पालघर
जिल्ह्याकडे पर्यटनाचा एक नवीन पर्याय म्हणून बघितले जात आहे. या शहराला
निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्य बहाल केले आहे. पर्वत रांगा, धबधबे, तलाव,
पुरातन वास्तुकला, नयनरम्य सनसेट पॉइण्टस, आणि रेखीव मंदिरे या सुंदर आणि
शांत शहराला एक परफेक्ट डेस्टीनेशन बनवतात. पालघर जिल्हा उद्या १ ऑगस्ट
रोजी आपला पहिला वर्धापन दिन साजरा करीत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील
पर्यटन स्थळांची माहिती खास महान्यूजच्या वाचकांसाठी.... चला या पर्यटन
स्थळांना एकदा अवश्य भेट देऊन या निसर्गाचा आनंद लुटुया...
दाभोसा आणि दादरकोपरा धबधबा
जव्हार पासून 18 कि. मी. वर तलासरी-सिल्व्हासा रोडवर हे सुंदर धबधबे आहेत.
लेंडी नदीपासून वाहणारे पाणी डोगरांच्या दोन्ही बाजूने धबधब्याच्या रूपात
खाली येते. दाभोसा हा मुख्य धबधबा असून उंची 300 फूट इतकी आहे. दादरकोपरा
धबधबा हा उन्हाळ्यात कोरडा असतो म्हणून त्याला सुका धबधबा असेही म्हणतात.
दोन्ही धबधबे हे सुमारे 600 फूट उंच डोंगरांनी वेढलेले आहेत. या भागात अनेक
वनऔषधी वनस्पती आढळून येतात. फेब्रुवारी ते जुलै ही या धबधब्यास भेट
देण्यासाठी आदर्श वेळ आहे.
शिर्पामाळ
3 शतकांपेक्षा ही जुने असे हे शिल्प शिवरायांच्या स्मरणार्थ बांधले गेले
आहे. डोंगराच्या कडेवर असल्यामुळे शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी या भागाचा वापर
केला जात असे. या भागातून संपूर्ण जव्हार शहरावर दृष्टीक्षेप टाकता येतो.
सुरतच्या दिशेने कूच करताना शिवरायांनी याच भागत थांबून विश्रांती घेतली
होती. जव्हारचे त्यावेळचे राजे पहिले विमशहा यांनी छत्रपतींना मानाचा
शिरपेच देऊन जव्हारमध्ये स्वागत केले तेच हे ऐतिहासिक स्थळ. हिरव्यागार
टेकडीवर फडकणाऱ्या भगव्याचे दृष्य अत्यंत सुंदर दिसते. जव्हारमध्ये अजून
बरीच पर्यटन स्थळे आहे ज्यामध्ये दक्षिणमुखी मारूती मंदिर, वर्षभर सतत
वाहणारा काळ मांडवी धबधबा, सुंदर आणि शांत खदखद तलाव, शिवरायांनी बांधलेला
भोपाटगड किल्ला यांचा समावेश होतो.
जयविलास राजवाडा
जव्हारमधील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू असलेला हा वाडा ‘राज बरी’ या
नावाने सुद्धा ओळखला जातो. राजे यशवंतराव मुकणे यांनी बांधलेला हा राजवाडा
मुकणे घराण्याच्या राजाला राहण्यासाठी बांधला होता. येणाऱ्या शत्रूवर नजर
ठेवण्यासाठी हा वाडा डोंगराच्या माथ्यावर बांधला आहे. आदिवासी संस्कृती
दर्शवणारे कोरीवकाम, राजवाड्याची घुमटे आणि आजूबाजूला पसरलेले हिरवे जंगल
ही या राजवाड्याची वैशिष्ट्ये आहेत. गुलाबी दगडातून तयार केलेल्या या
अद्वितीय अशा वास्तुरचनेमुळे या वाड्याचा वापर अनेक फिल्म शूटस साठी केला
गेला आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत हा राजवाडा
पाहण्यासाठी खुला असतो. राजवाडा आतून पाहण्यासाठी माफक प्रवेश फी आकारली
जाते.
हनुमान पॉइण्ट
शहराच्या मध्यवर्ती भागापासून सुमारे 1 कि. मी. अंतरावर एक हनुमानाचे
प्राचीन मंदिर आहे. या पॉइण्टला हनुमान पॉइण्ट असे म्हणतात. तिन्ही बाजूने
वेढलेली खोल दरी, दाट जंगले, जवळच्या राजविलास राजवाड्याची प्राचीन घुमटे,
दूरवर दिसणारा ऐतिहासिक शहापूर माहोलीचा किल्ला आणि मोकळे आकाश असे
नयनरम्य दृष्य येथून दृष्टीस पडते. रात्रीच्यावेळी येथून दिसणारा,
कसाऱ्याच्या घाटातून जाणऱ्या ट्रेनचा प्रकाश एक वेगळाच अनुभव देऊन जातो.
सनसेट पॉइण्ट
जव्हारचा अजून एक प्रसिद्ध पॉइण्ट म्हणजेच सनसेट पॉइण्ट आहे. शहराच्या
मध्यवर्ती भागापासून पश्चिमेला फक्त अर्धा किमी वर हा पॉइण्ट आहे.
जोडप्यांचा लाडका असलेला हा पॉइण्ट सूर्यास्ताचे एक अप्रतिम दृष्य दाखवतो.
येथून दिसणाऱ्या दरीचा आकार हा धनुष्यासारखा आहे म्हणून पूर्वी या भागाला
‘धनुकमळ’ असे म्हणत. येथून 60 कि. मी. दूर असलेल्या डहाणू जवळच्या
महालक्ष्मी डोंगराचे सुंदर दृष्य दिसते. दरीमधल्या दाट गर्द झाडीवर पडणारी
सूर्य किरणे पाहण्याचा अनुभव शब्दात वर्णन न करता येण्यासारखा आहे.
शिरगाव
शांतनिवांत सागरतीर, किनाऱ्यावरच शतकानुशतकांचा इतिहास सांगणारा दुर्ग आणि
हिरव्यागार परिसराच्या कोंदणात वसलेलं शिरगाव हे मुंबई-ठाणेकरांसाठी एक
निसर्गरम्य ठिकाण आहे. ठाणे जिल्ह्यातल्या पालघर तालुक्याला शांतनिवांत
सागरतीर लाभला आहे. शिरगावचा किल्ला हा किनारी दुर्ग प्रकारातला असून तो
पालघरच्या पश्चिमेला आहे. पालघरपासून 7 ते 8 कि.मी. अंतरावर शिरगावचा
किल्ला आहे. शिरगावचा किल्ला पाहण्यासाठी आपल्याला प्रथम पालघरला पोहोचणं
आवश्यक आहे. पोर्तुगीजांनी बांधलेल्या शिरगावच्या किल्ल्यावर छत्रपती
संभाजीराजांनी इतर किल्ल्यांबरोबर हल्ला चढवला होता. पण तो त्यावेळी
ताब्यात घेता आला नाही. पुढे चिमाजी आप्पांनी उत्तर कोकणाच्या मोहिमेत
शिरगावचा किल्ला ताब्यात घेतला. गावाच्या मधोमधच किल्ला आहे.
पोर्तुगीजकालीन वैशिष्ट्यपूर्ण बांधणी आणि मनोऱ्यामुळे किल्ला
प्रथमदर्शनातच आकर्षून घेतो. पहिला दरवाजा पुर्वाभिमुख असून त्याच्या
बाजूने ओवऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या पुढे दुसरा दरवाजा आहे. दरवाजावरील
नक्षीकाम पाहण्यासारखं आहे. दोन्ही दरवाजांच्यामध्ये पहारेकऱ्यांच्या
देवड्या आहेत. दुसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामधील पडझड झालेल्या
वास्तू दिसतात. किल्ल्याचा आकार फारसा मोठा नसल्याने गडफेरीला फार वेळ लागत
नाही. तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. या पायऱ्यांवरून
तटबंदीवर पोहोचल्यावर प्रवेशद्वाराच्या वर बांधलेल्या घुमटाकृती मनोऱ्यावर
जाता येते. तटबंदीवरून किल्ल्याला फेरी मारता येते. पूर्वेकडील आयताकृती
मनोऱ्यावरून शिरगावचं मनोवेधक दृष्य दिसतं. गडाचा आकार छोटा असल्याने
बांधकामं आटोपशीर आणि कमी जागेत बसवलेली आढळून येतात. पश्चिमेकडील
बुरूजावरून अथांग सागराचे रमणीय दृश्य दिसते. या बाजुच्या तटबंदीमधे एक चोर
दरवाजाही आहे. किल्ल्यामधे असलेल्या ताडवृक्ष आणि त्यांच्या फांद्या सुंदर
दिसतात.
