर ऑनलाइन बोलण्याचा विचार मनात केला आणि स्वत:च मनात पुटपुटलो की हे कलाकार आपल्या कामात व्यस्थ असतात काहीतर आपल्या सारख्या सामान्य माणसा बरोबर बोलत सुध्दा नाहीत मग वृषाली आपल्या बरोबर बोलेल काय ? असा मला प्रश्न पडला आणि मी तिला ऑनलाइनवरच हाय केले तिने थोडासा विलंब न करता मला तिने लगेच रिप्लाय दिला तेव्हा माझ्या लक्षात आले की ही मनमिळाऊ स्वभावाची आणि गर्व नसणारी कलाकार आहे.नंतर मी अधून मधुन तिच्याशी बोलू लागलो आणि मला पूर्ण विश्वास झाला की वृषाली ही एक मराठी कलाकार आहे.
तिने पंजाबी भाषेतच नाही तर तेलगु भाषेमध्ये “सागर” (अंधरी कोसम) भोजपुरी मध्ये “श्रीमान ड्रायव्हर बाबू” आणि सिंधी भाषेत एक गाणे केलं आहे.गुजराती व कन्नड भाषेत आगामी चित्रपट केला आहे.त्यामुळे देशातील आठ भाषेमध्ये काम करणारी अभिनेत्री म्हणून तिने चित्रपट क्षेत्रामध्ये एक ठसा तर उमठविलेलाच आहे,परंतु ती आज आठ भाषेतील लोकांची आवडती कलाकार आहे.त्यामुळे ती एक मराठी कलाकार आहे तिचा मला सार्थ अभिमान आहे.ती मोठ्या अभिमानाने सांगते की “मी एक मराठी कलाकर” आहे.





तिचा जन्म नाशिक येथे झाला आहे.तिचे बाबा मायको कंपनीत कामाला होते आणि आई गृहिणी आहे.तिला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे.तिचे शिक्षण पाचवी पर्यंत सटाणा तालुक्यातील लोहानेर याठिकाणी झाले आहे.त्यानंतर तिने गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला.कलाकार म्हणून खरी सुरुवात तिची येथूनच झाली आहे.शालेय जीवनात तिने सांस्कृतिक क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.दहावीच्या परीक्षेत तिला ७८ टक्के गुण मिळाल्यानंतर थोडासा कल तिचा बदलला तिच्यासह तिच्या कुटुंबियांना असे वाटले की तिने “सीए” म्हणून काम करावे.त्यासाठी तिने केटीएचएम महाविद्यालयात प्रवेश घेऊन वाणिज्य शाखेतून अभ्यासक्रम्रास सुरुवात केली.महाविद्यालयाच्या युथ फेस्टिव्हलमध्ये भाग घेत असल्यामुळे तिचा सराव चालूच होता त्यामुळे तिच्यातील कलागुण काही गप्प बसत नव्हते.स्थानिक वाहिनीच्या लहान मुलांच्या कार्यक्रमात ती सहभागी होत असल्याने तिला कॅमेरा समोर वावरण्याचे धाडस निर्माण झाले.नाशिक हे चित्रपट क्षेत्राचे आकर्षण असल्यामुळे नेहमी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी चित्रपट क्षेत्रातील विविध कलाकार आणि दिग्दर्शक याठिकाणी यायचे वृषालीला त्याठिकाणी प्रोडक्शन हेड म्हणून काम करण्याची संधी मिळायची त्यामुळे तिचा प्रत्येका बरोबर संपर्क होत होता.प्रसिध्द असणारे चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई नाशिकमध्ये “किसान” या चित्रपटाचे चित्रीकरण करीत होते.वृषाली आणि सुभाष घई यांची ओळख झाल्यामुळे चित्रीकरण करण्यासाठी एका दिवसात तिला एक सुंदर मुलगी आणण्यास घई यांनी सांगितले त्यामुळे ते लगेच शक्य होणार  नव्हते तसे तिने त्यांना सांगितलेही होते.दुसऱ्या दिवशी चित्रीकरणाचे काम सुरु झाले होते गर्दीतून त्यांनी वृषालीला हाक मारली आणि सीन करण्यास सांगितले तो सीन तिने उत्कृष्टपणे केला असल्याची शाबासकी देऊन तशी साक्षच सुभाष घई देऊन ती कलाकार असल्याची वृषालीचे जाणीव करून दिली आणि चित्रपट क्षेत्रात खऱ्या अर्थाने आगमन झाले.नंतर तिला राजीव पाटील यांनी “ब्लाइंड गेम” या चित्रपटात आयटम सॉग वर नृत्य करण्याची संधी दिली.त्यानंतर तिला अनेक चित्रपटात काम करण्याची संधी उपलब्ध झाली जसे “भरत आला परत”,”डम डम डिगा-डिगा”,”लग्नाची वरात लंडनच्या घरात”,”माझी आई” अशी तिची चित्रपट क्षेत्रात सुरुवात झाली.

     वृषालीचा अभिनय पाहता तिला चित्रपट क्षेत्रात चांगला वाव मिळत चालला आहे तिच्या चाहत्यांची गर्दी वाढत आहे.हिंदी चित्रपट “अनामिका” मध्ये छोटीसा अभिनय केला आहे.मकरंद देशपांडे यांचे बरोबर “तो येतो” या चित्रपटात काम केले आहे तो पुढील काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे.तसेच आगामी चित्रपट “रामकहानी” व “आभारान” यामध्ये वृषालीचा साजेशा अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे.












0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India