महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र आहेत. त्यातील पाच विदर्भात आहेत. हे पाच आणि इतर राज्यातील आठ व्याघ्र प्रकल्प मिळून एकूण १३ व्याघ्र प्रकल्प विदर्भाच्या ३०० चौ.कि.मी च्या परिक्षेत्रात आहेत. त्यामुळेच विदर्भाला देशाची व्याघ्र राजधानी म्हटले जाते. स्टेटस ऑफ टायगर्स इन इंडिया च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील वाघांची संख्या सन २०१० च्या १६९ वाघांहून वाढून ती १९० इतकी झाली आहे. महाराष्ट्रात जे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत त्यामध्ये बोर व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांचा समावेश आहे. पहिल्या भागात आज जाणून घेऊ या बोर व्याघ्र प्रकल्पाविषयी ची माहिती. बोर अभयारण्याला ऑगस्ट २०१४ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. भारतातील एक नवीन आणि सर्वात लहान असा हा व्याघ्र प्रकल्प आहे. आकाराने लहान असला तरी जैवविविधतेने संपन्न आणि वन्यप्राण्यांचा उत्तम अधिवास असलेले हे ठिकाण त्यामुळेच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. २७ नोव्हेंबर १९७० रोजी बोरला अभयारण्य म्हणून घोषीत करण्यात आले. बोर व्याघ्र प्रकल्प हा नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेस आणि वर्धा जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर आहे. याशिवाय ६१.१० चौ.कि.मी जलाशयाचा यात समावेश करण्यात आला आहे. बोर हे सातपुडा-मैकल येथील संपन्न जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. हे सातपुडा पूर्व-पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर सीमेपसून सुरु होऊन कान्हा येथील मैकल टेकडीला मिळते. वन्यप्राण्यांची शिकार होऊ नये आणि जैवविविधता टिकून राहावी तसेच ती संवर्धित व्हावी म्हणून १९७० मध्ये या क्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. कान्हा आणि पेंच अभयारण्याप्रमाणेच येथे तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांची संख्या मोठ्याप्रमाणात आहेत. २०१४ च्या व्याघ्र गणनेनुसार येथे ४ ते ५ प्रौढ वाघांसह त्यांच्या बछड्यांचा आढळ आहे. जुन्या बोर अभयारण्याचे क्षेत्र ६१.१०० चौ.किमी आहे. नवीन बोर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र ६०.६९ चौ.कि.मी आहे तर नवीन बोर विस्तारित वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र १६.३१ चौ.कि.मी आहे. जंगलाची सलगता हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य असून ही सलगताच वन्यप्राण्यांच्या विशेषत: वाघांच्या संवर्धनात महत्वाची ठरत आहे. कसे पोहोचाल: विमान: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथून ८० कि.मी रेल्वे: वर्धा रेल्वेस्टेशनहून ३५ कि.मी रस्ता- हिंगणी गावापासून ५. कि.मी -डॉ. सुरेखा म मुळे वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती)संदर्भ: वन विभाग |
वाघोबाच्या गावात.... बोर व्याघ्र प्रकल्प
रत्नागिरी जिल्ह्याचे वैभव ‘गुहागर’
महाराष्ट्रातील जवळजवळ सगळेच समुद्रकिनारे हे सुंदर, शांत, स्वच्छ आणि निसर्ग रमणीय आहेत. गुहागरचा समुद्रकिनारा सुद्धा याला अपवाद नाही. खरंतर गुहागर म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचे वैभवच म्हणावे लागेल. वासिष्ठी आणि जयगड खाड्यांच्यामध्ये वसलेले गुहागर हे अत्यंत टुमदार असे छोटेसे गाव असून त्याला लाभलेला सुंदर निसर्गरम्य किनारा आणि पांढरीशुभ्र पुळण हे इथे वारंवार यावेसे वाटणारे आकर्षण नक्कीच आहे. मुंबईपासून 280 कि.मी. असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरला सुरुचे बन असलेला अत्यंत सलग आणि सुरेख असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याचबरोबर श्री व्याडेश्वर आणि श्री दुर्गादेवीची नितांत रमणीय मंदिरे या परिसराची शोभा अजूनच वाढवतात. इथे मिळणारे अगदी खास कोकणी पद्धतीचे पदार्थ पर्यटकांना या प्रदेशाची भुरळ पाडतात. समुद्रकिनाऱ्याला समांतर जाणारा एकमेव रस्ता या गावाला लाभलेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या घरांची अंगणे विविध रांगोळ्यांनी सजवलेली असतात. व्याडेश्वराचे पुरातन मंदिर गावाच्या अगदी मधोमध वसले असून त्यामुळे गावचे भौगोलिकदृष्ट्या दोन भाग पडतात. एक म्हणजे खालचा पाट आणि दुसरा वरचा पाट. गुहागर हे आंबा, फणस, काजू, सुपारी आणि नारळ या फळांसाठी सुप्रसिद्ध आहे. गुहागरच्या उत्तरेकडे असलेल्या अंजनवेल या गावाशी दाभोळ हे गाव फेरी बोटीने जोडले गेल्यामुळे गुहागरचे महत्त्व अजून वाढलेले दिसते. तसेच दक्षिण दिशेला हेदवीवरून जयगड हे गावसुद्धा फेरी बोटीने जोडल्यामुळे गुहागर हे रत्नागिरी तालुक्याशी जोडले गेलेले आहे. गुहागरला आल्यावर समुद्रात होणारा सूर्यास्त पाहणे यासारखी दुसरी रमणीय गोष्ट नाही. हा नयनरम्य सूर्यास्त पाहणे सुखकर व्हावे म्हणून स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना बसण्यासाठी उत्तम सोय किनाऱ्यावर केलेली आहे. गुहागरचा पेशवे घराण्याशी फार पूर्वीपासून संबंध आलेला आहे. थोरले माधवराव पेशव्यांचे काका राघोबादादा यांची पत्नी आनंदीबाईचे माहेर या गुहागरचेच. इथून १५ कि.मी. वर असलेल्या कोतुळक या गावी असलेल्या ओक घराण्यात आनंदीबाईचा जन्म झाला होता. दगडी बांधणीचे व्याडेश्वर हे शिवमंदिर गुहागरचे ग्रामदैवत होय. अनेक चित्पावन ब्राह्मण कुटुंबियांचे हे कुलदैवत आहे. त्याचप्रमाणे नुकताच जीर्णोद्धार झालेले दुर्गादेवीचे मंदिरसुद्धा अत्यंत रमणीय ठिकाणी वसलेले आहे. गुहागरमध्ये अजून एक प्राचीन मंदिर असून ते उफराटा गणपतीचे आहे. इथे गणपतीचे तोंड पश्चिम दिशेला केलेले आढळते. कसे जावे : गुहागर हे रत्नागिरी, पुणे आणि मुंबईशी रस्त्याने जोडले गेलेले असल्याने राज्य परिवहन मंडळाच्या बसेसने गुहागरला जाता येते. तसेच कोकण रेल्वेवरील चिपळूण या रेल्वे स्थानकावर उतरुन परिवहनच्या किंवा खाजगी बसेसनी गुहागरला जाता येते. संकलन - विलास सागवेकर, उपसंपादक |
भोरड्यांचा मुढाळ्यात नृत्याविष्कार !
'पक्ष्यांचे लक्ष थवे…गगनाला पंख नवे… ही' ना.धो. महानोरांना आलेली अनुभूती पुणे जिल्ह्यातील मुढाळे (ता.बारामती) गावात प्रत्यक्ष अनुभवयास येत आहे. दररोज सायंकाळी दूरदूरहून एकत्र आलेल्या काही लाख भोरड्या अर्धा ते पाऊण तास नयनमनोहरी नृत्याचा नजराणा अकाशात पेश करतात आणि पावणेसातच्या दरम्यान काही क्षणात आजूबाजूच्या शेतांमध्ये गुडूप होतात. पक्षीप्रेमी हा नृत्याविष्कार पाहण्यासाठी मुढाळे गावच्या माळरानाकडे धाव घेऊ लागले आहेत.
