वाहनाने पुणे – मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाट्याजवळील शंकरवाडीच्या थांब्यावर अथवा रेल्वेने बेगडेवाडी स्थानकावर उतरावे. समोरच्या डोंगराच्या पायर्या चढून आपण येथील लेण्यांत पोहोचतो. हा अकरा लेण्यांचा समूह आहे. या लेण्यांच्या आसपास तब्बल २८ पाण्याची टाकीही खोदलेली आहेत. इसवी सनाच्या तिसर्या शतकाच्या अखेरीस किंवा चौथ्या शतकाच्या प्रारंभी ह्या लेण्यांच निर्मिती झाली असावी.
या लेणीसमूहात एकच चैत्यगृह आहे. ह्या दालनाची लांबी ७.७ मी., रुंदी ६ मी. आणि उंची २.५ मी. आहे. डाव्या भिंतीत तीन, उजव्या हातास चार तर मागील भिंतीत दोन अशा एकूण नऊ खोल्या या दालनाला जोडून खोदलेल्या आहेत.
येथील भिंतीवर ब्राम्ही लिपीतील एक शिलालेख आहे. आता या दालनाचेच श्रीघोरवडेश्वराच्या मंदिरात रुपांतर झाले आहे. आजुबाजूच्या पंचक्रोशीत हजारो लोक महाशिवरात्रीला येथे येतात.भर पावसात हिरवाळलेल्या डोंगर, त्यात असलेली रानफुले आणि हिवाळ्यात वार्यावर डुलणारे गवत, त्यात उठलेल्या लाटा हे सारे वारंवार पहावेसे वाटते.
0 comments:
Post a Comment