पर्यटनासाठी शॉर्ट टर्म टुरिझम किंवा वन डे पिकनीक हा हल्लीचा ट्रेंड आहे. अमरावती हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असा जिल्हा आहे. यामध्ये प्रामुख्याने मेळघाट, चिखलदरा याठिकाणी पर्यटक जाण्यासाठी उत्सुक असतात. परंतु या जिल्ह्यात अनेक अशी धार्मिक व प्रेक्षणीयस्थळे आहे जिथे एका दिवसात वनडे पिकनीक उत्तम करता येऊ शकते.
महानुभाव पंथाची काशी असलेल्या रिद्धपूर येथे सुमारे 175 स्थाने तसेच समाधीस्थळ असलेल्या या गावी महानुभाव पंथियाचे श्रद्धास्थान आहे.
दुसरे महत्वाचे आहे ते म्हणजे कौंडण्यपूर रुक्मिणी हरणाचा प्रसंग यादव काळात जो घडला तो येथेच. येथे विठ्ठल मंदीर असल्याने येथे आषाढी व कार्तिकेला मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येतात. विदर्भाची पंढरी म्हणून ही कौंडण्यपूरला ओळखले जाते.
यासोबतच पेढी नदीकाठी असलेले भातकुली हे जैनांची काशी म्हणून ओळखल्या जाते. वैराग्यमुर्ती गाडगेबाबा यांचा जन्म दर्यापूर तालुक्यातील शेंडगाव येथे झाला. ऋणमोचन या अमरावतीपासून जवळच्या गावी त्यांनी गोरगरिबांची सेवा केली. अपंगाना अन्नछत्र त्यांनी याच ठिकाणी दिले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव यावली व कार्यही गुरूकुंज मोझरी येथे भव्य प्रार्थना मंदीर व तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ येथेच आहे. त्याशिवाय महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर मोर्शी तालुक्यात उंच पहाडावर डोंगराच्या गुहेत 25 ते 30 फूट खोल स्वयंभू महादेवाचे लिंग आहे. ज्यावर पहाडातून सतत जलाभिषेक सुरू असतो.
तसेच गरम व थंड गंधकासारखा वास येणाऱ्या पाण्याचे कुंड असुन त्यात आंघोळ केल्याने त्वचारोग बरे होतात, अशीही भाविकांची श्रद्धा आहे… तर मग येताय न अमरावतीला.
-शैलजा वाघ-दांदळे,
अमरावती.
0 comments:
Post a Comment