पर्यावरण विकासात सेवाभावी संस्था व जनतेच्या सहभागाची नितांत गरज असल्याचे पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांनी सांगितले.
पर्यावरण मंत्री संजय देवतळे व राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या उपस्थितीत मंगळवारी पर्यावरण विभागातर्फे विधान भवनात आयोजित धनादेश वाटप कार्यक्रमात स्थानिक पर्यावरण समस्यांशी निगडीत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित संस्था व व्यक्तींना धनादेशाचे वितरण करण्यात आले. त्यावेळी श्री.देवतळे बोलत होते. यावेळी पर्यावरण सचिव वल्सा नायर सिंग, पर्यावरण विभागाचे संचालक श्री.पाटील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

हरित संकल्पनेअंतर्गत पर्यावरण प्रकल्प राबविण्यासाठी निधीचे वितरण
हरित संकल्पनेअंतर्गत दख्खनच्या नैऋत्य भागातील (उस्मानाबाद जिल्ह्यातील)
वटवाघुळांच्या संवर्धनाबाबत योजना राबविण्यासाठी डॉ.महेश गायकवाड यांना
तीन लाख रुपये तर जयंतराव पाटील बहुउद्देशिय संस्था यांना अंमळनेर
तालुक्यातील प्लास्टिक कचरा व्यवस्थापन जनजागृतीबाबत योजना राबविण्यासाठी
दोन लाख रुपये, देवीकृपा महिला सेवाभावी संस्थेस अंबाजोगाई तालुक्यातील
प्लास्टिक कचरा व्यवस्थापन जनजागृतीसाठी दोन लाख रुपये या प्रमाणे पर्यावरण मंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.
तलावांच्या संवर्धनासाठी मुक्त करण्यात आलेला निधी- 597 लाख रुपये
मोतीराम तलाव, पेण (रायगड)- 125 लाख रुपये; कावंडळ तलाव, पेण (रायगड)- 125 लाख रुपये; व्ही.ए.घाटगे तलाव, कागल (कोल्हापूर)- 50 लाख रुपये; मालगुजारी तलाव, राजुरा (चंद्रपूर)- 115 लाख रुपये; खंडाळा तलाव, लोणावळा- 32 लाख रुपये; गांधीसागर तलाव, वरोरा (चंद्रपूर)- 100 लाख रुपये; कुरळप, ता.वाळवा, (जि.सांगली) येथील तलाव- 50 लाख रुपये.
अंमलबजावणी विषयक प्रस्ताव – 74 लाख रुपये
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ- 35 लाख रुपये, शिवाजी विद्यापीठ (दुर्मिळ वनस्पती संवर्धन)-10 लाख रुपये, शिवाजी विद्यापीठ (पाम वर्गीय वनस्पती संवर्धन)-10 लाख रुपये, पोस्ट ग्रॅज्युएट सेन्टर ऑफ बॉटनी (वातावरणीय बदल उपाययोजना)- कृष्णा महाविद्यालय- 10 लाख रुपये, ओयासिस (फुलपाखरु उद्यान प्रकल्प) -3 लाख रुपये, सेन्स सोसायटी (वटवाघुळ संवर्धन)- 3 लाख रुपये आणि प्रतिभा विश्वनाथ भराडे (सेंद्रिय शेती)- 3 लाख रुपये.
पर्यावरण सेवा योजना- 89.55 लाख रुपये
पर्यावरण
संवेदनशील व सजग भावी पिढी तयार करण्यासाठी तसेच निसर्गाच्या सान्निध्यात
प्रत्यक्ष कृतीच्या आधारे विषयाबाबत मुलांच्या मनात जागृती व चेतना निर्माण
करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना राबविण्यासाठी
89.55 लाख रुपये इतका निधी पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे यांना मुक्त
करण्यात आला.
राज्य शासनाच्या पर्यावरण विभागातर्फे पर्यावरणाविषयक व्यापक जनजागृतीसाठी लोकसहभागातून अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबविण्यात येतात. विविध योजनांसाठी सन 2012-13 या वर्षात मंजूर करण्यात आलेला निधी संबंधित व्यक्ती व संस्था यांना धनादेशाद्वारे वाटप करण्यात येतो.

0 comments:
Post a Comment