दख्खनच्या पठारावर सर्वत्र आढळणारी भोरडी (पळस मैना किंवा साळभोरडी) मुढाळे परिसराची शान बनली आहे. हा पक्षी दिसायला मैनेसारखा पण मैनेपेक्षा छोटा आहे. हे पक्षी अफगानिस्तान, पाकिस्तान या देशातून स्थलांतरित होऊन हिवाळी थंडीची मजा घेण्यासाठी मुढाळ्यात गेल्या काही वर्षांपासून येत आहेत. रोज सकाळी यांचे थवे वेगवेगळ्या दिशांनी 30 किलोमीटर लांबपर्यंत अन्नाच्या व किटकांच्या शोधात जातात. दुपारी दाट सावलीत किंवा खुरट्या झुडपात राहतात. सायंकाळी साडेपाच-सहाच्या दरम्यान मुढाळे येथील अधिवासाकडे थव्याथव्यांनी परततात. सुरुवातीला पाच-पन्नास भोरड्यांचे थवे येतात आणि प्रचंड मोठ्या आकाराचे एकत्रित थवे तयार होतात. हे थवे मग एकत्र येतात, विभक्त होतात आणि पुन्हा एकत्र येतात. वेगवेगळे आकार घेत गिरक्या घेतात. त्यांचा चिवचिवाट आणि नृत्य पाहून साळुंक्या, कावळे यांना धडकी भरलेली दिसते आणि ते आपापल्या अधिवासावर गुपचूप बसलेले दिसतात. वेगवेगळे नृत्याविष्कार झाल्यानंतर पावणेसातच्या दरम्यान अचानक शेवटच्या काही मिनिटात सर्वच्या सर्व भोरड्या ऊस, ज्वारी यामध्ये किंवा या पिकाशेजारी गेल्यावर पुन्हा अर्धा-पाऊण तास त्यांची कुजबुज ऐकू येते. मग सकाळपर्यंत सर्व रान शांत होऊन जाते या गोष्टींचे आसपासच्या शेतकऱ्यांना कौतुक वाटत आहे.
येथील श्यामराव मुळीक हे ज्येष्ठ गृहस्थ म्हणाले, "यंदा मायंदाळं पक्षी आल्यात. मागच्या साली दुष्काळामुळे नव्हतं आलं." त्यांचा डाव बघण्यासारख असतो. तर विठ्ठल मुळीक म्हणाले, थंडीत येत्यात अन् उन्हाळ्याच्या आधी पक्षी निघून जात्यात.
मुढाळे गावातील सोमेश्वर हायस्कूलपासून पश्चिमेला कच्च्या रस्त्याने जावे लागते. या ठिकाणी पक्षी व पर्यावरणप्रेमी लोक भेट देऊन पक्ष्यांचा नयनरम्य सोहळा अनुभवत आहेत. नुकतेच मराठी व तामीळ चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे, नऱ्हेचे सरपंच राजाभाऊ वाडेकर, पुण्याचे नगरसेवक राजाभाऊ बराटे यांनी हा सोहळा पाहून अद्भूत, अप्रतिम म्हणत हे वैभव जपले पाहिजे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केली.
पक्षी तज्ज्ञ डॉ.महेश गायवाड म्हणाले, मुढाळे व लोणी-भापकर परिसरात जलसंधारणामुळे पाणीसाठा वाढल्याने आणि ज्वारची पेरणी चांगली झाल्याने भोरड्यांची संख्या वाढली आहे. ती धान्याच्या पिकांना थोडाफार त्रास देत असली तरी शेतीसाठी उपयुक्त आहे. ऑक्टोबरमध्ये हे पक्षी येथे वास्तव्यास येतात. याच कालावधीत कीटकांचे मिलन होऊन मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असते. भोरड्याच यांच्या वाढीला आळा घालतात आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टाळतात. एक अळी चोवीस तासात तिच्या वजनाच्या दोनशे पट पीक खाते. शंभर अंड्यांचे अनेक कोष उत्प्न्न करते. त्यातून निर्माण होणारे लाखो कीटक खाण्यासाठी भोरड्यांची आवश्यकता आहे. त्या पानांतून, गवतातून, ज्वारी-बाजरीच्या पिकातून कीटक शोधून फस्त करतात. त्या बाहेरून येत असल्याने इतर पक्ष्यांवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी कसरती करतात.
मुढाळ्याला कसे जावे -
पुणे येथून स्वारगेट वरुन बारामती साधारण 110 किलोमीटर आहे. बारामतीमधून वडगाव व तेथून उजव्या बाजूला अवघ्या 6 किलोमीटरवर मुढाळे आहे. अथवा पुण्याहून अष्टविनायकमधील मयुरेश्वराचे मोरगाव 80 किलोमीटर आहे. तेथून पळशी व मुढाळे असा प्रवास करता येतो.
कुठे रहावे -
भोरड्या हे पक्षी सायंकाळी एकत्रित नृत्याविष्कार सादर करत असल्यामुळे दुपारी पुण्याहून निघून पुन्हा पुण्याला मुक्कामाला जाता येते अथवा मोरगाव तसेच बारामती येथेही तुलनेने स्वस्त राहण्याची सोय होवू शकते.
- संतोष शेंडकर, सोमेश्वरनगर, बारामती
संपर्क - 9011087479

निसर्गरम्य आंबोली
महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणची राणी असं आंबोलीला म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. जगप्रसिद्ध जैववैविध्य असलेले निसर्गरम्य ठिकाण अशी आंबोलीची आता ख्याती झालेली आहे. शांत आणि निसर्गरम्य अशा आंबोलीच्या परिसरात नैसर्गिक साधनसंपत्तीची भरभराट पाहायला मिळते. सह्याद्रीच्या ऐन कण्यावर वसलेले आंबोली पूर्वीपासूनच सावंतवाडी संस्थानचे थंड हवेचे ठिकाण होते. पर्यटकांनी आवर्जुन वर्षातल्या कोणत्याही ऋतूमध्ये भेट द्यावे असे हे ठिकाण आहे. उंचावरून पडणारे धबधबे आंबोलीच्या सौंदर्यात अजूनच भर घालत असतात.
समुद्रसपाटीपासून 690 मीटर उंचावर असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे सुंदर आणि रमणीय ठिकाण आहे. सगळा परिसर हा अगदी घनदाट अरण्याचा आहे आणि तिथे आपल्याला बरेच धबधबे पाहायला मिळतात. वर्षाऋतू मध्ये होणारा प्रचंड पाऊस इथल्या सगळ्या डोंगरांना हिरवागर्द शालू नेसवतो. साहजिकच इंग्रज राज्यकर्ते या ठिकाणाच्या प्रेमात पडले आणि कर्नल वेस्ट्रॉप यांनी आंबोलीला गिरिस्थानाचा दर्जा मिळण्यासाठी खूपच मेहनत घेतली. हिवाळ्यात सगळा परिसर हा धुक्याची दुलई पांघरून बसलेला असतो आणि उंचावरून कोसळणारे धबधबे आपल्या डोळ्याचे पारणे फेडतात.
नागरतास धबधबा, हिरण्यकेशी, सी व्ह्यू पॉईंट, महादेवगड ही ठिकाणे पर्यटकांनी कायमच गजबजलेली असतात. कावळेसाद पॉईंट वरून तर सह्याद्रीच्या अजस्त्र रंगांचे भेदक दर्शन होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहासह इतरही अनेक हॉटेल्स इथे उपलब्ध असून राहण्याबरोबरच खाण्याची सोय सुद्धा फार छान केलेली आहे.
ऐन पावसाळ्यामध्ये आंबोलीला भेट देण्यासारखी दुसरी मजा नाही. संपूर्ण परिसर अगदी दिवसभर धुक्यात लपेटलेला असतो. निसर्गाचा स्पर्श आपल्या मनाला अगदी मोहवून टाकतो आणि एक प्रकारची मनःशांती सहजच लाभते. हिरण्यकेशी नदीचा उगम हा खूप निसर्गसंपन्न आहे. तिथपर्यंत जाण्याचा रस्ता काहीसा कच्चा आहे पण तिथे गेल्यावर दिसणारे निसर्गाचे रूप केवळ अवर्णनीय. तिथे पार्वतीचे एक छोटेसे देऊळ असून हिरण्यकेशी नदी इथल्याच डोंगरातून उगम पावते. तासनतास इथे बसून रहावेसे वाटते. हिरण्यकेशी नदी इथून पुढे कर्नाटकातून वाहत जाते आणि तिथे तिला घटप्रभा हे नाव मिळाले आहे.
वनस्पती, फुले, फळे आणि प्राणिजीवन यांनी आंबोली अगदी समृद्ध आहे. रानडुकरे, बिबटे, चितळ, सांबर, भेकर, अस्वल, माकडं असं वन्यजीवन इथे दिसू शकते. सदाहरित जंगलात मैना, बुलबुल, धनेश, धोबी, चांदोल, राघू असे पक्षीसुद्धा मोठ्या संख्येने आहेत. हिरडा, जांभूळ, ऐन, अंजन, करवंद, तमालपत्र, शिकेकाई यांची दाट झाडी इथे आहे आणि त्याचबरोबर शेकडो रानफुले, नेची आणि अनेक आमरी यांचेही दर्शन सहज होते.
