'उपभोग्य स्त्री म्हणून आयटम साँग करणार नाही'


'उपभोग्य स्त्री म्हणून आयटम साँग करणार नाही':  राधिका आपटे 

          
  मुंबई : चांगल्या विषयांच्या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेली, मराठी आणि बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिनं आयटम सॉंगबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
ज्या गाण्यांत स्त्रीला उपभोगाची वस्तु असल्यासारखे दाखवलं जातं, अशा गाण्यांत आपण आयटम गर्ल म्हणून काम करणार नाही, असं राधिकानं स्पष्ट केलंय. 

बॉलिवूडमध्ये आयटम सॉंग करण्याची इच्छा आहे का? या प्रश्नावर बोलताना राधिका म्हणते, 'आयटम सॉंगमध्ये नक्की काय आहे? यावर माझा निर्णय अवलंबून असेल. जर गाण्यातील दृष्यांत कमी कपडे घालून स्त्री फक्त उपभोगाची वस्तू असल्याचं दाखवण्यात येणार असेल तर, ते मी करणार नाही...'

फिल्म इंडस्ट्रीत अभिनेत्रींपेक्षा अभिनेत्यांना जास्त मानधन मिळते, याबद्दल राधिकानं रोष व्यक्त केलाय. जर अभिनेता आणि अभिनेत्री समान मेहनत करत असतील तर त्यांना मिळणारं मानधनही समान असावं, असं मत राधिकाने व्यक्त केलंय. 

ग्रामीण क्षेत्रातील महिला/युवती लाभार्थ्यांसाठी विविध विकास योजना rajesh khadke


नांदेड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे 2014-15 या आर्थिक वर्षात ग्रामीण क्षेत्रातील महिला, युवती यांच्यासाठी विविध योजना राबविण्याचे निर्धारित करण्यात आले आहे. या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव विहित अटी व शर्तीनुसार संबंधित गटविकास अधिकारी, प्रशिक्षण संस्था यांचेमार्फत मागविण्यात येत आहेत. या योजनांबाबतची माहिती...
दहावी व बारावी उत्तीर्ण ग्रामीण महिला, मुलींना एमएससीआयटी प्रशिक्षण 
(जिल्हा परिषद उपकर, विशेष घटक योजना, आदिवासी क्षेत्र उपयोजना व आदिवासी बाह्यक्षेत्र उपयोजना अंतर्गत )

कसा घ्याल लाभ...
•  संस्थेकडे एमएससीआयटी प्रशिक्षणाचा शासनमान्य परवाना असावा.
•  कमीतकमी दहावी पास असलेल्या ग्रामीण भागातील मुलीस, महिलेस प्रशिक्षण देणे बंधनकारक राहील. प्रशिक्षणार्थींचे रहिवाशी प्रमाणपत्र सरपंच, ग्रामसेवक यांचे असावे.
•  प्रशिक्षणार्थीच्या पालकांचे मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपयांच्या आत असावे किंवा दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव असावे.
•  प्रती प्रशिक्षणार्थी शासनाने विहित केलेले संपूर्ण शुल्क अनुदान देण्यात यावे.
•  कमाल मर्यादा प्रती लाभार्थी 4 हजार रुपये एवढी राहील.
•  मागासवर्गीय लाभार्थ्यांनी त्यांना सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडावी.
•  एमएससीआयटी प्रशिक्षण गतवर्षात म्हणजे सन 2013-14 मध्ये पूर्ण करणाऱ्या लाभार्थींना चालू वर्षात या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
•  यावर्षातच अभ्यासक्रम पूर्ण करणारे असावेत.
महिला/मुलींना शिलाई मशिन चालविण्याचे प्रशिक्षण (जिल्हा परिषद उपकर )

•  संस्थेकडे शिवणकाम प्रशिक्षणाचा शासनमान्य परवाना असावा.
•  ग्रामीण भागातील महिला/मुलींनाच प्रशिक्षण देणे बंधनकारक राहील.
•  प्रशिक्षणार्थींचे रहिवाशी प्रमाणपत्र सरपंच/ग्रामसेवक यांचे असावे.
•  प्रशिक्षणार्थी/पालकांचे मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपयांच्या आत असावे किंवा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असावे.
•  प्रती प्रशिक्षणार्थी शासनाने विहित केलेले 90 टक्के शुल्क अनुदान देण्यात यावे व 10 टक्के शुल्क लाभार्थ्यांने भरणा करावे.
•  अनुदानाची कमाल मर्यादा प्रती लाभार्थी पाच हजार रुपये एवढी राहील.
•  मागासवर्गीय लाभार्थ्यांनी त्यांना सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडावी.
90 टक्के अनुदानावर शिलाई मशीन पुरवणे

