'आदिवासी
जनहिताय' हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विभाग कार्यरत आहे.
महाराष्ट्रातील दुर्गम व डोंगराळ भागातील आदिवासींच्या कल्याणासाठी सन 1983
पासून स्वतंत्र आदिवासी विभागाची निर्मिती झाली आहे. आदिवासींचा सामाजिक,
आर्थिक व शैक्षणिक विकास व्हावा, यासाठी हा विभाग सतत कार्यरत आहे. या
अनुषंगाने आदिवासी विभागाच्या काही रोजगारकेंद्रित योजना आहेत. त्यापैकी
काही योजनांची माहिती या लेखामधून देत आहोत.
पोलीस व सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र
राज्यातील अनुसूचित जमातीच्या सदृढ युवक / युवतींना राज्य पोलीस दल व लष्कर अथवा तत्सम विविध सुरक्षा दलात नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता राज्यात एकूण 9 ठिकाणी पोलीस तथ सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येते. त्या अनुषंगाने सद्यस्थितीत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक, नंदुरबार, राजुर, जव्हार, घोडेगाव, किनवट, धारणी, गडचिरोली व चंद्रपूर याठिकाणी प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. प्रशिक्षण एप्रिल ते जुलै, द्वितीय सत्र ऑगस्ट ते नोव्हेंबर व तृतीय सत्र डिसेंबर ते मार्च या कालावधीत देण्यात येते.

एका
प्रशिक्षण सत्रात 100 युवक व युवतींना प्रवेश देण्यात येतो. त्याकरिता
खालील अटी व शर्तींचे पालन होणे आवश्यक आहे. या प्रशिक्षण केंद्रात प्रवेश
घेण्याकरिता अनुसूचित जमातीच्या उमेदवारांस किमान 12 वी (उत्तीर्ण) अर्हता
असणे आवश्यक आहे.
1) अनुसूचित जमातीचा लाभार्थी असावा.
2) उमेदवाराचे वय 18 ते जास्तीत जास्त 23 वर्षे.
3) शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी पास.
4) शारीरिक पात्रता.
5) युवक उंची 165 से.मी., छाती 84 से.मी., न फुगवता 74 से.मी.
6) युवती उंची 155 से.मी., छाती 79 से.मी., न फुगवता .
आदिवासी प्रशिक्षणार्थींना जेवण, निवास, गणवेश, खेळाचे साहित्य, बुट, मोजे, अंथरुण, पांघरुण इत्यादी सुविधा मोफत पुरविल्या जातात.

मोटार वाहन चालक प्रशिक्षण केंद्र
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील वाहन चालक संदर्भातील रिक्त पदांचा अनुशेष भरुन निघावा व अवजड वाहन चालक परवानाधारक अनुसूचित जमातीच्या युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्यात परिवहन महामंडळ व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने पांढरकवडा व गडचिरोली येथे वाहन चालक प्रशिक्षण देण्यात येते.
उमेदवारांना मोफत निवास. उमेदारांना मोफत भोजन. उमेदवारांना मोफत प्रशिक्षण. उमेदवारांना खर्चासाठी रु. 450/- विद्यावेतन.
या केंद्रातील प्रशिक्षणार्थींना 6 महिन्याच्या कालावधीत तांत्रिक, अतांत्रिक चालक विषयक बाबींवर सखोल प्रशिक्षण देण्यात येते. तसेच प्रशिक्षणार्थ्यांकडून खाली नमूद केल्याप्रमोणे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देऊन सराव देण्यात येतो.
1) सरळ रस्त्यावरील चालन सराव 400 कि.मी.
2) गर्दीच्या ठिकाणी चालन सराव 100 कि.मी.
3) रात्रीच्या वेळी चालन सराव 200 कि.मी.
4) घाट रस्त्यावरील चालन सराव 100 कि.मी.
सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थींची वाहन चालन चाचणी यंत्र अभियंता (चालन) यांच्याकडून घेण्यात येते. चाचणीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांस पुन्हा 30 दिवसांचे प्रशिक्षण देऊन चाचणी घेण्यात येते. उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांची उपनिवड समितीद्वारे प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाते. या उपनिवड समितीद्वोर निवड करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेत सामावून घेणे बंधनकारक आहे.
संप्रदा बीडकर

0 comments:
Post a Comment