कसं पोहोचाल?
मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील मनोर येथून पालघरला रस्ता जातो. पालघर
रेल्वे स्थानकही आहे. शटल- मेल, लोकलने पालघरला जाता येते. तिथून शिरगावला
जाण्यासाठी एस.टीची सोय आहे. एस.टी. थांब्यापासून लगेच किल्ल्याजवळ पोहचू
शकतो.
गारेश्वर मंदिर वसई
तुंगारेश्वर पर्वताच्या कुशीत 2177 फुटांवर वसलेले हे महादेवाचे मंदिर फार
जुने व प्रसिद्ध आहे . वसई तालुक्यातलं हे ठिकाण येथील निसर्ग सौंदर्यामुळे
, धबधब्यांमुळे पर्यटकांचं हिवाळा व पावसाळ्यातलं खास आकर्षण बनलं आहे.
परशुरामाच येथे वास्तव्य होते. विमालासूर या राक्षसाने तपश्चर्येने शंकराला
येथे येऊन राहण्यास सांगितले व शंकराने दिलेल्या शिवलिंगाची स्थापना
विमालासूर या राक्षसाने येथे केली अशी आख्यायिका आहे. तुंगारेश्वर हा संजय
गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग आहे. परंतु मुंबई पासून थोडसं लांब
असलेलं हे ठिकाण कित्येक वर्षांपासून पर्यटकांचे मन रिझवत आहे. धबधब्याचा व
थंडगार वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी या स्थळाला नक्की भेट द्या.
जीवदानी मंदिर
सतराव्या शतकात म्हणजेच सुमारे 350 वर्षांपूर्वी मुंबईपासून 60 किलोमीटर
अंतरावर विरार येथे डोंगरावर जीवदान या किल्ल्याचा शोध लागला. तो पांडवांचा
असल्याचे मानले जात होते. तेथील एका गुहेमध्ये जीवदानी आई जी आदिशक्तीचे
स्वरूप आहे तिचा वास होता अशी मान्यता आहे. जीवदानी देवी ही 51
शक्तीपीठांपैकी एक आहे येथे रोज हजारो भाविक देवीचे दर्शन घ्यायला येतात.
ही देवी नवसाला पावते असा या भाविकांचा विश्वास आहे. या मंदिराला 1500
पायऱ्या आहेत. पायऱ्या न चढता येणाऱ्यांसाठी रोप वे ची सोय देखील उपलब्ध
करून दिलेली आहे. डोंगरावर पोहोचल्यावर थंड वातावरणात थकवा कुठच्या कुठे
पळून जातो. तसेच शांत वातावरणात देवीची आराधनाही व्यवस्थित करता येते.
नवरात्रीमध्ये तर हे मंदिर विशेष आकर्षण ठरते.
डहाणूचा किल्ला
सध्याच्या घडीला या किल्ल्यावर तहसलीदार कार्यालय थाटलेलं आहे. एकेकाळी या
किल्ल्याचा उपयोग व्यापारासाठी मोठ्या प्रमाणावर केला जायचा. आजही त्या
ठिकाणी त्याच्या काही खुणा दिसतात. किल्ल्याची रचना व मांडणी
व्यापारदृष्ट्या पूरक आहे.
कसे पोहोचाल?
पश्चिम रेल्वेने डहाणू स्टेशन गाठायचं. तिथून बसने 15 मिनिटात किल्यावर पोहोचता येतं.
तारापूरचा किल्ला
या किल्ल्याची मांडणी पाहण्यासारखी आहे. खाडीलगत असलेल्या या किल्ल्याचा
वापर मालमत्ता ठेवण्यासाठी केला जायचा. सध्या या किल्ल्याला कुलूप लावलेलं
आहे. परंतु आत जाण्यास काही अडचण येत नाही. किल्ल्याच्या आतमध्ये गोड्या
पाण्याच्या विहिरी आणि चिकू, नारळ यांच्या बागा पाहायला मिळतील. या
किल्ल्याच्या तटबंदीतून शत्रूवर गोळीबार केला जायचा. आजही ते झरोके
याठिकाणी पाहता येतील. तटबंदीवरून बिनदिक्कतपणे फिरता येईल इतका सुरक्षित
हा किल्ला आहे.
कसे पोहोचाल?
बोईसर या रेल्वे स्थानकावर उतरून किंवा एसटी स्टॅण्डवर उतरून या किल्ल्याकडे जाता येते.
शिरगाव किल्ला
वेगळ्या प्रकारची माडाची बने या किल्ल्यात पाहता येतील. हेच या किल्ल्याचे
मुख्य वैशिष्ट्य आहे. सात पानं असलेली ही माडाची बनं इतरत्र कुठेही आढळत
नाहीत. शिवाय किल्ल्याचे घुमटाकृती प्रवेशद्वार, आणि आतील रेखीव बांधकामही
पाहण्यासारखे आहे. किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था नसल्याने आपल्याजवळ मुबलक
पाण्याचा साठा असणं गरजेचं आहे.
कसे पोहोचाल?
पश्चिम रेल्वे स्थानकाच्या पालघर या स्थानकावर उतरून तिथून शिरगावला
जाण्याकरता बसची व्यवस्था आहे. 20 ते 25 मिनिटांचे अंतर पार करून या
किल्ल्याजवळ पोहोचू शकतो.
केळवे माहिम
केळवे माहिम हा किल्ला पाणकोट व भुईकोट या दोन्ही प्रकारांमध्ये आहे.
भुईकोट किल्ल्यात शितलाई देवीचं मंदिर आहे. येथून बीचवर सहजपणे जाता येतं.
या किल्ल्याचा आकार स्टार म्हणजे चांदणीसारखा आहे. किल्लाच्या लगतच सुरूचं
बन पसरल्यामुळे पर्यटकांची वर्दळ येथे मोठ्या प्रमाणावर असते.
पोर्तुगिजांनी बांधलेला हा किल्ला उत्तम कलाकृतीचा एक उत्कृष्ट नमुना
म्हणूनही ओळखला जातो. पाणकोट किल्ल्यात भरती ओहोटीची वेळ पाहूनच जावं
लागतं. पानबुडीसारखा आकार असलेला हा किल्ला 75 फूट लांब व 40 फूट रूंद असून
याची उंची 20 फुट आहे. बीचवर किल्ला असल्याने ओहोटीच्या वेळी किल्ल्यात
आतमध्ये चालत जाता येतं. आतमध्ये गेल्यावर आठ झरोके पाहायला मिळतील. या
झरोक्यामधून दांडा खाडीवर नजर ठेवली जायची. त्याकरता खास हा किल्ला
बांधण्यात आला होता. दांडा खाडीलगत त्या काळात जवळपास 17 किल्ले होते आज
त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच किल्ले शिल्लक आहेत.
अर्नाळा
संपूर्ण नारळाच्या झाडांनी हे बेट व्यापलेलं आहे. बेटाच्या पश्चिम टोकावर किल्ला असल्याने भर वस्तीच्या बोळातून किल्ला गाठायचा.
अर्नाळा किल्ल्याचं भक्कम प्रवेशद्वार पाहून किल्ल्याच्या बांधकामाची
कल्पना येते. या महाद्वारावर व्यास किंवा व्याघ्र आणि हत्ती यांची सुबक
शिल्पं कोरलेली आहेत. समोरच्याच कमानीवर वेली-फुलांची बुट्टी आपल्याला
खिळवून ठेवते. उत्तराभिमुख असलेल्या या प्रवेशद्वारावर देवनागरीमध्ये शके
1659 मधला शिलालेख लिहिलेला आहे. इथून आत गेल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या
दिसतात. उजव्या हातालाच साधारण दहा फुटांवर छोटी देवडी दिसते. ही देवडी
थेट प्रवेशद्वारावरील तटरक्षकांच्या इथे मिळते. संरक्षणाच्या योजनेचा एक
मोठा नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो.