मुंबईपासून 492 किलोमिटरवर असलेल्या आंबोली येथे जाण्यासाठी पुणे, मुंबई, बेळगाव, कोल्हापूर इथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. तसेच रेल्वेने जाताना कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रोड या स्टेशनावर उतरावे. तेथून खाजगी वाहनाने आंबोलीस जाता येतं. प्रत्येक निसर्गप्रेमीने एकदा तरी आंबोलीला जरुर भेट द्यावी.
संकलन - विलास सागवेकर, उपसंपादक

सह्याद्रीचे नक्षत्र भिमाशंकर
महाराष्ट्राला सर्वात मोठे वरदान लाभले आहे ते सह्याद्रीच्या रूपात. निसर्गाने आपला खजिनाच जणू महाराष्ट्राला बहाल केला आहे. यामध्ये जसे हिरवाईने गच्च भरलेले पाचू आहेत तसेच उन्हात पिवळ्या किरणांनी उभे पुष्कराजासारखे बोडके डोंगरही आहेत. याच रांगेत आपली अंगभूत वैशिष्ट्ये जपत भिमाशंकर उभा आहे. एकाचवेळी निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुरेख मिलाफ या ठिकाणी बघायला मिळतो. या हिरव्या निसर्गाच्या सौंदर्यात, जगाच्या योग्याचे अर्थात शंकराचे स्थान ठेवण्याचे कवित्व निसर्गच करू शकतो.
भिमाशंकर...पश्चिम घाटातील कैलास जणू. निसर्गाची मुक्तहस्ताने उधळन केल्याने हा सगळा परिसर मंतरलेला वाटतो. शंकराच्या जटाच जणू जंगलाच्या रूपाने येथे वाढताहेत. भिमाशंकराच्या ओढीने श्रद्धाळू येथे येतातच पण निसर्गप्रेमीही येथे येतात. ट्रेकर्सना तर भिमाशंकरने नेहमीच भुरळ घातली आहे. पावसाळ्यात या भागाला भेट देणे हा एक अवर्णनीय आनंद असतो. प्रचंड कोसळणारा पाऊस, त्यातून निर्माण होणारे जलप्रवाह आणि आपल्या अंगोपांगी थेंबाचे मोती मिरविणारे जंगल यामुळे हा परिसर एक अद्भुत रूप घेतो. पण हे सौंदर्य टिपण्यासाठी तरुणाईचा उत्साह मात्र लागतो. त्यामुळे या परिसराला भेट द्यायची आहे आणि निसरड्यातून वाटही काढावी लागू नये यासाठी हिवाळा हा ऋतु सर्वात चांगला आहे. पाखरांची किलबिल, खारूताईंचे सरसर झाडावर चढणे आणि हिवाळी गारव्याने पानांची होणारी सळसळ अनुभवायची तर डिसेंबर-जानेवारीत या भागाला भेट द्यायला पाहिजे.
बारा ज्योतिर्लिंगामधील एक ठिकाण म्हणून भिमाशंकर मंदिराचे महत्त्व आहे. त्याचबरोबर येथील जंगलाला अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे येथील निसर्गसौंदर्याची आणि येथील नैसर्गिक साधनसंपत्तीची जपणूक झाली आहे. या जंगलात बिबट्यापासून रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर असे अनेक प्राणी आणि पक्षी आढळतात.
महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेली शेकरू ही खार या जंगलात आढळते. महाराष्ट्रातील चांदोली आणि भिमाशंकर येथेच ती जास्त करून आढळते. विशेष म्हणजे येथे आढणाऱ्या खारीला भिमाशंकरी खार असेही म्हटले जाते. तांबूस रंगाच्या या खारीचा विणीचा काळही डिसेंबर-जानेवारी असल्याने या महिन्यात भेट देणाऱ्यांना पिलांसह खार बघण्याचा योग येऊ शकतो. नैसर्गिक अधिवासात प्राण्यांना आपल्या पिलांसोबत बघण्याचा आनंद जंगलात जाऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्याशिवाय घेता येत नाही, त्याचे वर्णन डोळ्यांच्या पटलावर चित्र रेखाटूनच करायचे.
भिमाशंकरला रस्त्याने जायला पुणे-नगर रस्त्यावरच्या मंचरला फाटा आहे. मुंबईहून हे अंतर अडीचशे-पावणेतीनशे किमी एवढे आहे. पुण्याहून भिमाशंकर 168 किमी आहे. मुंबईहून जायला दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे कल्याणनगर रस्त्याने मुरबाड, माळशेज घाट पार करत आळेफाटा गाठायचे. पुढे पुण्याच्या दिशेला असलेल्या नारायणगावमार्गे मंचरला वळायचे. दुसरा मार्ग म्हणजे मुंबई-पुणे मार्गावरील लोणावळा ओलांडून तळेगावहून आतल्या रस्त्याने राजगुरूनगर मार्गे मंचर गाठायचं. मंचर-भिमाशंकर हे अंतर साधारण 70 किमी असून मार्ग दाट जंगलाचा व निर्जन आहे. कोकणातून भिमाशंकरला पायी जाण्याचा मुख्य मार्ग खांडसहून आहे. कर्जत खांडस अंतर सुमारे 14 किमी आहे. कर्जत-मुरबाड रस्त्यावर कशेळे आहे. इथून खांडसला जायचे वळण आहे. खांडसहून भिमाशंकरचा ट्रेक साधारण अकरा किमीचा खड्या चढणीचा आहे. इथूनदेखील वर जाणारे दोन मार्ग आहेत. दोन्ही वाटा डोंगराच्या पहिल्या पठारावर मिळतात. एक मार्ग ‘गणपतीघाट’ या नावाने ओळखला जातो. दुसरा मार्ग शिडीचा रस्ता म्हणून डोंगर भटक्यांना परिचित आहे. या मार्गातली तीन-चार ठिकाणे अतिधोकादायक आहेत. इथे दोन ठिकाणी कपरीत शिड्या लावलेल्या आहेत. ट्रेकींगची सवय असणाऱ्यांना या साहसी मार्गानेच जायला आवडते.
हिरव्याकंच पर्णभाराने लगडलेल्या वृक्षांवर गोड कुंजन करणारे बुलबुल, फुलाफुलांवर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे, आकर्षक रंगांनी मन आकर्षित करून घेणारे तऱ्हेतऱ्हेचे कीटक, या सर्वांचे निरीक्षण करणे हा अद्भुत अनुभव असतो. रोजच्या धकाधकीच्या शहरी जीवनाचा उबग आलेल्यांना तर हा परिसर म्हणजे नंदनवनच वाटावा, यात काहीच आश्यर्च नाही. नागफणी या उंच शिखरावरून आसपासच्या दऱ्याखोऱ्यांचे विहंगम दृश्य मनाला भुरळ पाडते. याच क्षेत्रातून भीमा नदीचा उगम होतो आणि आग्नेय दिशेने वाहत ती पुढे कर्नाटकातील रायचूरजवळ कृष्णा नदीत विलीन होते.
भीमाशंकर - महाराष्ट्रातल्या तमाम वारकरी संप्रदायाला पूज्य असलेली चंद्रभागा नदीचे मूळ येथील ज्योतिर्लिंगात आहे. येथे ती भिमा नावानेच उगम पावते पुढे पंढरपुरात चंद्रभागा म्हणून ओळखली जाते. ज्योतिर्लिंगात जरी ती उगम पावत असली तरी तिथून ती गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे 1.5 किमी. पूर्वेला पुन्हा प्रकटते. या जागेला गुप्त भिमाशंकर म्हणून ओळखले जाते.
कोकण कडा - भिमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा आहे. साधारणपणे 1100 मीटर इतकी त्याची उंची आहे. येथून अरबी समुद्रही दिसू शकतो. हे दृश्य अगदी विलोभनीय आहे.
सीतारामबाबा आश्रम - घनदाट जंगलाचा प्रवास करत दोन्ही बाजू आपल्या डोळ्यात साठवत, कोकणकड्यापासून पुढे गेल्यावर हे ठिकाण लागते. येथूनच नागफणीला जायला पायवाट आहे. समुद्रसपाटीपासून 1230 मीटरवर असलेल्या या नागफणीवरून दिसणारे दृश्य अतिशय विहंगम असे आहे. एखादा नाग फणा काढून उभारल्यावर जसा दिसेल तसे हे शिखर कोकणातून दिसत असल्याने याला नागफणी म्हटले जाते.
