पुणे – दौंड मार्गे काष्टी – लिंपणगाव – पेडगांव असा प्रवास करत बहादूरगडास जाता येते. बहादूरगडास बहादूरगढी म्हणणे अधिक योग्य आहे. भीमा नदीच्या काठावरील उंचवट्यावर बांधलेल्या गढीत गावातून १० मिनीटे चालत जावे. छोटे प्रवेशद्वार व कशीबशी तग धरुन असलेली तटबंदी यातून आत प्रवेश करावा. लक्ष्मीनारायण व बाळेश्वर महादेव अशी दोन सुबक कोरीव काम केलेली देवळे आहेत. गढीमध्येच भैरवनाथ मंदिर आहे. बहादूरशाह कोकलताश या सरदाराचे या गढीत वास्तव्य होते. हाथी मोट, राहाण्याची घरे यांचे चुन्यात केलेले बांधकाम सुबक आहे. गढीबाहेरच शंकराच्या मंदिराजवळ जुन्या बांधकामाचे ५ बाय ४ असे घडवलेले दगड व प्रचंड मोठा ज्योताचा भाग आढळतो. सरदार घराण्यातील मृतांच्या समाधीस्थळांचे गुळगुळीत दगडातील बांधकाम आहे.
पावसाळ्यानंतर जानेवारीपर्यंत जाण्यास उत्तम काळ आहे.
0 comments:
Post a Comment