मुख्य गडात प्रवेश केल्यावर समोरच प्रशस्त शेती दिसते. या आखीव शेतीमुळेच
गडाचं रूप खुलून दिसतं. सरळ पुढे चालत गेल्यावर उजव्या हाताला कौलारू
घरासारखा दर्गा आहे. तर डाव्या हाताने चालत गेल्यास पूवेच्या तटाजवळ
त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच टुमदार वटवृक्ष असल्याने
इथे थोडा वेळ बसून विश्रांती घ्यायला हरकत नाही. इथे समोर गोड्या पाण्याचा
तलाव बांधून घेतलेला आहे. तर तटांवर उत्खननात सापडलेल्या गणेशाच्या
मूतीर्ची स्थापना केलेली आहे. इथूनच मागे वळून तटाच्या आतील बाजूने तटांवर
जाण्यास पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी तटांवरच्या फेरीस सुरूवात करायची.
एकूण नऊ बुरूज असलेला आणि तीन प्रवेशद्वार असलेला हा किल्ला इतिहासात
स्वत:च वेगळं अस्तित्व ठेवून आहे.
या जलदुर्गाची उभारणी गुजरातच्या सुलतानाने इ.स. 1516 मधे केली. पुढे 1530
मधे हा किल्ला पोर्तुगिजांनी आणि त्यानंतर 1737 मध्ये मराठ्यांनी जिंकला.
या जलदुर्गाच्या रक्षणासाठी मराठ्यांनी दोन हजारी सैन्य गडावर ठेवलं होतं.
असे दाखले इतिहासात सापडतात.
कसे पोहोचाल?
पश्चिम रेल्वेचं विरार रेल्वे स्टेशनवर जायचं. विरारपासून 14 किमीवर
अर्नाळा कोळीवाडा आहे. तिथे बससेवा चांगली आहे. किंवा वसईहूनही अर्नाळ्याला
जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला बसेस आहेत.
वसईचा किल्ला
चिमाजी आप्पांनी मिळवलेला वसईचा विजय ही घटना मराठ्यांनी भारतातून
पोर्तुगीज सत्तेचे उच्चाटन करण्याचा जो संकल्प केला होता, त्यापैकी एक
महत्त्वाचा टप्पा होय. म्हणूनच आजही या ऐतिहासिक प्रसंगाची आठवण
भारतीयांच्या हृदयास तीव्रतेने जाऊन भिडते. समृद्ध अशी ऐतिहाससिक
पार्श्वभूमी लाभलेला हा किल्ला व्यवस्थितपणे पाहण्यासाठी हातात किमान दोन
दिवस हवेत. नाहीतर घाईघाईत हा किल्ला नीटपणे पाहता येणार नाही. वसई किल्ला
जिंकल्यावर चिमाजी आप्पांनी किल्ल्यात 27 जुलै 1739 रोजी मारूतीच्या
मूर्तीची स्थापना केली. इतकंच नव्हे तर चिमाजी आप्पांनी विजयासाठी वगोश्वरी
देवीस नवस केला होता. त्याप्रमाणे विजय मिळाला. मग पेशवे बाळाजी बाजीराव
यांनी वगोश्वरीचे देऊळ बांधले. त्याचबरोबर चिमाजी आप्पांचा पुतळा, वगोश्वरी
देवीचं मंदिर, नागेश्वरी मंदिर, बाजारपेठ, तलाव, अनाथालय, भुयारं अशी
नानाविध आकर्षणे या किल्ल्यावर असल्याने हे सर्व पाहण्यासाठी व
अनुभवण्यासाठी गाठीशी किमान दोन दिवस हवेत.
डहाणू – बोर्डी बीच व महालक्ष्मी
डहाणू हे समुद्रकिनाऱ्याला लागूनच विस्तारलेले शहर आहे. डहाणू ते बोर्डी
असा 17 किलोमीटरचा किनारा विस्तारला आहे. डहाणूला स्वच्छ, सुंदर व शांत
समुद्रकिनारा लाभला आहे. मत्स्यव्यवसाय, फळे, भाज्या व चीकू यासाठी डहाणू
प्रसिद्ध आहे. येथून जवळच डहाणूचा किल्ला आहे. डहाणूवरूनच आपण नरपडचा
समुद्रकिनारा तसेच येथून 27 कि.मी. अंतरावर असलेल्या उंच डोंगरावरील श्री
महालक्ष्मीचे जागृत स्थानही पाहू शकतो. डहाणूचीमहालक्ष्मी देशातल्या
एकावन्न शक्तिपीठांपैकी एक आहे. डहाणू फळझाडांच्या रांगांनी सजलेले आहे.
चिक्कूसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
महालक्ष्मीची यात्रा चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून कृष्णपक्षातील
अष्टमीपर्यंतमंदिराच्या सभोवती असलेल्या विशाल मैदानात भरते. डहाणू
तालुक्यातील बोर्डीयेथे उदवाडा हे पारशी लोकांचे पवित्र स्थळ आहे. डहाणू
रेल्वे स्थानकापासून 15 कि.मी. अंतरावर बोर्डी बीच आहे. हा अतिशय शांत व
सुरक्षित बीच आहे. तसेच डहाणू आगर येथील केवडावंतीचे मंदिर व हनुमान मंदिर
ही मंदिरे प्रसिद्धआहेत.
पालघर जिल्हयातील डहाणू-बोर्डीचे समुद्रकिनाऱ्यंना रेल्वे किंवा बसमार्गाने
जातायेते. बोर्डी येथे एम.टी.डी.सी. चे निवासस्थाने उपलब्ध आहेत.
-मनीषा पिंगळे
जिल्हा माहिती अधिकारी, पालघर
रत्नागिरीतले नव्या स्वरुपातील मत्स्यालय बनले…फेव्हरेट टुरिस्ट डेस्टिनेशन
रत्नागिरी म्हटले की, डोळ्यासमोर येतो लांबच लांब भाट्ये आणि मांडवीचा सागरी किनारा… समुद्राच्या लाटा झेलत ताठपणाने उभा असलेला रत्नदुर्ग...देशभक्त लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान... स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पदस्पर्श लाभलेले पतितपावन मंदीर... इंग्रज काळातील बंदिवान राजाची स्मृती जागविणारा थिबा पॅलेस... पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या या यादीत आणखी एका नाविण्यपूर्ण ठिकाणाची भर पडली आहे ती म्हणजे दापोलीच्या डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या मत्स्यालय आणि संग्रहालयाची. गोड्या पाण्यातील व सागरी जीवनाची सफर घडविणारे हे ठिकाण आता फेव्हरेट टुरिस्ट डेस्टिनेशन ठरत आहे.
रत्नागिरीत सागरी जीवसृष्टीची ओळख करुन देणारे हे संग्रहालय यापूर्वीही कार्यरत होते. परंतु काही कारणास्तव त्याचे स्थलांतर झाल्याने आता रत्नागिरी शहरातील झाडगाव येथील नयनरम्य परिसरात ते नवीन वैशिष्ट्यांसह पुन्हा पर्यटकांच्या सेवेत कार्यरत झाले आहे. येथील मत्स्यालयात गोड्या व खाऱ्या पाण्यातील शोभिवंत मासे व पान वनस्पती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. गोडे पाणी विभागात 28 टाक्यांमध्ये अरोवाना, डिस्कस, कॅट फिश, टेट्रा, फ्लॅावर, सिल्व्हर शार्क आणि खारे पाणी विभागात 26 टाक्यांमध्ये मोनोअँजेल, केंड, बटरफ्लाय, लायन, निमो, गोबरा अशा विविध जातींचे मासे पाहायला मिळतात. गेल्या 50 वर्षांपासून जोपासलेली दोन जातीची समुद्री कासवेही मत्स्यालयाचे आकर्षण ठरत आहेत. तसेच 350 वेगवेगळ्या जातीची शास्त्रीय पद्धतीने रसायनामध्ये संग्रहीत मासे विद्यार्थी, संशोधकांसह पर्यटकांना सागरी जीवांची अधिक व्यापक पद्धतीने ओळख करुन देतात.
संग्रहालयातील 55 फुट लांब व 5 टन वजनाचा देवमाशाचा सांगाडा सागरी जीवांच्या भव्यतेची कल्पना पर्यटकांना करुन देतात. सागरी व गोड्या पाण्यातील मत्स्य जीवनाची शास्त्रीय पद्धतीने ओळख करुन देणारे मत्स्यालय आणि संग्रहालय हे विद्यार्थी, संशोधक, शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी महत्वाचे माध्यम ठरत आहे.

अवघ्या सात महिन्यात एक लाखाच्यावर पर्यटकांची भेट
मत्स्यालय आणि संग्रहालय नव्या स्वरुपात 11 डिसेंबर 2014 पासून कार्यरत झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यातच महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश येथील पर्यटकांचा ओघ याठिकाणी सुरू आहे. यामुळे गेल्या सात महिन्यात मत्स्यालयास भेट देणाऱ्या पर्यटकांचा आकडा एक लाखाच्यावर पोहोचला आहे.