कसे जावे :पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकातून तसेच नारायणगाव किंवा मंचरहून एसटी बसेस भीमाशंकरला जातात. पुण्यापासून जवळ असलेले हे ठिकाण अंदाजे 125 किलोमीटर भरते. सकाळी लवकर निघून संध्याकाळपर्यंत एका दिवसात पुण्यात येता येण्यासारखे हे स्थळ आहे.
कोठे राहाल :
खासगी हॉटेल्स येथे भरपूर आहेत मात्र सलग सुट्ट्यांच्या काळात राहण्यासाठी अगोदरच जर आरक्षण करून ठेवले तर तेथे जादा पैसे आणि वेळ वाया जाणार नाही....

भिमाशंकर मंदिर
भिमाशंकर मंदिर नगारा शैलीत अठराव्या शतकात बांधण्यात आले आहे. त्याच्या बांधकामावर आर्य शैलीचा प्रभाव दिसून येतो. येथे महादेवाचे स्वयंभू लिंग आहे. पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीस यांनी मंदिराचे शिखर बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांनीही या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत दिल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. मंदिराच्या कोरीव दगडी खांबांवर पौराणिक देखावे खोदण्यात आले आहेत. मंदिराच्या आवारात शनिमंदिरही आहे. या क्षेत्राचा पुराणातही उल्लेख सापडतो.
- प्रवीण कुलकर्णी
- प्रवीण कुलकर्णी
कान्हा : भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प...
ज्यांच्या मनात एक भटक्या जिप्सी दडलेला आहे, ज्यांना निसर्गाची साद आणि समुद्राची गाज सदैव आमंत्रित करत असते; अशांसाठी मध्य प्रदेशातले कान्हा हे अभयारण्य म्हणजे एक पर्वणीच आहे. वनसंपदा आणि वन्यजीवसंपदा यांचा सुंदर व मुबलक मिलाफ जगाच्या पाठीवर अन्यत्र क्वचितच झाला असेल.
कान्हाला जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे गोंदिया मार्गाने. त्यासाठी कोल्हापूर-गोंदिया व्हाया पुणे दौंड मनमाडमार्गे जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस ही थेट गाडी आहे. तर दुसरा मार्ग आहे तो म्हणजे नागपूर-सिंवनी मंडलामार्गे कान्हा गाठणे. या दोन मार्गांपैकी नागपूर-छिंदवाडा, सिवनी मंडलामार्गे जाणे उत्तम. कारण या मार्गावर भरपूर ट्रेन्स, बसेस, खाजगी बसेस उपलब्ध आहेत. नागपूरहून मंडला सिवनी येथे मध्य प्रदेश परिवहनच्या बसेस जातात. त्याद्वारे किंवा नागपूर ते सिवनी ते मंडला अशी कटजर्नी करुनही आपण कान्हाच्या जवळ जाऊ शकतो. सिवनी-मंडला मार्गावर एक छोटेखानी गाव आहे. त्याचे नाव चरई डोंगरी, तिथे आपण उतरायचे. कान्हाला जाणारी बस पकडून कान्हाच्या प्रवेशद्वारी असणाऱ्या गावठाणात पोहोचायचे. हा मार्ग सोयीचा, पण वेळखाऊ आहे. कारण नागूपर ते चरई डोंगरी हे अंतर आठ तासांचे असले तरी कटजर्नीत ते १२ तासांचे होते. तिसरा मार्ग म्हणजे थेट जबलपूरला रेल्वेने जाणे व तेथून पहाटे कान्हा येथे येणारी बस पकडून येणे. हा मार्ग तसा सुलभ वाटला तरी नागपूर ते जबलपूर हा प्रवास व पुन्हा जबलपूर ते कान्हा हा प्रवास याचा वेळ लक्षात घेता नागपूरमार्गेच कान्हाला जाणे योग्य ठरते. आपण जर स्वतंत्र वाहनाने गेलात तर फारच उत्तम. मग नागपूर ते कान्हा हे अंतर सात-आठ तासांत आपण सहज पार करु शकतो.
कान्हाच्या जवळ एक छोटेसे गाव आहे. त्यात रिसॉर्टस् आहेत. सर्व सुखसोयींनी युक्त अशा रुम्स येथे उपलब्ध आहेत. सुग्रास जेवणही स्वस्तात मिळते. चहा-नाश्ता तर असतोच. स्वीट डिशची आवड असेल तर नजीकच्या ब्राम्हणी गावचा पेढा, कलाकंद बर्फी, बासुंदी, रबडी यापैकी हवे ते उपलब्ध होते किंवा करवून दिले जाते.
मावळत्या सूर्याच्या साक्षीने जंगल ट्रेक करायचा, पण तो छोटासाच. कारण जंगल घनदाट आहे. अंधार लवकर पडतो. आपले रिसॉर्ट जंगलात असते. रात्री लवकर जेवण आटोपून, बाहेर खूर्ची टाकून, चांदण्या रात्री जंगल निवासाचा आनंद मनमुराद लुटायची संधी साधावी. प्राण्याचे वेगवेगळे आवाज, कधी कानी येणारी वाघाची डरकाळी, रिसॉर्टमधील कोंबड्या, मांजरे वा तत्सम प्राण्यांच्या वासाने व पार रिसॉर्टच्या कुंपणालगत किंवा आपल्या दारा खिडक्यांपर्यंत येणाऱ्या बिबळ्या, कोल्ह्यांची कोल्हेकुई असा अरण्यमाहौल आपण एन्जॉय करु शकतो.
कान्हामध्ये पहाटे पाच ते दुपारी साडेबारा, दुपारी अडीच ते सायंकाळी साडेसहा अशा दोन राईडस् उपलब्ध असतात. त्यासाठी प्रशिक्षित वाहनचालक व गाईड उपलब्ध करुन दिलेले असतात. ओपन जिप्सी स्वरुपाच्या गाड्या त्यासाठी वापरल्या जातात. त्यांना हॉर्न, सायरन, इंडिकेटर, रिव्हर्स टोन असे काहीही नसते. कारण वाहनांच्या आवाजाने प्राण्यांना त्रास होऊ नये, म्हणून ही दक्षता. असे वाहन आपल्याला आदल्या दिवशीच सांगून ठेवावे लागते.
एवढ्या पहाटे अरण्यात जाणे या कल्पनेनेच आपण खूप एक्साईट झालेलो असतो. पण आपली ही एक्साईटमेंट कान्हाच्या गेटवर थोडी कमी होते. कारण परवाने घेणे, अर्ज भरणे यामध्ये किमान पाऊणतास जातो. त्यामुळे अरण्यात प्रत्यक्ष प्रवेशद्वारापर्यंत सहा सव्वासहा होतात. तोपर्यंत चांगले उजाडलेले असते. अंतिम प्रवेशद्वारी सर्व कागदपत्रांची तपासणी झाली की आपण कान्हात प्रवेश करतो. काय काय पहायला मिळेल, अशा विचारात असतानाच आपण घनदाट अरण्यात शिरतो. पक्ष्यांची किलबिल, माकडांचे तर्रकट कानी येत असते. एवढ्यात अरण्यातला एक मोर डौलात चालताना दिसतो. थोडे पुढे जावे तो आणखी काही मोर दिसतात. एखादा पिसारा फुलवून नाचत असतो. काही झाडावर बसलेले असतात, काही मस्ती करीत असतात. एकाचवेळी एवढे मोर मक्त अवस्थेत पाहून आपण पार वेडावून जातो. तिथून आपला पाय निघता निघत नाही. एवढ्यात हरणांचा एखादा मोठा कळप आपल्या जीप जवळून चौखूर उधळून जातो. एवढी हरणे आपल्या आसपास पाहिली की, आपण खऱ्या अर्थाने अरण्यात असल्याची जाणीव आपल्याला होते. थोडे पुढे गेले की, मग गव्यांचा कळप, कोल्ह्याची झुंड, चौशिंगे बारशिंगे, काळवीट यांचे कळप आपल्या अवती भोवती असतात. मध्येच एखादे अस्वलही दर्शन देऊन जाते. सुंदर पक्षी आपले लक्ष वेधून घेतात. एखादा गजराज आपल्याला खिळवून ठेवतो. पण आपल्याला ओढ असते ती वाघाला पाहण्याची. त्याच दिशेने आपले वाहन चालत असते. वाघ पाणी पिण्यास येण्याच्या, विसावण्याच्या अशा अनेक जागा या अभयारण्यात आहेत. पहाटे पर्यटकांच्या ज्या गाड्या सुटतात. त्या या वेगवेगळ्या जागांच्या दिशेने नेल्या जातात. जिथे वाघ दिसेल; तेथे गेलेले चालक खुणांनी अन्य चालकांना तेथे बोलावून घेतात. म्हणजे जास्तीत जास्त पर्यटकांना मुक्त वाघांचे दर्शन घडते. टीव्हीच्या पडद्यावर, पुस्तकातील छायाचित्रात पाहणाऱ्या व्याघ्रराजाला मुक्त - स्वच्छंद पाहून आपल्या कान्हाभेटीचे सार्थक होते. मात्र तुम्ही नशीबवान असात तर वाघोबा किंवा त्याचे कुटुंब तुम्हाला रस्त्यातही दर्शन देऊन जाते. तुम्हाला आडवे जाते. ते तुम्हाला कोणताही त्रास देत नाहीत. हे कोण बुवा आले ! अशी एक आश्चर्यमिश्रित नजर तुमच्याकडे टाकून वाघोबा शांतपणे निघून जातो. पुढे एकमेकांना टकरा देत, धूळ उडवणारे बारशिंगे, चौशिंगे, निलगाई अरण्यात दिसतात. ही अडीच तासाची मंदगतीची सफर असून, आपण उपहारगृहापाशी येतो.