(जिल्हा परिषद उपकर, विशेष घटक योजना,आदिवासी क्षेत्र उपयोजना व आदिवासी बाह्यक्षेत्र उपयोजनेअंतर्गत)

कसा घ्याल लाभ...

•  विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समिती स्तरावर विहित मुदतीच्या आत सादर करणे आवश्यक आहे.
•  जिल्ह्याचे रहिवाशी प्रमाणपत्र सरपंच/ग्रामसेवक यांचे असावे.
•  सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र असावे.
•  सदरील महिला ही दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील किंवा त्यांचे वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपयांच्या आत असावे.
•  यापूर्वी या योजनेचा लाभ घेतले नसल्याचे प्रमाणपत्र सरपंच/ग्रामसेवक यांचे असावे.
•  लाभधारकांनी शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून शिलाई मशिनचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
•  शिलाई मशीन विक्री/हस्तांतर न करण्याबाबतचे हमीपत्र असावे.
•  लाभधारकांस 10 टक्के लाभार्थी हिस्सा साहित्य घेताना भरणा करावा लागेल.
चौथी ते दहावी शिकलेल्या ग्रामीण महिला/मुलींना कराटे प्रशिक्षण देणे ( जिल्हा परिषद उपकर )

•  संस्थेकडे कराटे प्रशिक्षणाचा शासनमान्य परवाना असावा.
•  ग्रामीण भागातील महिला/मुलींनाच प्रशिक्षण देणे बंधनकारक राहील.
•  प्रशिक्षणार्थींचे रहिवाशी प्रमाणपत्र सरपंच/ग्रामसेवक यांचे असावे.
•  प्रशिक्षणार्थी/पालकांचे मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपयांच्या आत असावे किंवा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असावे.
•  प्रती प्रशिक्षणार्थी अनुदानाची कमाल मर्यादा 600 रुपये एवढी राहील.
स्वयंरोजगार ( विशेष घटक योजनाअंतर्गत )

•  विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समितीस्तरावर विहित मुदतीच्या आत सादर करणे आवश्यक आहे.
•  जिल्ह्यातील रहिवाशी प्रमाणपत्र सरपंच/ग्रामसेवक यांचे असावे.
•  सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र असावे.
•  सदरील महिला ही दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील किंवा त्यांचे वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपयांच्या आत असावे.
•  यापूर्वी सदरील योजनेचा लाभ घेतले नसल्याचे प्रमाणपत्र सरपंच/ग्रामसेवक यांचे असावे.
•  व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्र ग्रामसेवकांचे असावे.
•  प्रति लाभार्थी 500 रूपये अनुदान.
विधवा महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी अनुदान

•  विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समिती स्तरावर विहित मुदतीच्या आत सादर करणे आवश्यक आहे.
•  जिल्ह्यातील रहिवाशी प्रमाणपत्र सरपंच/ग्रामसेवक यांचे असावे.
•  विवाह नोंदणी प्रमाणपत्र ग्रामसेवकाचे असावे.
•  सदरील महिला ही दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील किंवा त्यांचे वार्षिक उत्पन्न 50 हजारांच्या आत असावे.
•  यापूर्वी सदरील योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र सरपंच/ग्रामसेवक यांचे असावे.
•  पतीचे मृत्यू प्रमाणपत्र ग्रामसेवकांचे असावे.
•  प्रति लाभार्थी 2 हजार रुपये अनुदान.

या योजनांबाबत अधिक माहिती व तपशील गटविकास अधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालविकास) यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्या-त्या तालुक्यातील इच्छूक लाभार्थी, अर्जदारांनी संबंधित तालुक्यातील या यंत्रणांशी संपर्क साधावा.

-संकलन, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड
 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India