पर्यटकांच्या वाढत्या ओघाबाबत बोलताना केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. हुकुमसिंह ढाकर सांगतात, पर्यटकांना याठिकाणी सागरी जीवनाबाबत शास्त्रीय माहिती सहज-सोप्या पद्धतीने सांगितली जाते. विविध शोभिवंत मासे, सागरी जीव यांच्या आकर्षक मांडणीमुळे मत्स्यालय पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे. येत्या काळात पर्यटकांची संख्या वाढतच राहणार असून त्यांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
निसर्गरम्य सागरी किनारा लाभलेल्या रत्नागिरी शहरात सागरातील जीवसृष्टीची माहिती देणारे हे केंद्र स्थलांतरानंतर अधिक प्रेक्षणीय आणि ज्ञानवर्धक ठरले आहे. त्यामुळेच पर्यटकांची पावलेदेखील सहजपणे या ठिकाणाकडे वळत आहेत. चला मग येताय ना ... सागरी जीवनाची अद्भुतरम्य सफर करण्यासाठी.
-विजय कोळी
प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.
वनडे टुरिझम डेस्टिनेशन; अमरावती
पर्यटनासाठी शॉर्ट टर्म टुरिझम किंवा वन डे पिकनीक हा हल्लीचा ट्रेंड आहे. अमरावती हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असा जिल्हा आहे. यामध्ये प्रामुख्याने मेळघाट, चिखलदरा याठिकाणी पर्यटक जाण्यासाठी उत्सुक असतात. परंतु या जिल्ह्यात अनेक अशी धार्मिक व प्रेक्षणीयस्थळे आहे जिथे एका दिवसात वनडे पिकनीक उत्तम करता येऊ शकते.
महानुभाव पंथाची काशी असलेल्या रिद्धपूर येथे सुमारे 175 स्थाने तसेच समाधीस्थळ असलेल्या या गावी महानुभाव पंथियाचे श्रद्धास्थान आहे.
दुसरे महत्वाचे आहे ते म्हणजे कौंडण्यपूर रुक्मिणी हरणाचा प्रसंग यादव काळात जो घडला तो येथेच. येथे विठ्ठल मंदीर असल्याने येथे आषाढी व कार्तिकेला मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येतात. विदर्भाची पंढरी म्हणून ही कौंडण्यपूरला ओळखले जाते.
यासोबतच पेढी नदीकाठी असलेले भातकुली हे जैनांची काशी म्हणून ओळखल्या जाते. वैराग्यमुर्ती गाडगेबाबा यांचा जन्म दर्यापूर तालुक्यातील शेंडगाव येथे झाला. ऋणमोचन या अमरावतीपासून जवळच्या गावी त्यांनी गोरगरिबांची सेवा केली. अपंगाना अन्नछत्र त्यांनी याच ठिकाणी दिले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव यावली व कार्यही गुरूकुंज मोझरी येथे भव्य प्रार्थना मंदीर व तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ येथेच आहे. त्याशिवाय महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर मोर्शी तालुक्यात उंच पहाडावर डोंगराच्या गुहेत 25 ते 30 फूट खोल स्वयंभू महादेवाचे लिंग आहे. ज्यावर पहाडातून सतत जलाभिषेक सुरू असतो.
तसेच गरम व थंड गंधकासारखा वास येणाऱ्या पाण्याचे कुंड असुन त्यात आंघोळ केल्याने त्वचारोग बरे होतात, अशीही भाविकांची श्रद्धा आहे… तर मग येताय न अमरावतीला.
-शैलजा वाघ-दांदळे,
अमरावती.

विश्वविख्यात कलामहर्षी केकी मूस
विश्वविख्यात छायाचित्रकार व चित्रकार कैकुश्री माणेकजी उर्फ केकी मूस यांचा जन्म मुंबईच्या मलबार हिल या उच्चभ्रू वस्तीत 2 ऑक्टोबर 1912 रोजी जन्म झाला. त्यांचे मामा हे सुप्रसिद्ध आर.सी. कन्स्ट्रक्शनचे मालक होते. ज्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वे स्टेशनची निर्मिती केली आहे.
लहानपणापासून कलेच्या प्रचंड आवडीमुळे केकी मूस यांनी ऐश्वर्याचे जीवन सोडून त्यांनी कलेचा मार्ग स्विकारला. मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून कलेची पदवी आणि पुढे लंडनमधून उच्च शिक्षण घेतले. देशोदेशीच्या कला पाहिल्या. कलाकारांना भेटले. कलेलाच त्यांनी आपले जीवन समर्पित केले. मुंबई येथून ते चाळीसगाव, जि.जळगाव येथे आईच्या आग्रहाखातर 1938 मध्ये परतले. चाळीसगावात आल्यावर प्रथम त्यांनी चित्रे रंगवायला घेतली. केकी मूस यांनी उभे केलेले शेक्सपियर कॉटेज, जहाँगीर, नूरजहाँ, उमर खैय्याम, वादळवारा असे एकाहून एक सरस देखावे आजही पाहताना गुंतवून टाकतात. त्यांची टेबल टॉप फोटोग्राफी जगप्रसिद्ध आहे. स्थिरचित्रण फोटोग्राफी, व्यंगचित्र फोटोग्राफी आणि फेक्ड फोटोग्राफी अशा विविध प्रकारात केकी मूस यांनी कामे केली. त्यांच्या टेबल टॉप फोटोग्राफीच्या प्रकारातील छायाचित्रांना तीनशेहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कीर्तिध्वज फडकवणारे छायाचित्रकार केकी मूस अर्थात बाबुजी हेमहान कलायोगी मुंबईहून चाळीसगावी परतल्यानंतर तब्बल 48 वर्षे एखादा अपवाद वगळता आपल्या घरातून बाहेरही पडले नाहीत. कलेसाठी संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या या कलायोगीने आपल्या कलेच्या माध्यमातून कलासृष्टीची निमिर्ती आपल्या चाळीसगावच्या राहत्या घरातच केली. केकी मूस यांनी आयुष्यभर कला निमिर्तीशिवाय दुसरे काहीही केले नाही. मूस यांच्यात विश्वात जी कला आहे त्या साऱ्या शिकण्याची जिद्द होती. रंगकाम, चित्रकाम, रेखाचित्र, छायाचित्र, मूर्तीकला, कातरकाम, काष्ठशिल्प, ओरिगामी, सतारवादन अशा अनेक कलांमध्ये ते पारंगत होते.
आपल्या पाच दशकाच्या वास्तवात त्यांनी अनेक कलाकृतींची निमिर्ती केली. केवळ मीठ, भुसा, कापूस, वाळलेल्या काड्या यातून त्यांनी गोठवणारा हिवाळा उभा केला. त्या दृश्यावर धुरकट प्रकाश टाकला आणि छायाचित्र घेतले. हे छायाचित्र पाहिल्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू म्हणाले... ‘धिस इज माय नेटिव्ह प्लेस. मिस्टर मूस टेल मी व्हेन यू हॅव व्हिजिटेड काश्मीर’. पंडित नेहरू मूस यांच्या कलाकृती बघण्यासाठी ओढीने त्यांच्या कला दालनाला धावती भेट देण्यासाठी आले अन् कलाकृती पाहताना सर्व कार्यक्रम रद्द करीत दिवसभर रमले.
मूस यांनी त्यांच्या कला दालनाला भेट देणाऱ्या जवळपास प्रत्येक मान्यवरांचे त्यांनी एक आगळे छायाचित्र काढलेले आहे. त्यांच्या कला दालनाला ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे, समाजवादी नेते जयप्रकाश नारायण, शंकरराव देव, साने गुरुजी, पंडीत महादेव शास्त्री, महर्षी कर्वे, आचार्य अत्रे, ना.सी. फडके या दिग्गजांनी भेटी दिल्यात. मूस हे उत्कृष्ट सितारवादकही होते. त्यांना संगीताची व वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांच्या कला दालनात जवळपास पाच हजार संगीताच्या ग्रामफोन्स तर चार हजार पर्यंत पुस्तकांचा संच आजही संग्रही ठेवण्यात आला आहे. विश्वविख्यात कलामहर्षी केकी मूस हेमान, सन्मान, पुरस्कार, प्रसिद्धी, पैसा या साऱ्यांपासून कायम दूर राहिले. त्यांनी प्रचंड मेहनतीने तयार केलेल्या शेकडो कलाकृती जतन करण्याचे काम कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान, चाळीसगाव करीत आहे. परंतु अपुरा निधी आणि संग्रहालयाच्या वास्तू जतनासाठी संस्थेला मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. या कलाकृतींना उर्जितावस्था देण्यासाठी सर्व स्तरातून मदतीची अपेक्षा आहे.
कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान चाळीसगाव ही संस्था जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहराच्या रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूलगतच आहे. कलेची आवड असणाऱ्यांनी या कला दालनाला एकवेळ तरी नक्कीच भेट दिली पाहिजे.
-निलेश परदेशी,
चाळीसगाव, जि.जळगाव. (मोबाईल 7588646750)

निसर्गरम्य ऐतिहासिक पाटणादेवी
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावपासून 18 कि.मी. अंतरावर असलेले पाटणादेवी हे जागृत आदिशक्ती चंडिकादेवीचे बाराव्या शतकातील पुरातन मंदीर आहे. हे मंदीर सातमाळेच्या सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी उंच चौथऱ्यावर धवलतीर्थापासून उगम पावलेल्या डोंगरी नदीच्या किनारी आहे. जवळच असलेल्या पाटणा या लहान गावाच्या नावामुळे हे ठिकाण पाटणादेवी या नावाने ओळखले जाते.
मंदिराजवळचा परिसर अतिशय नयनरम्य आणि मनमोहक अशा निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे. तिन्ही बाजूने अर्धचंद्रकार सह्याद्री पर्वताचे उंच कडे, विविध वृक्ष, डोंगरातून खळखळ वाहणारे ओढे यामुळे मन मोहून जाते.
विशेषत: पावसाळ्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये येथील वातावरण मनाला प्रसन्न करणारे शांत व आल्हाददायक असते. या दिवसात मंदिराच्या चौथऱ्यावरून मंदिराचा भोवतालचा परिसर म्हणजे वनराईने नटलेले पर्वताचे उंच कडे, रंगबिरंगी फुलाफळांनी बहरलेले वृक्ष, खळखळ वाहणारेओढे हेसर्व निसर्गरम्य दृश्य पाहताना मन निसर्गाशी एकरूप होवून जाते. अशा रमणीय ठिकाणाचा पूर्व इतिहास तितकाच ऐतिहासिक व महत्वाचा आहे. मंदिरात दोन गाभारे असून एका गाभाऱ्यात देवीची मुर्ती व दुसऱ्या गाभाऱ्यात शिवपार्वतीची मुर्ती आहे. या दोन गाभाऱ्यांमधील कक्षेत विष्णूची मुर्ती आहे. या परिसरात सापडलेल्या असंख्य मुर्ती व शिल्प हे येथे एका खोलीत ठेवण्यात आले आहे.
मंदिराच्या पूर्व दिशेला दोन कि.मी. डोंगर चढून गेल्यावर सुप्रसिद्ध पितळखोरे लेणी आहे. अजिंठा लेण्याच्या समकालीन ही लेणी असून अतिशय भव्य अशी आहे. या लेण्याजवळून वाहणारा पाण्याचा प्रवाह उंच कड्यावरून खाली कोसळतो. यामुळे देवी मंदिराच्या पूर्वेस उजव्या बाजूला मोठा धबधबा तयार होतो. त्याला धावलतीर्थ किंवा धारातीर्थ म्हणतात.
उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली खडकात तयार झालेल्या खोलगट भांड्यासारख्या डोहातून पाण्याचे फवारे दूरवर उडतात आणि पर्यटकांना आल्हाददायक आनंद देऊन जातात. पाटणादेवी मंदिरापासून एक कि.मी. अंतरावर जुन्या पाटणा गावाचे अवशेष आहेत. हा परिसर पुराणवास्तू शास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून अतिप्राचीन सामुहिक ग्राम रचनेचे पुरावे याठिकाणी पहावयास मिळतात. याच परिसरातून आणखी एक वास्तुशिल्पीदृष्ट्या चांगले मंदीर आहे. त्याला हेमाडपंथी माहेश्वर मंदीर असे म्हणतात.
मंदिराचा गाभारा, अंतराळ, उघडा मंडप, मुख मंडप इ. भाग आहे. मंदिरातील मंडपात मोठा नंदी लक्ष वेधून घेतो. या मंदिराच्या मागील बाजूस जुन्या पाटणे गावाच्या दक्षिणेस एक पडका किल्ला आहे, त्यास बिज्जलगड असे म्हणतात. या गडाच्या उत्तर-पश्चिम बाजूस शृंगारचावडी नावाचे अतिप्राचीन दुर्मिळ असे लेणे आहे. त्यातील बहुतेक प्रतिमा शृंगारिक असून त्या खाली नक्षी पट्ट्या आहेत. शृंगारचावडी लेण्यांच्या शेजारी महेश्वर मंदिराकडे उतरताना सीता न्हाणी व नागार्जुन अशी दोन लेणी आहेत. या उंच प्रदेशातून उत्तरेकडे पसरलेल्या वनराजीचे दृश्य अतिशय विहंगम वाटते. निसर्ग सौंदर्याबरोबरच पुराण वास्तुशिल्पे, शून्याचा वेध घेणारे गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांचे गणितीपीठ बघताना पर्यटक वेळ-काळाचे भान विसरुन जातात.
आज मंदीर भारतीय पुरातन विभागाच्या निगराणीत आहे. येणाऱ्या भाविक, पर्यटक, अभ्यासकांसाठी वनखात्यामार्फत विश्रामगृहे व निसर्गवाचन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. तर चला जाऊया पाटणादेवीला…
-निलेश परदेशी,
चाळीसगाव, जि.जळगाव. (मो.नं.7588646750)

पर्यटकांचे आकर्षण : हाजराफॉल
निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करुन गोंदिया जिल्ह्याला भरभरुन दिले आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांमुळे अनेकांना रोजगार देखील मिळत आहे. जिल्ह्यातील सालेकसा हा मागास, दुर्गम, नक्षल प्रभावित, आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. जंगलाने मोठ्या प्रमाणात व्यापलेला हा जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे.
गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून 52 किलोमीटर अंतरावर आणि छत्तीसगडच्या सीमेजवळील सालेकसा तालुक्यात असलेल्या ब्रिटीशकालीन हाजराफॉल धबधबा बघायला पावसाळा व हिवाळ्याच्या दिवसात पर्यटकांची मांदियाळी असते. सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत असलेल्या या धबधब्याला बघायला छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यासह विदर्भातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
सालेकसा-दरेकसा मार्गावरुन हाजराफॉलकडे वळतांना हिरवीगार वनराई, विविध जातीची असंख्य झाडे, औषधी गुणधर्म असलेली वृक्ष दिसून येतात. हाजराफॉलकडे जाण्यासाठी जिल्हा पर्यटन समितीने लावलेला दिशादर्शक हाजराफॉल सचित्र रेट्रो रिफ्लेक्टीव्ह फलक पर्यटकांना हाजराफॉलकडे जाण्यासाठी आकर्षिक करतो.
नवाटोला हे 667 लोकसंख्येचे गांव. गावातील 95 टक्के लोक आदिवासी असून ते गोंड जमातीचे आहेत. अल्पशिक्षीत असलेल्या काही आदिवासी युवक-युवतींना हाजराफॉलमुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्हा पर्यटन समितीच्या माध्यमातून हाजराफॉल परिसराचा विकास करण्यात येत आहे. नवाटोला संयुक्त वन व्यवस्थापन समिती हाजराफॉलच्या व्यवस्थापनाचे काम करीत असल्यामुळे नवाटोलाच्या जवळपास 25 ते 30 बेरोजगार युवक-युवतींना समितीने रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. या युवक-युवतींना पर्यटकांशी अतिथ्य, बुडत्या पर्यटकाला वाचविणे, हाजराफॉल परिसराची स्वच्छता राखण्याचे प्रशिक्षण दिले आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत ही युवा मंडळी पर्यटकांच्या सेवेत असते. हाजराफॉलकडे जाणाऱ्या मार्गावरील प्रवेशद्वारावर प्रत्येक पर्यटक व प्रत्येक वाहनाचे 10 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येते. नवाटोला येथे सन 2012 मध्ये स्थापन करण्यात आलेली संयुक्त वन व्यवस्थापन समिती हाजराफॉलसाठी 17 ऑक्टोबर 2014 पासून सक्रीय झाली आहे. महिन्याकाठी सरासरी 50 ते 55 हजार रुपये उत्पन्न समितीला हाजराफॉलमुळे मिळत आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून हाजराफॉल येथे चहा कॅन्टीन, बुट्टा विक्री केंद्र, लाकडापासून तयार करण्यात आलेल्या साहित्याची विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. पर्यटकांना बसण्यासाठी पर्यटक संकुल मचान, पर्यावरणपूरक बांबूपासून कचरा पेट्या तयार करण्यात आल्या आहेत. बायोटॉयलेटची सुविधा तेथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
साहसी खेळासाठी बर्मा ब्रीज, मल्टीवाईन ब्रीज, व्हीसेफ ब्रीज, कमांडो नेट, हॅंगींग ब्रीज, सीसा बॅलन्स, झिकझॅक बॅलन्स तयार करण्यात आले आहे. यासाठी पर्यटकांकडून प्रती ब्रीज 10 रुपये शुल्क आकारण्यात येते. संयुक्त वन व्यवस्थापन समितीने जवळपास दिड लक्ष रुपये खर्च केले आहेत.