वाघ जिथे असेल तिथून त्याला हत्तीवर बसलेल्या प्रशिक्षित वनरक्षकांकडून एका रिंगणात आणले जाते व त्याला खेळवले जाते. हा खेळ आपण आपल्या वाहनातूनच पाहायचा असतो. मात्र तुमचे नशीब जोरावर असेल तरच हा खेळ तुम्हाला पाहायला मिळतो. हरीण, वाघोबा दिसला तरच हा खेळ खेळता येतो. तो आज होणार की नाही याची सूचना सकाळी साडेनऊ-दहाला वायरलेसने दिली जाते. हा खेळ पाहणे हा एक अद्भूत आनंद आहे. तो संपेपर्यंत साडेअकरा होतात. परतीच्या वाटेवर आपल्याला झुळझुळणारे झरे, छोटासा धबधबा, चिमुकले तळे दिसते. ससे, खारी, माकडे आपल्याला सोबत करीत असतात. मध्येच ड्रायव्हर सांगतो, वो देखो घोस्ट ट्री. याने भूत का पेड !’ आपण क्षणभर हादरतो. सगळ्या फांद्या निष्पर्ण. त्यावरची साल पूर्णपणे झडून गेलेली. आतला पांढरा तुकतुकीत वर्ण उघडा पडलेला. जणू काही कुणी रंधा मारुन साफ करावा तसा.
चालक सांगतो, चांदनी रात हो, या काली रात हो, सफेद पेड बिल्कुल डरावना लगता है. इसलिये इसे घोस्ट ट्री कहते है. नागराज, ॲनाकोंडा वाटावा असे अजगर आपल्या वाटेत रास्तारोको करुन जातात. जवळपास 55 ते 79 किमीची जंगलातील सफर करुन आपण परततो, तेव्हा पोटात कावळे ओरडत असतात.
कान्हामधली दुपारची सैर त्यामानाने कमी उत्कंठावर्धक असते. म्हणून सकाळचा राऊंड घेणे हेच केव्हाही चांगले.
कान्हाला जाण्यासाठी हिवाळा हा ऋतू सर्वात उत्तम. ऑक्टोबर ते मार्च हा सिझन चांगला. कारण उन्हाळ्यात सुट्टया असल्या तरी प्राणी उन्हाच्या तडाख्याने फारसे बाहेर पडत नाहीत. तीच अवस्था पावसाळ्यात असते. हिवाळ्यात रानजंगल हिरवे असते. पाणी पिणे, शिकार, उन्हात बसणे अशा अनेक कारणांनी प्राणी बाहेर येत असतात. त्यामुळे त्यांचे दर्शन उत्तम घडते. कान्हापासून जवळच बेडाघाट आहे. संगमरवरी कडे सुळके व त्यातून रोरावत धावणारी, वाहणारी नर्मदा, तीमधून केलेली पौर्णिमेच्या रात्रीची सैर. अशी जोडून जर ट्रीप केली तर कान्हाच्या ट्रीपच्या आनंदावर चारचांद अगदी सहज लागून जातात.
- महेंद्र देशपांडे, नाशिकमो. 9422772020-21

सापुतारा : थंड हवेचे ठिकाण
“ निखरे यौवन सा यह ज्वारा
नाम है इसका सापुतारा ।
अपनी डगमगसे इतराता
‘भु’ को यु दिठीनी दिखलाता
मानो नि:शेष रमणीयतासे
प्रकृतिने इसका रुप संवारा ॥ ”
नाम है इसका सापुतारा ।
अपनी डगमगसे इतराता
‘भु’ को यु दिठीनी दिखलाता
मानो नि:शेष रमणीयतासे
प्रकृतिने इसका रुप संवारा ॥ ”
अरे... हो... आश्चर्य वाटले ना ! पण ही कोणा प्रेयसीवर लिहिलेली कविता नाही. ही कविता आहे एका नयनरम्य थंड हवेचे ठिकाण म्हणजे सापुतारावर खुश होऊन लिहिलेली एका निसर्गप्रेमी कवीची कविता आहे. गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेवर पर्वतांमध्ये वसलेल्या सापुताराला गुजरातचे रत्नजडित मुकूट किंवा ‘क्राऊनिंग ग्लोरी’ ची उपमा दिली तरी त्यात अतिशयोक्ती नाही.
दोन्ही बाजूंनी दाट जंगलांमधून चाललेल्या बसमधून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घेत आपण सापुतारा येथे पोहोचतो. सापुतारा या शब्दाचा अर्थ सापासारखा वळणावळणाचा रस्ता असा आहे. साप - उतार, म्हणजेच सापाचे निवासस्थान. वृद्धलोक येथील इतिहास सांगताना म्हणतात की, प्राचीन काळात येथे सर्पगंगानदी वाहत होती. ज्याला बांध घालून तळे बांधण्यात आले. उत्सवाच्या दिवशी अद्यापही आदिवासी लोक या तळ्यावर येऊन सापाची पूजा करतात.
डांगी लोकनृत्याने येथील लोक सणांची रंगत वाढवतात व त्यांची नृत्यकला जिवंत ठेवतात. पर्यटकांची शहरी संस्कृतीने उबलेली मनं आणि शरिराचा थकवा दूर करण्याचे पूर्ण सामर्थ्य सापुताऱ्यामध्ये आहे. नाशिकपासून 80 कि.मी. अंतरावर व मुंबईपासून 250 कि.मी.वर महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमेवर सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे 3600 फूट आहे.

सापुताऱ्यात काय पहाल ?
सापुतारा या थंड हवेच्या ठिकाणी सनराईज व सनसेट पॉईंट ही दोन मुख्य आकर्षणं आहेत. सूर्योदय बघण्यासाठी सनराईज पॉईंटवर पहाटे उठून जावे लागते. येथून उगवत्या सूर्याचे दर्शन अत्यंत विलोभनीय दिसते. तसेच संध्याकाळी सनसेटपॉईंटवर असंख्य पर्यटक गर्दी करतात. काही मिनिटांतच सूर्य क्षितिजाला टेकतो आणि पर्यटकांचे कॅमेरे धडाधड चालू होतात. काजव्याप्रमाणे चमकणाऱ्या फ्लॅशच्या लाईटमध्ये सूर्यास्त केव्हा होतो हे समजत नाही. सनसेटपॉईंटपासून समोरच्या डोंगरावर वैती हॉटेल असून या हॉटेलची दिमाखदार वास्तू चटकन नजरेत भरते. या दोन्ही डोंगरांना जोडणारा रोप-वे या हॉटेलने बसविलेला आहे. हा रोप-वे म्हणजे दोन्ही टोकांना जोडणारी एक जाड लोखंडी दोरी असून या दोरीवर चार माणसं बसतील अशा छोट्या-छोट्या केबीन आहेत. या केबीनमध्ये बसून तरंगताना अनोखा अनुभव येतो. केवळ चित्रपटांत पहावयास मिळणाऱ्या या रोप-वेमध्ये बसण्याचा अनुभव पर्यटकांना वैती हॉटेलने उपलब्ध करुन दिला आहे. हा रोप-वे सापुताऱ्याचे मुख्य आकर्षण आहे. गुजरात टुरिझमने येथे बोट क्लब चालू केला असून सापुताऱ्याच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या भव्य जलाशयात नौकाविहाराचा आनंद आपल्याला लुटता येतो. संथ पाण्यावर नौकेत बसून सफर करत आजूबाजूस सृष्टीसौंदर्य न्याहाळण्याचे सुख काही औरच असते.
