भगवा ध्वज आणि संत तुकाराम महाराज

तुळापुर येथील संभाजी महाराज यांच्या हातमधील भगवा ध्वज,गौतम बुध्द – सम्राट अशोक – वारकरी संप्रदाय – आणि शहाजीराजे यांचे स्वराज्याचे भारतीय निवासी यांचे प्रतिक आहे...तो हिंदू धर्माचा ध्वज नव्हे....सनातनी आर्य समाज यांचा स्वास्तिक चिन्ह असलेला काळा ध्वज आहे.

             भारत देशाला गौतम बुध्द यांनी भगवा ध्वज देऊन त्याचे चीवर म्हणून परिधान केले आहे.सम्राट अशोक यांनी संपूर्ण भारतात हा भगवा ध्वज भारतीय निवासी यांचा सन्मान म्हणून सर्वत्र पोहचविलेला आहे.त्याकाळी आर्य समाज वैदिक धर्म पंडितांचा ध्वज हा स्वस्तिक असलेला काळा ध्वज होता.त्यांचा आणि आपल्या भगव्या ध्वजाचा कोणताही संबध येत नाही.भगवान गौतम बुद्धापासून चालत आलेला भगवा ध्वज नंतरच्या काळात संत नामदेव महाराज यांनी वैदिक धर्म पंडितांच्या विरुध्द लढा उभारण्यासाठी वारकरी सांप्रदाय निर्माण करून तो भगवा ध्वज त्यांच्या हातामध्ये दिला.भारताच्या हिंदू संस्कृतीच्या परंपरागत तो भारतीय मुळ रहिवासी म्हणजे नागवंशी लोकांचे प्रतिक होते.शहाजीराजे मोगल साम्राज्यात असताना स्वराज्य संकल्पित ध्वज हा भगवा ध्वजच त्यांनी केला होता.आणि हा भगवा ध्वज शिवराय यांचे हाती स्वराज्याचे भगवे निशाण म्हणून दिला होता.संत तुकाराम महाराज यांनी हाच भगवा ध्वज हाती घेऊन स्वराज्य सेना निर्माण केली होती.नंतरच्या काळात पेशव्याने याच स्वराज्याचा भगवा ध्वजाच्या निशाणाखाली लाल महालावर शनिवार वाडा बांधून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास बुजवून त्यांचे विचार लपवून स्वत: राजा झाला होता.मात्र सिद्ध्नाक महार या स्वराज्याच्या सरदाराने भीमा कोरेगाव याठिकाणी लाल महालावर ताबा मारलेल्या शनिवार वाड्याच्या विरोधात भगवा ध्वज हातात घेऊन पेशवाई संपवून टाकली...आणि स्वराज्याचा भगवे निशाण पुन्हा लाल महाल म्हणून प्रस्तापित करणार तेव्हा वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी विचारांनी तो शनिवार वाड्यावरील भगवा ध्वज उतरून स्वत:च्या हाताने ब्रिटीशांचा कंपनी जॅक त्या लाल महालावर म्हणजे शनिवार वाड्यावर चढविला आणि स्वराज्याचा पाडाव पुन्हा एकदा या वैदिक धर्म पंडितांनी केला...आणि स्वराज्यातील शिवराय आणि संभाजीराजे यांचा इतिहास लपवून टाकला....मात्र भगवा ध्वज त्यानी कधीही हातामध्ये घेतला नाही.महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली आणि त्यांचे समतावादी विचार लोकामध्ये पोहचविण्यासाठी त्यांनी शिवरायांची जयंती उत्सव सुरु केला.यावरून लक्षात येते की,वारकरी संप्रदाय आणि शिवजयंती उत्सवामध्ये भगवा ध्वज हा काही वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी धर्माचे प्रतिक नव्हते.महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक धर्म स्थापन केला होता.तेव्हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी हिंदू धर्म स्थापन करून या भगव्या ध्वजावर ताबा मारण्याचे कार्य केले...आणि हा हिंदू धर्माचा ध्वज वाटावा म्हणून मोदक खाणारा गणपती याचा जन्म झाला.बाळकृष्ण गंगाधर टिळक यांनी हा भगवा ध्वज हिंदू धर्माचा आहे हे भासविण्यासाठी गणेश उत्सव सुरु करून या उत्सवाचे प्रतिक म्हणून भगवा ध्वज उभा केला.त्यानंतर संभाजी ब्रिगेड नावाची संघटना अस्तित्वात आली....आणि त्यांनी हा भगवा ध्वज हिंदू धर्मियांचा नसून समतावादी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा आहे असा प्रचार सुरु केला.हे पाहून सनातनी हिंदू धर्मीय पुन्हा गडबडले आणि त्यांनी तुळापुर आणि वढू येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ ताब्यात घेऊन त्याठिकाणी धर्मवीर संभाजीराजे यांचा पुतळ्यावर संभाजीराजे यांच्या हातातील भगवा ध्वज हिंदू धर्माचा असून छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी बलीदानी झाले असा खोटा प्रचार जोरात सुरु केला आहे.

                                                                                                       राजेश खडके
                                                                                              अध्यक्ष वतन बचाओ आंदोलन

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India