भविष्यात हाजराफॉल येथे चिल्ड्रेन पार्क, फुलपाखरु गार्डन, झीप लाईन, बोटींगची सुविधा, औषधीयुक्त वनस्पतीची लागवड, गौण वनोपजावर प्रक्रिया करुन विक्री, पर्यटकांना अल्पदरात भोजन, कचऱ्याचे वर्गीकरण करुन त्याचे व्यवस्थापन करणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा तयार करण्यात येणार आहे.
नवाटोला येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीची सक्रियता आणि जिल्हा पर्यटन समितीकडून हाजराफॉलच्या विकासासाठी करण्यात येत असलेल्या कामामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नवाटोला येथील आदिवासी युवक-युवतींना पर्यटनातून रोजगार उपलब्ध झाला आहे. हाजराफॉल हे पर्यटनस्थळ ग्रीनव्हॅली म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
हाजराफॉल बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात अल्पोपहार किंवा भोजन करता यावे यासाठी मोबाईल कॅन्टीन जेएफएमच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहे.
हाजराफॉल या पर्यटन स्थळाला 17 ऑक्टोबर 2014 ते 28 ऑक्टोबर 2015 या कालावधीत 64 हजार 761 पर्यटकांनी भेट दिली असून या पर्यटन स्थळापासून नवाटोला संयुक्त वनव्यवस्थापन समितीला 6 लाख 42 हजार 990 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 15 ऑगस्ट 2015 रोजी स्वातंत्र्य दिनी 3400 पर्यटकांनी भेट दिली. हाजराफॉलमुळे नवाटोला संयुक्त वनव्यवस्थापन समितीला उत्पन्नाचे एक साधन उपलब्ध झाले आहे. नवाटोलातील काही बेरोजगार युवक-युवतींना काही महिन्यापुरता हाजराफॉलमुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.
- जिल्हा माहिती अधिकारी, गोंदिया

सिंधुदुर्गात बहरला पर्यटन हंगाम !
दिवाळीच्या सुट्या आणि थंडीची चाहूल या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात पर्यटन हंगाम बहरला असून विशेषतः मालवण येथील स्कुबा डायव्हिंग आणि किल्ले दर्शनाच्या ओढीने दिवसेंदिवस पर्यटकांचा ओघ वाढत असल्याचे चित्र सध्या सिंधुदुर्गात दिसत आहे.
गेल्या सहा सात दिवसात मालावांचा सागरी किनारा देशी-विदेशी पर्यटकांनी फुलून गेला असून या काळात पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. बंदर विभागाच्या आकडेवारी नुसार दिवाळी सुटीच्या कालावधीत आतापर्यंत 20 हजार पर्यटकांनी सिंधुदुर्ग किल्ला भ्रमंती केली आहे. तर 1300 पेक्षा जास्त पर्यटकांनी स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेतला आहे. यातून शासन तिजोरीत कर स्वरूपात चार लाखाचा महसूल जमा झाला आहे.
1 मे 1981 रोजी स्थापन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन हे मुख्य बलस्थान आहे. या जिल्ह्याची पर्यटनाची क्षमता लक्षात घेऊन शासनाने 30 एप्रिल 1997 साली हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला आहे. अशा स्वरूपाची शासकीय मान्यता असलेला सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून स्थानिक रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाने विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष गती दिली आहे. पर्यटन विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे मालवण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग ट्रेनिंग सेंटर विकसित करण्यात आले आहे. या सुविधेमुळे पर्यटकांना समुद्रांतर्गत जीवसृष्टीचा स्नार्कलींग तसेच स्कुबा डायव्हिंग करून प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. पर्यटकांसाठी ही बाब पर्वणी ठरली असून त्यामुळे मालवण येथील स्कुबा डायव्हिंग हे देशी-विदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरले आहे.
शासनाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन सेवा संस्थेला स्कुबा डायव्हिंगकरिता अधिकृत मान्यता देण्यात आली असून एक खिडकी योजनेखाली मालवणातील सर्व स्कुबा डायव्हिंग व्यावसायिक एकत्रित आले आहेत. स्कुबा डायव्हिंगसाठी संस्थेच्यावतीने एका पर्यटकामागे 1725 रुपये घेतले जातात. त्यानुसार या हंगामात गेल्या चार-पाच दिवसात सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन सेवा संस्थेचा जवळपास 23 लाख 30 हजार पेक्षा अधिक रुपयांचा व्यवसाय झाला आहे. याचा लाभ सर्व स्थानिक स्कुबा डायव्हिंग व्यावसायिकांना मिळणार आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग किल्ला दर्शनासाठी दि. 13 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत 20 हजार 641 पर्यटकांनी भेट दिली असून त्यानुसार दि. 13 नोव्हेंबर रोजी 2899, दि. 14 नोव्हेंबर रोजी 4625, दि. 15 नोव्हेंबर रोजी 5185, दि. 16 नोव्हेंबर 4267 तर दि. 17 नोव्हेंबर रोजी 3665 पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्यावतीने प्रती पर्यटक 53 रुपये घेतले जातात. त्यानुसार पर्यटक प्रवासी होडी वाहतुकीच्या व्यवसायातून स्थानिक व्यावसायिकांना गेल्या चार- पाच दिवसात 10 लाख 93 हजार पेक्षा अधिक रुपयांचा व्यवसाय झाला आहे. याशिवाय जिल्ह्यातील देवबाग, तारकर्ली, तोंडवली, वेंगुर्ला, सागरेश्वर तसेच इतर सागरी किनारे त्याचबरोबर देवगड, विजयदुर्ग, रांगणागड या आणि यांसारखे इतर किल्ले, गड व पर्यटन स्थळांनाही मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देत आहेत. एकूण सिंधुदुर्गात पर्यटन हंगामाला चांगली सुरूवात झाली असून त्या अनुषंगाने स्थानिक व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होत आहे.
आर्थिक विकासाचे व रोजगाराचे प्रमुख साधन म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाचे महत्व लक्षात घेता गेल्या वर्षभरात ग्रामीण पर्यटन, सागरीय तटीय क्षेत्रांचा विकास, पर्यटन स्थळांचा विकास, दळणवळणाच्या सोयी या व यासारख्या पर्यटन व्यवसायाच्या इतर बाबींच्या विकासाकरिता केंद्र तसेच राज्य शासनाकडून पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पूरक योजनांच्या अंमलबजावणीकरीता व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. एकूणच जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र शासन वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी चालू हंगामात पर्यटन व्यवसायाला मिळालेले हे समाधानकारक ओपनिंग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विकासाच्या दिशेने पडलेले पाऊल म्हणावे लागेल.
-अर्चना जगन्नाथ माने
माहिती सहाय्यक, सिंधुदुर्ग.

निसर्गरम्य चिखलदरा
|
‘नशीबावर सोडलेल्या सांजवीला नव्या आयुष्याचे दान’
Posted by
rajeshkhadke
on Friday, 27 November 2015
/
Comments: (0)
राजीव गांधी जीवनदायी योजनेतून यशस्वी हृदय शस्त्रक्रिया
घरची परिस्थिती अगदीच बेताची. अशातच पहिल्याच मुलीला जन्मताच हृदयाचा आजार, शुद्ध- अशुद्ध रक्त वेगळे करणारा पडदाच हृदयाला नसल्यामुळे हृदयाकडून शरीराला अशुद्ध रक्ताचाच पुरवठा होत होता. त्यामुळे थोडं चाललं- बोललं तरी धाप लागायची. ओठ, हातापायाची नखं काळी-निळी पडायची. खाजगी डॉक्टरांनी ऑपरेशनचा खर्च तीन लाख रूपये सांगितला. पण एवढे पैसे नसल्यामुळे आई वडीलांनी तिला नशीबावर सोडून दिल होतं. अशावेळी राजीव गांधी जीवनदायी योजना सांजवीसाठी वरदान ठरली. या योजनेतून सांजवीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सांजवीला नव्या आयुष्याचे दान मिळाले.