याशिवाय स्टेपगार्डन, बॉटनिकल गार्डन, गुलाब उद्यान इत्याची बगीचे आहेत. सणावारास व सिझनमध्ये येथील आदिवासींचे नृत्य व संगीताचे कार्यक्रम होतात. त्यासाठी खुले नाट्यगृह आहे. सापुताऱ्याच्या मध्यभागी म्युझियम असून अनेक दुर्मिळ वस्तू पहावयास मिळतात. सापाच्या काही जाती, अजगर वगैरे जिवंत प्राणी येथे असून त्यांची विविध प्रात्यक्षिके दाखविली जातात. मधमाश्या पाळण्याचे केंद्र येथे असून शुद्ध मध व मधाची चिक्की येथे विकत मिळते.
‘लॉगहट’ हे संपूर्ण लाकडात बांधलेले गेस्ट हाऊस उंच डोंगरावर असून वनविभागाच्या अखत्यारित आहे. तेथून संपूर्ण सापुताऱ्याचे विलोभनीय दर्शन घडते. याशिवाय नागेश्वर मंदिर, स्वामी नारायण मंदिर, इको पॉईंट, स्टेपगार्डन, मत्स्यालय, डांगव्हॅली, ऋतुंबरा विश्वविद्यालय, वनस्पती उद्यान इ. पर्यटनस्थळे सापुतारा येथे आहेत. स्थळ दर्शनासाठी येथे खाजगी वाहने (कार,जीप इ.) भाड्याने उपलब्ध आहेत. सापुताऱ्याचं आणखी एक मुख्य आकर्षण म्हणजे टेबल लॅण्ड पॉईंट. हा पॉईंट वैती रोप वे रिसॉर्टच्या वरती असून हे प्रचंड मोठे मैदान सापुताऱ्यात सर्वात उंच ठिकाणावर आहे. येथून सनसेट अतिशय सुरेख दिसतो. त्यामुळे दुपारनंतर या पॉईंटवर पर्यटकांची खूप गर्दी होते. येथे घोडेस्वारी, उंटसवारी, एटीव्ही कार्स, घोडागाडी इ. सुविधा पर्यटकांना आकर्षित करतात. विविध स्टॉल्स असल्याने एकप्रकारचा पिकनीक स्पॉट म्हणून हे स्थळ लोकप्रिय आहे.
सापुताऱ्याच्याजवळ ‘उन्हाई’ हे गरम पाण्याचे झरे असून याबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे. ‘उन्हाई’ या गुजराथी शब्दाचा अर्थ मी स्नान केले असा असून राम, लक्ष्मण व सीतामाई वनवासाच्या काळात या जंगलात आले असता, येथील ऋषी व साधूंना कोडासारख्या त्वचारोगाची लागण झालेली त्यांना दिसली. हा रोग नाहीसा करावा असे सीतामाईने रामास सांगितले. तेव्हा रामाने लक्ष्मणास एक बाण मारण्यास सांगितले. त्याने जेथे बाण मारला तेथे एक झरा उत्पन्न झाला. हा झरा गरम पाण्याचा होता. ह्या झऱ्यात ह्या तिघांनी स्नान केले नंतर त्या साधू व ऋषींना आंघोळ करण्यास सांगितले. तेथे स्नान केल्यावर सर्वांचा त्वचारोग नाहीसा झाला. अशी आख्यायिका आहे. या परिसरात कोणालाही त्वचेचा रोग होत नाही असे सांगतात. ह्या झऱ्यातून बाराही महिने गरम पाणी येते व त्याचे तापमान 100 सें.ग्रे. इतके असते. सापुताऱ्यापासून जवळच 6 कि.मी. अंतरावर शिवाजी महाराजांनी बांधलेला हातगड किल्ला आहे. नाशिक मार्गे सापुताऱ्याला जाताना पन्नास कि.मी. अलीकडे महाराष्ट्राची कुलस्वामिनी व साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तश्रृंगी देवीचे स्थान लागते. या गडावर जाण्यासाठी पक्का रस्ता असल्याने गडावर जाण्यासाठी पक्का रस्ता असल्याने गडावर जाऊन देवीचे दर्शन घेता येते.

कोठे रहाल ?
सापुतारा येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी बजेट हॉटेल्सपासून थ्रीस्टार हॉटेलपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत. विविध सुखसुविधांनीयुक्त हॉटेल्स व धर्मशाळा येथे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. गुजरात टुरीझमद्वारा सापुतारा येथे तोरण व सह्याद्री ही हॉटेल उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे वैती रिसॉर्ट, चित्रकुट, पतंग, लॉर्डस्, लेक व्ह्यू, शिल्पी, स्टार हॉलिेडे होम यासारखी अनेक खाजगी हॉटेल्स वाजवी दरात उपलब्ध आहेत.
जाणार कसे ?
या पर्यटन केंद्रास जाण्यासाठी मुंबई, पुणे, शिर्डी, नाशिक, बलसाड, बिल्लीमोरा, सुरत येथून थेट बसेस आहेत. रेल्वेने येण्यासाठी नाशिकरोड (82 कि.मी.) व बिल्लीमोरा (112 कि.मी.) ही जवळची रेल्वे स्टेशन्स आहेत.
सापुताऱ्यास कधी जाल ?
सापुतारा हे जरी थंड हवेचे ठिकाण असले तरी येथील वातावरण संपूर्ण वर्षभर आल्हाददायक असते. म्हणून वर्षभरात केव्हाही येथे जाता येते. एप्रिल ते जुलै या दरम्यान पर्यटकांची गर्दी सर्वात जास्त असते. होळी, रंगपंचमी, दिवाळी, नाताळ, संक्रांत इ. सणांना येथे खास उत्सव साजरे केले जातात.
पावसाळ्याचा सिझन तर सापुताऱ्यातील सर्वात नयनरम्य सिझन असतो. ढग, पाऊस व धुक्याचा अनोखा व अदभूत अनुभव तेथे पर्यटकांना अनुभवयास मिळतो. काश्मिरसारखा अदभूत अनुभव घेण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. याशिवाय ट्रेकिंगसाठी अनेक गड व किल्ले आहेत. म्हणून साहसी पर्यटनालाही येथे मोठा वाव आहे.
त्याच-त्याच पर्यटन स्थळांना भेटी देवून कंटाळलेल्या पर्यटकांना सापुतारा निश्चितच नवा अनुभव देईल.
- सौ. सुषमा पगारे,
नाशिक, मो. 8380016473

पर्यटकांना भावणारे पांचगणी
महाबळेश्वरच्या पूर्वेला २० कि.मी. अंतरावर पांचगणी हे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाबळेश्वरप्रमाणेच पांचगणी देखील सह्याद्री पर्वतरांगांच्या माथ्यावर असलेल्या सपाट मैदानावर वसले आहे. अल्हाददायक वातावरण व आरोग्यवर्धक हवामानामुळे पांचगणीला गिरीस्थानाचा दर्जा मिळाला आहे.
हिरवीगार वनसंपदा पांचगणीच्या सौंदर्यात भर घालते. येथील फळबागांमध्ये स्ट्रॉबेरी, ब्लॅक बेरी, रासबेरी या विदेशी फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. रानावनात डोलणारी रानगुलाबांची फुले आपले लक्ष वेधून घेतात. पांचगणी डोंगरावरुन उत्तर दिशेला कृष्णा नदीचे खोरे व धोम धरण, कृष्णासागर जलाशय, कौलारु घरांची खेडी त्याच्याभोवतालची हिरवीगार शेती, आजुबाजुचे डोंगर व गड यांचे अतिशय विलोभनीय दृश्य दिसते. येथील आरोग्यदायी हवामानामुळे येथे इंग्रजी माध्यमाची २० ते २५ निवासी विद्यालये आहेत. पर्यटकांसाठी उपहारगृहे, भोजनालये व निवासालये हा इथला प्रमुख उद्योग. येथे लहान-मोठी अशी सर्व मिळून ४५ हॉटेल्स व लॉजेस आहेत. त्याचबरोबर चर्मोद्योग, फळांचे मुरंबे बनविणे, मध संकलन, दूध उत्पादन, दुधाची उत्पादने बनविणे हे उद्योगही चालतात. मनोरंजनासाठी येथे उद्याने, क्लब व वाचनालय आहे. काही बँका व पतसंस्था आहेत. येथील निसर्गसुंदर परिसरात सतत कोणत्या ना कोणत्या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असते.
पांचगणीचा इतिहास : महाबळेश्वर तालुक्यातील पांचगणी या गावाचा इतिहास अगदी अलिकडचा म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनचा आहे. पांचगणी गावाचा काही प्रमाणात विकास झाला असून, त्याला खेडे म्हणता येणार नाही. परंतू ते मोठे शहरही नाही. पांचगणीच्या आजूबाजूला दांडेघर, गोडवळी, आमराळ, राजपूरी, भिलार अशी खेडेगावे आहेत ती पांचगणी पेक्षाही जुन्या काळापासून आहेत.
राजपुरीच्या गुहा, गोडवळीचे शिवमंदिर, दांडेघरचे केदारेश्वरचे मंदिर यावरुन या ठिकाणी मध्यकाळी किंवा त्यापूर्वीपासूनही वस्ती असावी असे वाटते. पांचगणी हे १८५० पासून वसण्यास सुरुवात झाली. येथे असलेल्या अल्हाददायक वातावरण व थंड हवेमुळे येथे वस्ती वाढत गेली. जॉन चेसन या निवृत्त ब्रिटीश अधिकाऱ्यास पांचगणीचे संस्थापक मानतात. १८५२ मध्ये त्यांनी आपले निवासस्थान बांधून शेतीला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू प्रचार व प्रसारामुळे ब्रिटिशांनी येथे वसाहत स्थापन केली.
पांचगणीतील प्रेक्षणीय स्थळे : टेबल लँड-पांचगणी गाव ज्या डोंगराच्या कुशीत लपले आहे. तो डोंगर म्हणजे टेबल लँड डोंगर होय. याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या माथ्यावर चार कि.मी.चे सपाट मैदान आहे.
सिडनी पॉईंट : पांचगणीच्या पूर्वेकडच्या जकातनाक्यावरुन उत्तर दिशेला थोड्या अंतरावर एक टेकडी आहे. त्या टेकडीचा गोलगोल वर जाणारा रस्ता चढल्यावर माथ्यावर एक स्तंभ दिसतो. हाच तो सिडनी पॉईंट होय.
डोसी पॉईंट : येथील चेसनरोडवर फायर टेंपल आहे. त्याच्या समोरच्या बाजूला डोसी पॉईंट आहे.
मेहेर बाबाची गुहा : काच बावडीच्या पश्चिमेस जवळच मेहेर बाबाची गुहा आहे. येथे संत मेहेरबाबा राहत असत.
बेबी पॉईंट : पांचगणीहून महाबळेश्वरकडे जाताना गांवापासून फक्त १५० मी. अंतरावर बेबी पॉईंट आहे.
पारशी पाईंट : काच बावडीच्या पश्चिमेला ४०० कि.मी अंतरावर पारशी पॉईंट आहे. महाबळेश्वर रस्त्यालगत असलेला हा पॉईंट पाचगणीपासून २ कि.मी. अंतरावर आहे.
भिलारच्या फळबागा : पांचगणीपासून ६ कि.मी. अंतरावर भिलार हे खेडेगांव असून येथील गुलाबाच्या बागा, स्ट्रॉबेरी, रासबेरीचे मळे पाहण्यासारखे आहेत. याशिवाय केदारेश्वर मंदिर, कार्तिक स्वामींची गुहा, मालाज् फूड, प्रोडक्टस् आदि प्रेक्षणीय स्थळांमुळे पांचगणी पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे.
साबळे फार्म : पांचगणीच्या पायथ्याशी धोम धरणाच्या काठाशी कौटुंबिक सहलिचे निसर्गरम्य ठिकाण म्हणून हॉटेल शिवहेम (साबळे फार्म) ला अवश्य भेट द्यावी. येथे राहण्याची उत्तम सोय असून घरगुती पद्धतीचे शाकाहारी व मांसाहारी जेवन मिळते. साबळे फार्म सुप्रसिद्ध शाहीर साबळे यांनी निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी बांधला आहे.
- महेंद्र देशपांडे, नाशिक, मो.9422772020-21

Meena Khaladkar-Lama,Rajesh Khadke,Raj Lama
Posted by
rajeshkhadke
on Sunday, 17 January 2016
/
Comments: (0)
गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध उनपदेव
जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर उनपदेव हे तीर्थक्षेत्र आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गरम पाण्याचे झऱ्यासाठी हे तीर्थक्षेत्र प्रचलित आहे. उनपदेव हे नाव खान्देशातील अहिराणी या बोलीभाषेतून प्राप्त झालेले आहे. उनपदेवाचा परिसर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असल्याने निसर्गाचा अनमोल ठेवा श्रीक्षेत्र उनपदेवाला लाभला आहे. सातपुडाच्या पर्वतरांगात असलेल्या उनपदेवाचा परिसर डोगरांनी हिरवळीचा शालू परिधान केल्याने पर्यटकांना आकर्षित करतो.
विविध प्रकारच्या दुर्मिळ वनौषधी वनस्पतींनी हा परिसर व्यापला आहे. या परिसरात सर्प, हरिण, मोरल, तडस, निलगाय, लानडोर आदि वन्य प्राणी पर्यटकांमध्ये लक्ष वेधून घेतात. पौराणिक महत्त्व असलेले हे तिर्थक्षेत्र प्रभू हरिश्चंद्र व श्री शरभंग ऋषिंच्या पदस्पर्शाने पुनीत झाले असून ह्याचा उल्लेख महर्षी वाल्मीकींनी मूळ रामायणात शरभंगस्थ सदेह स्वर्ग गमन असा केला आहे. गोमुखातून वाहणारे गरम पाणी सतत कसे वाहाते? पाण्याची उष्णता कमी अधिक का होत नाही ? असे कुतुहल निर्माण करणारे प्रश्न भेट देणाऱ्या पर्यटकांच्या मनात निर्माण होतात.
14 वर्षे वनवास भोगत असतांना प्रभू रामचंद्र येथे आले असता त्वचा रोगाने पीडित शरभंग ऋषिसाठी बाण मारून श्रीरामांनी या गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती केली असल्याची अख्यायिका आहे. या गरम पाण्यांनी अंघोळ करून शरभंग ऋषिंनी पूर्ववत दिव्य शरीररूप प्राप्त झाल्याची माहीती तेथील ग्रामस्थ देतात. तर सातपुड्याच्या पर्वतरांगातील गंधकाच्या साठ्यातून या गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती झाली आहे म्हणून अव्याहतपणे वाहणारे पाणी उष्ण असते. तर गंधक हे त्वचा रोगावरील उपचारांस उपयुक्त असल्याने त्वचारोग दुरूस्ती करण्यासाठी नागरीक हे पाणी घेऊन जातात. असे शास्त्रज्ञांचे मत आहे. संपूर्ण पौष महिनाभर या तिर्थक्षेत्राच्या परिसरात यात्रा भरते महाराष्ट्र सह मध्यप्रदेश, गुजरात येथील भाविक यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होतात त्यामुळे यात्रा उत्सव काळात स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो.
सातपुड्याच्या पायथ्याशी हिरव्यागार सौंदर्याने नटलेल्या या तिर्थक्षेत्रास शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. शासनाच्या माध्यमातून येथे मनमोहक पॅगोडे, बगीचा, चिमुकल्यांसाठी मिनी ट्रेन, सभागृह, आर्कषक प्रवेशद्वार पर्यटकांसाठी आकर्षक ठरतात. तीर्थक्षेत्राच्या स्नान कुंडाच्या वरील बाजूस असलेले शरभंग ऋषिंची पुरातन गुंफा, श्रीमहादेव, गणपती, राम, लक्ष्मण, सितामाई, हनुमान यांचे मंदिर तसेच गोविंद महाराजांची समाधी म्हणून ओळख असणारी या उनपदेव या तिर्थक्षेत्रास भेट देणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. शासनाच्या विविध विभागाच्या योजनेतून या तिर्थक्षेत्रात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध कामे सुरू आहेत. एक दिवशीय पर्यटन स्थळ म्हणून उनपदेव हे नावारूपास आले असून या पर्यटनस्थळाला पर्यटक पसंती देत आहेत. वाढत्या पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार मिळत असून त्यांच्या धनसंचयातही वाढ होत आहे.

सारंगखेडा यात्रा अश्वप्रेमीसाठी एक पर्वणी
महाराष्ट्रातील अनेक यात्रा प्रसिद्ध असून नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील यात्रा ही घोडेबाजारासाठी प्रसिद्ध आहे. ह्या यात्रेत निरनिराळ्या प्रकारचे घोडे दाखल होतात. सारंगखेडा येथे असलेल्या पुरातन दत्त स्वामी मंदिराच्या यात्रोत्सवात हा घोडे बाजार भरतो. शिरपूर तालुक्यातील भरवाडे येथील नंदा पाटील यांना स्वप्न पडले. त्यात त्यांना एकमुखी दत्ताचे मंदिर हे सारंगखेडा येथे उभे करावे असे सांगितले गेले. सुमारे तीनशे वर्षापूर्वी नंदा पाटील या ग्रामस्थाने एकमुखी दत्ताची स्थापना करुन छोटसे मंदिर बांधले हेाते. कालांतरांने ग्रामस्थांनी मंदिर ट्रस्ट उभारुन लोकवर्गणीतून मंदिराचा जिर्णोध्दार केला. नंदा पाटील हे वारकारी संप्रदायाचे आणि महानुभाव पंथाचे असल्याने आजही मंदिर ट्रस्टच्या कार्यकारिणीमध्ये सर्व सदस्य हे महानुभाव पंथाचे आहेत. अनेक भाविक नवस फेडण्यासाठी या यात्रेत सहभागी होतात.
ही यात्रा घोडे बाजारासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या समोरच्या परिसरात हा घोडाबाजार भरतो. जिल्हा परिषद उपाध्यक्ष रावल यांच्या 20 एकर जागेवर हा घोडे बाजार भरला जातो. कृषी बाजार समिती व ग्रामपंचायतीचे कर्मचारी यात्रोत्सवासाठी झटतात. घोड्यांच्या देखरेखीसाठी जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागाचे कर्मचारी उपस्थित असतात. देशभरातून जवळपास 2000 ते 3000 घोडे विक्रीसाठी दरवर्षी यात्रेत विक्रीसाठी येतात. साधारणत: 40 हजारपासून घोडे खरेदीला बोली लावली जाते. अनेक अश्वप्रेमी ह्या घोडे बाजारासाठी बोली लावतात. आतापर्यंत 75 लाख रूपयांपर्यंत एका घोड्याची बोली लागली गेली आहे. यावरुन या यात्रेत होणारी उलाढाल व अश्वप्रेमीच्या आवडीची प्रचिती नक्कीच येते.
सारंगखेड यात्रेतील घोड्यांमध्ये देवमान, कंठळ, जयमंगल, शामकर्ण, काळा, पाच कल्याणी हे गुणवान घोडे सर्वात मोठ्या प्रमाणावर अश्वप्रेमी खरेदी करतात. तर घोड्याच्या नाकावर पांढरे चट्टे, दोन भवरी असलेले, पोटाखाली भवरा असलेले, गळ्यावर भोवरा असलेले घोडे अश्वप्रेमी नाकारतात. या ठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान या भागातून घोडे विक्रीसाठी येतात. पंधरा दिवसाच्या या यात्रोत्सवात करोडो रूपयांची उलाढाल होते.
यात्रोत्सवाच्या निमित्ताने भरलेल्या घोडे बाजारात घेाडे खरेदीसाठी व आनंद लुटण्यासाठी अनेक सिने कलावंतही सहभागी होतात. अनेक राजकीय पक्षांचे नेतेही हजेरी लावतात. संपूर्ण भारतात घोडे बाजारासाठी या यात्रेची ओळख निर्माण झाली आहे.
- निलेश परदेशी, चाळीसगाव

सजीवपणाशी साधर्म्य साधणारे मेणाचे पुतळे : सुनिल्स वॅक्स म्युझियम, लोणावळा
लंडनला मादाम तुसाँचे मेणापासून बनविलेल्या पुतळ्यांचे म्युझियम आहे व जगभरातून त्याला भेट देण्यासाठी प्रेक्षकांचा ओघ असतो. भारतरत्न सचिन तेंडुलकर, महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या रॉय-बच्चन व अन्य काही भाग्यवान प्रज्ञावंत भारतीयांना या म्युझियममध्ये आपले मेणाचे पुतळे बनविले जाण्याचा बहुमान लाभला आहे. पण प्रत्येकाला हे पुतळे पाहण्यासाठी लंडनला जाणे शक्य नसते. आता भारतातच नव्हे, महाराष्ट्रात अगदी आपल्या पुणे जिह्यातच आता असे म्युझियम उभे राहिले आहे.
मुंबईपासून अंदाजे 100 किलोमीटर व पुण्यापासून अवघ्या 55 किलोमीटर अंतरावर सुनिल्स सेलिब्रेटी वॅक्स म्युझियम उभारण्यात आले आहे. मुंबईकडून पुण्याकडे जाताना लोणावळा शहरापुढील एक्सप्रेस हायवे नजिक येणाऱ्या वरसोली गावाजवळील टोल नाक्यापूर्वी जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर हे म्युझियम लागते. एप्रिल 2010 पासून हे म्युझियम प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले आहे. जेम्स बाँड, मायकेल जॅक्सन, मदर तेरेसा, बेनझीर भुत्तो, महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू अशा अनेक विक्रमी नामवंतासह अण्णा हजारे, महम्मद रफी, कपिल देव, प्रभु देवा, अमरीश पुरी, ए. आर. रेहमान, शरद पवार, छगन भुजबळ, श्री श्री रविशंकर, राजीव गांधी यांच्या प्रमाणेच इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मेणाचे पुतळे येथे बनवून प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आले आहेत. मुळचे केरळ राज्यातील अलेप्पी गावचे असणाऱ्या सुनिल कन्डाल्लूर यांनी आपल्या हातांनी या मेणाच्या पुतळ्यांना साकारले आहे. 1992-93 च्या सुमारास त्यांनी केरळमधील खासगी संस्थेतून फाईन आर्ट मधील पदविका संपादन केली. 1998 साली सुनिल यांना सर्वप्रथम श्रीकृष्णाचा मेणाचा पुतळा बनवून आपल्यातील कलाकाराचा परिचय दिला. हा पुतळा अनेकांना आवडल्यानंतर त्यांना आपले ध्येय सापडले व मग झपाटून जात एका मागोमाग एक त्यांनी मेणाच्या पुतळ्यांना आकार दिला. यासाठी प्रामुख्याने पॅराफिन वॅक्स या प्रकाराचे मेण लागते अशी माहिती त्यांनी दिली. त्याच्या सोबतीला मग फायबर, प्लास्टर ऑफ पॅरिस, अन्य रसायनांचाही वापर करण्यात येतो. एक पुतळा साकारण्यासाठी साधारणपणे एक महिनाभराचा अवधी लागतो असे त्यांनी नमूद केले. या पुतळ्यांना कपडे, केस, टोपी, छडी, शाल, खुर्ची, फुले, पदके आदि साधनांची जोड देऊन इतके हुबेहुब बनविण्यात आले आहे की पाहणारे थक्क होतात. या पुतळ्यांसोबत स्वतःची छायाचित्रे घेण्यासाठी हौशी प्रेक्षकांत चढाओढ लागत असल्याचे पहायला मिळते.
सुनिल वॅक्स म्युझियममध्ये सद्यस्थितीत एकूण 7000 चौरस फूट असणाऱ्या जागेत मेणाचे असे 50 पुतळे ठेवण्यात आले आहेत. प्रारंभी या म्युझियमसाठी प्रति माणशी 100/- रुपये शुल्क आकारण्यात येत असे. आता ते प्रति माणशी 150/- रुपये करण्यात आले आहे. प्रेक्षकांमधील कुणी पुतळ्यांना हात लावून धोका पोहचवू नये यासाठी रक्षक ठेवून काळजी घेण्यात येते. हे म्युझियम संपुर्णतः वातानुकुलित आहे. म्युझियमजवळच अल्पोपहार, पार्किंग, प्रसाधन यांची व्यवस्था उपलब्ध आहे. लवकरच असे म्युझियम मुंबईकरांना जवळच पाहता यावे यासाठी सुनिल कण्डाल्लूर यांचे प्रयत्न सुरु असून दक्षिण मुंबईत तशा प्रकारच्या जागेसाठी त्यांची शोधाशोध सुरु आहे. या मेणाच्या पुतळ्यांच्या डोळ्यांमधील जीवंतपणा चेहऱ्यावरील भाव, हातांवरील सुरकुत्या व पेहरावातील नेमकेपणा त्या त्या व्यक्तिमत्वांच्या इतका जवळ जाणारा आहे की आपण प्रत्यक्षच जणू त्यांना भेटतो आहेत असे वाटावे असे अनोखे कसब सुनिल कण्डाल्लूर यांना साधले आहे.
- राजेंद्र घरत,
संपादक, दीपवार्ता,
भ्रमणध्वनी : 7208046564
ई-मेल : deepvarta@gmail.com