भंडारा तालुक्यातील 5 किलोमीटरवर असलेल्या फुलमोगरा या गावी मनोज आणि अंजू बडगे हे कुटुंब राहतं. त्यांना दोन मुली व एक मुलगा. तीन भावंडामध्ये सांजवी सगळ्यात मोठी. ती अडीच वर्षाची असताना तिला खूप ताप आला. त्यावेळी तिला नागपुरला सुपर स्पेशालिटीला दाखल केले, तेव्हा डॉक्टरांनी तिला हृदयाला छिद्र असल्याचे निदान केले. ऑपरेशन शिवाय हा आजार बरा होऊ शकत नाही त्यामुळे ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण बागडे कुटूंबियांची आर्थिक परिस्थिती अगदीच खराब होती. त्यामुळे तिचे ऑपरेशन पैशांअभावी होऊ शकले नाही.
सांजवी मोठी व्हायला लागली तसा तिचा त्रास वाढत होता. 10 पावलं चालली तरी तिचा श्वास भरून यायचा. ओठ, हाता-पायाची नखं निळी पडायची. शाळेत नाव घातलं पण मध्येच शाळेतील शिक्षक तिला घरी आणून सोडायचे. तिची अभ्यासातील प्रगतीही त्यामुळे जेमतेमच होती. सतत आजारी पडायची. अशाच अवस्थेत सांजवी 9 वर्षाची झाली.
ऑगस्ट 2013 मध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये सांजवीला हृदयाचा आजार असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. नेमकी काय समस्या आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी सांजवीच्या आईवडिलांना तिच्या सगळ्या तपासण्या करण्यास सांगितले. इको तपासणीत तिच्या हृदयाला छिद्र असल्याचे लक्षात आले. डॉ. वासनिक आणि डॉ. मेश्राम यांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेतून तिचे ऑपरेशन करून घेण्यासाठी सांजवीच्या आर्इवडिलांकडे पाठपुरावा केला. वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील विनोबा भावे रूग्णालयात ऑगस्ट 2015 मध्ये सांजवीवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. पैशांशिवाय राजीव गांधी जीवनदायी योजनेतून सांजवीला जीवनदान मिळाले. आज ती स्वस्थ जीवन जगत आहे.
आम्ही नशिबावर सोडून दिलेल्या सांजवीच्या जगण्यात राजीव गांधी जीवनदायी योजनेनं नवीन प्राण ओतला. आज सांजवी हसत खेळत शाळेत जाताना पाहून तिच्या भविष्याची चिंता मिटली. अशी प्रतिक्रिया सांजवीची आई अंजू बडगे यांनी व्यक्त केली.
-मनीषा सावळे
जिल्हा माहिती अधिकारी, भंडारा

अबब..! सात कोटी लिटरचे शेततळे…!
Posted by
rajeshkhadke
/
Comments: (0)
कमी पावसामुळे तीन वर्षांपासून बीड जिल्ह्यासह आष्टी तालुका दुष्काळाचा सामना करीत आहेत. असे असताना तालुक्यातील आष्टा हरीनारायण येथील कृषी पदवीधर विश्वास गटगटे यांनी नोकरीच्या पगारातून 22 एकर शेती खरेदी करत त्यात 45 लाख रुपये खर्च करुन सात कोटी लिटर क्षमतेचे शेततळे खोदले आहे. 18 एकर शेतीत डाळींबाचे पीक घेतले जात असून दुष्काळी परिस्थितीत हा शेतीचा आणि शेततळ्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.
बीड जिल्ह्यात आष्टी तालुका अवर्षण प्रवण क्षेत्रात येत असल्यामुळे सतत कमी पाऊस पडतो. तालुक्यातील आष्टा येथे विश्वास गळगटे यांची एक एकर वडिलोपार्जित जमीन होती. शेतीची आवड असल्याने राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातून 2000 मध्ये सुरुवातीला बीएसएसी ॲग्री ही पदवी व त्यानंतर 2002 मध्ये गुजरातच्या कृषी विद्यापीठातून एमएसस्सी ॲग्री ही दुसरी पदवी मिळविली. कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याने सुरुवातीला खाजगी कंपनीत नोकरी त्यांनी नोकरी सुरु केली. नोकरीच्या पगारातून 2013 मध्ये त्यांनी गावातच 22 एकर जमीन खरेदी केली. पुण्यात नोकरी सांभाळून शनिवारी-रविवारी नियोजन करुन मार्च 2014 मध्ये साडेनऊ एकर क्षेत्रामध्ये त्यांनी 5500 डाळींबाच्या झाडांची लागवड केली. त्यानंतर मे 2014 मध्ये मोठ्या आकाराच्या शेततळ्याचे काम सुरु केले. नोकरीच्या पैशांची गुंतवणूक इतरत्र न करता शेतीमध्येच करायची हा त्यांच्या उद्देश असल्यामुळे हे धाडस करु शकल्याचे ते सांगतात. या धाडसाला अमरराजे निंबाळकर, भरत गळगटे या दोन मित्रांनी प्रेरणा दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश भताने आणि तालुका कृषी अधिकारी प्रमोद शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
मार्च 2014 मध्ये त्यांनी शेतात 5500 डाळींबाची लागवड केली असून त्याला फळे येत आहेत. आणखी साडेसात एकर क्षेत्रावर 4500 झाडांची लागवड होईल. सात कोटी लिटर पाण्यातून 18 एकरातील बाग फुलणार असून उत्पादन खर्च वजा जाऊन एकरी दीड ते दोन लाख रुपये उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा आहे. सध्याची पावसाची परिस्थिती पाहता कॅश क्रॉपसाठी तांत्रिक पद्धतीने कमीत कमी दोन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन केले आहे. मल्चिंगचा वापर करुन 10 हजार डाळींब झाडांसाठी दोन वर्ष पाणी पुरेल अशा शेततळ्याचे नियोजन केल्याने आम्हाला पाण्याची चिंता नाही, असे विश्वास गळगटे यांनी सांगितले. अशा पद्धतीने लहान-मोठे शाश्वत पाण्याचे साठे निर्माण केल्यास पाण्याची सोय होईल आणि शेतीचेही उत्पादन वाढेल. आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा विश्वास यानिमित्ताने शेतकऱ्यांना मिळू शकतो.
-अनिल आलुरकर,
जिल्हा माहिती अधिकारी, बीड.

सलाम सुजाता
Posted by
rajeshkhadke
/
Comments: (0)
सुजाता कोंडिकिरे ही तरुणी अंबरनाथ पश्चिमेकडील मातोश्री नगर मध्ये राहते. स्टेट बँक ऑफ म्हैसूर च्या डोंबिवली शाखेत ती गेल्या 3 महिन्यांपासून प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून रुजू झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिच्या सहयोगी बँकांसाठी घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर सुजाताची निवड स्टेट बँक ऑफ म्हैसुरसाठी झाली आणि नेमणूक डोंबिवली शाखेत झाली. या बँकेत रुजू होण्यापूर्वी तिचे बँगलोर येथे बँकेच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण झाले. अर्थात सुजाताची बँकेत झालेली निवड ही सहजासहजी झाली नाही. 2012 पासून तिने विविध बँकेच्या स्पर्धा परीक्षा दिल्या. नक्कीच सांगायच्या तर 26 परीक्षा दिल्या. त्यात जवळपास 13 परीक्षा ती उत्तिर्ण झाली.
आता हे वर्णन ऐकून आपल्याला वाटेल, त्यात काय एवढे ! शेकडो हजारो मुले, मुली दरवर्षी स्पर्धा परीक्षा देतात आणि उत्तीर्ण झाल्यावर बँकेत किंवा अन्य शासकीय/निमशासकीय कार्यालयात नोकरीस लागतात. तशीच सुजाताही लागली असेल. पण तसे नाही. सुजाता ही दोन्ही डोळ्यांनी पूर्ण अंध आहे आणि पूर्ण अंधत्वावर मात करीत तिने अत्यंत जिद्दीने हे यश प्राप्त केले आहे.
सुजाताचे वडिल बाळासाहेब नोकरीसाठी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शिंगणापूर हे मूळ गाव सोडून अंबरनाथला आले आणि येथे स्थायिक झाले. त्यांच्या संपूर्ण नातेवाईकांमध्ये मुलींना शिक्षण दिले जात नसे. पण ते प्रागतिक विचारांचे असल्याने त्यांनी तिन्ही मुलींना उच्च शिक्षण दिले. सुजाताचे प्राथमिक शिक्षण अंबरनाथ येथे भगिनी मंडळ शाळेत तर पुढील शिक्षण अंबरनाथ येथीलच महात्मा गांधी विद्यालयात झाले.
घरची परिस्थिती बेताची म्हणून सुजाताला अकरावीसाठी सांगलीला जावे लागले. पहाटे फिरायला जाताना अंधारात मोठे झाड लागले आणि क्षणार्धात सुजाताच्या डोळ्यापुढे अंधार पसरला. त्या धक्क्याने तिची दृष्टी गेली. त्यानंतर 2 महिने उपचार घेतल्यावर दृष्टी आली. 17 व्या वर्षी दृष्टी गेली ती 18 व्या वर्षी आली. सुजाताने 2002 मध्ये बीए अर्थशास्त्र ही पदवी मिळविली. नंतर बीएड करायचे होते पण आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे तिने खाजगी कंपनीत पॅनेल असेब्लिंग आणि स्टोअर किपरचे काम मिळविले. पैसे वाचवून बीएड करायचे होते पण 2005 च्या अखेरीस दृष्टी जाऊ लागल्याने ते कामही तिला सोडावे लागले आणि 27 व्या वर्षी ती पूर्णच गेली. मदत करावयाच्या ऐवजी नातेवाईक मात्र अंधत्वामुळे तू काही करु शकणार नाही, घरच्यांवर बोजा बनू नको म्हणून जीव दे असे सरळ सांगायचे. सुजातालाही धीर खचून काही वेळ जीव देण्याचे विचार डोक्यात यायचे. ती आईला म्हणायाची पण, मला विष आणून दे, मी मरुन जाते. पण आईने तिला खूप धीर दिला आणि सुजाताला जगण्याचे बळ मिळाले. म्हणून सुजाता म्हणते, समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. आता सुजाताची परिस्थिती अशी आहे की, तिला पूर्ण अंधत्व आले आहे. याविषयीची शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची आहे. मेंदूत शस्त्रक्रिया करण्यात धोका असा आहे की, त्यामुळे पॅरॅलिसिस होऊ शकतो किंवा मृत्युही येऊ शकतो. शिवाय या शस्त्रक्रियेचा खर्च जवळपास 40 लाख रुपये इतका आहे. तो ही करता येणे अशक्यच.
पण सुजाताने हार मानली नाही. मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्कूल फॉर ब्लाईंड या संस्थेत ती ब्रेल लिपी शिकली आणि त्याबरोबरच बँकेच्या प्रवेश परीक्षा तयारीच्या वर्गांना बसू लागली. वरळीत तिला एमएससी आयटी करता आले. शिवाय संगणकाचे अंधासाठी असलेले जॉर्ज सॉफ्टवेअर तिने आत्मसात केले. 3 वर्षे वेगवेगळ्या परीक्षा दिल्या. दिवसरात्र अभ्यास करायचा आणि यश मिळवायचेच, ह्या जिद्दीने ती तयारी करत राहिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि बँकेच्या परीक्षा दिल्या. विक्रीकर निरीक्षकाच्या पहिल्या परिक्षेत तिला यश मिळाले, पण दुसऱ्या परीक्षेचे पत्र परीक्षा झाल्यावर मिळाले आणि ती संधी हुकली. पण ती निराश झाली नाही. अंतिमत: तिची स्टेट बँक ऑफ म्हैसूरमध्ये निवड झाली.
सुजाताने दृष्टी नसल्याने सामान्य ज्ञान या विषयाचा सर्व अभ्यास रेडिओ ऐकून विविध व्यापारविषयक वृत्त वाहिन्यांवरील कार्यक्रम ऐकून केला. वरळीत शिकवायला येणारे श्री.संजय मोरे सर श्री. भरत पांडे सर हे तिला दूरध्वनीवरुन मार्गदर्शन करत राहिले. घरी सुजाताची आई सुजाता सांगायची त्या नोटस् लिहून घ्यायची आणि सतत सुजाताला सोबत करायची.
मुलींच्या शिक्षणामुळे थोरली सुजाता, दुसऱ्या क्रमांकाची ज्योती आणि तिसरी प्रिती आणि भाऊ प्रवीण असे सर्व शिकले. प्रिती वीज मंडळात संगणक चालक आहे. तर ज्योती एसटी महामंडळात वाहक म्हणून काम करते. भावाने आय.टी.आय. मधून एसी मॅकॅनिकचा कोर्स केला. आज तो 2 वर्षापासून दुबईत चांगली नोकरी करतोय. वडिलांच्या प्रागतिक विचारांमुळेच हे शक्य झाले हे सांगताना वडिलांच्या आठवणीने सुजाताला खूप भरुन आले.
सुजाताचे वडिल पॅरॅलिसिसमुळे 2011 पासून काही नोकरी/व्यवसाय करु शकत नव्हते. गेल्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांचे निधन झाले. अशा दु:खी परिस्थितीत तिने या बँकेची नोव्हेंबर महिन्यात परीक्षा दिली. 26 जानेवारीला निकाल लागला. त्यात ती उत्तीर्ण झाली. 21 फेब्रुवारीला बँकेच्या वांद्रे येथील मुख्यालयात मुलाखत झाली आणि 20 एप्रिलला निवड झाल्याचे नेटवरुन समजले आणि कितीतरी वेळ तिचा विश्वासच बसेना. पूर्ण भारतातून 7 अंध निवडले गेले. त्यातून महाराष्ट्रातून निवडली गेलेली आणि मुलगी असलेली सुजाता एकमेव आहे, हे विशेष.
बँकेत काम करताना सुद्धा सुजाता अधिकाधिक स्वावलंबी राहण्याचा प्रयत्न करते. स्वत:च्या अनेक गोष्टी स्वत:च करते. अंधासाठी असलेले सॉफ्टवेअर अजून बँकेत आलेले नाही. त्यामुळे सुजाता सध्या ग्राहक मित्र म्हणून काम करते. ती बँकेच्या विविध योजना ग्राहकांना समजावून सांगते. काहीवेळा दूरध्वनीवरुन ती ग्राहकांना या योजना समजावून सांगते. तिच्या बरोबर निवड झालेल्या अन्य 6 अंध व्यक्तीही देशाच्या विविध शहरांमधील बँकांमध्ये सध्या अशाच स्वरुपाचे काम करतात.
बँकेत नोकरी लागली तरी सुजाताची शिक्षणाची इच्छा पूर्ण झाली नाही. ती आता समाजकार्यात मास्टरची पदवी प्राप्त करु इच्छिते. शिवाय आपल्याला परत दिसणार जरी नसले तरी आपले डोळे अन्य अंध व्यक्तींना बसू शकतात हे तिला कळल्यामुळे तिने नेत्रदानाचाही संकल्प केला आहे.
डोळ्यांचे डॉक्टर डॉ.सोनल शहा, मानसोपचार तज्ज्ञ डॉ.गौतम जटाले यांचे ती खूप आभार मानते. वडिलांच्या आजारपणामुळे व नंतर मृत्युमुळे बहिण ज्योती आणि तिचे पती श्री.संजय भंडारे यांनी मनापासून साथ दिली, सहकार्य दिले. त्यामुळे सुजाता त्यांच्याविषयीची खूप कृतज्ञता व्यक्त करते.
अंधारातून प्रकाशाकडे निघालेल्या सुजाताला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
- देवेंद्र भुजबळ,
संचालक (माहिती)(प्रशासन)

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी
Posted by
rajeshkhadke
/
Comments: (0)
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी : येथील १२९ व्या तुकडीचा पदवीप्रदान समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला

rajesh khadke
Posted by
rajeshkhadke
on Tuesday, 24 November 2015
/
Comments: (0)
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वातंत्र देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान प्रधान केले. भारत देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या घरा घरात भारतीय संविधान पोहचले पाहिजे हा उदात्त हेतू घेऊन आम्ही बरेच वर्षापासून कार्य करीत आहोत आणि त्या बाबत जनजागृती शासनाने करावी अशी मागणी आम्ही वारंवार करीत आलो त्याला यश आले असुन तसे परिपत्रक काढले गेले आहे. त्यामुळे आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत