महाराष्ट्राला सर्वात मोठे वरदान लाभले आहे ते सह्याद्रीच्या रूपात. निसर्गाने आपला खजिनाच जणू महाराष्ट्राला बहाल केला आहे. यामध्ये जसे हिरवाईने गच्च भरलेले पाचू आहेत तसेच उन्हात पिवळ्या किरणांनी उभे पुष्कराजासारखे बोडके डोंगरही आहेत. याच रांगेत आपली अंगभूत वैशिष्ट्ये जपत भिमाशंकर उभा आहे. एकाचवेळी निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुरेख मिलाफ या ठिकाणी बघायला मिळतो. या हिरव्या निसर्गाच्या सौंदर्यात, जगाच्या योग्याचे अर्थात शंकराचे स्थान ठेवण्याचे कवित्व निसर्गच करू शकतो.
भिमाशंकर...पश्चिम घाटातील कैलास जणू. निसर्गाची मुक्तहस्ताने उधळन केल्याने हा सगळा परिसर मंतरलेला वाटतो. शंकराच्या जटाच जणू जंगलाच्या रूपाने येथे वाढताहेत. भिमाशंकराच्या ओढीने श्रद्धाळू येथे येतातच पण निसर्गप्रेमीही येथे येतात. ट्रेकर्सना तर भिमाशंकरने नेहमीच भुरळ घातली आहे. पावसाळ्यात या भागाला भेट देणे हा एक अवर्णनीय आनंद असतो. प्रचंड कोसळणारा पाऊस, त्यातून निर्माण होणारे जलप्रवाह आणि आपल्या अंगोपांगी थेंबाचे मोती मिरविणारे जंगल यामुळे हा परिसर एक अद्भुत रूप घेतो. पण हे सौंदर्य टिपण्यासाठी तरुणाईचा उत्साह मात्र लागतो. त्यामुळे या परिसराला भेट द्यायची आहे आणि निसरड्यातून वाटही काढावी लागू नये यासाठी हिवाळा हा ऋतु सर्वात चांगला आहे. पाखरांची किलबिल, खारूताईंचे सरसर झाडावर चढणे आणि हिवाळी गारव्याने पानांची होणारी सळसळ अनुभवायची तर डिसेंबर-जानेवारीत या भागाला भेट द्यायला पाहिजे.
बारा ज्योतिर्लिंगामधील एक ठिकाण म्हणून भिमाशंकर मंदिराचे महत्त्व आहे. त्याचबरोबर येथील जंगलाला अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे येथील निसर्गसौंदर्याची आणि येथील नैसर्गिक साधनसंपत्तीची जपणूक झाली आहे. या जंगलात बिबट्यापासून रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर असे अनेक प्राणी आणि पक्षी आढळतात.
महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेली शेकरू ही खार या जंगलात आढळते. महाराष्ट्रातील चांदोली आणि भिमाशंकर येथेच ती जास्त करून आढळते. विशेष म्हणजे येथे आढणाऱ्या खारीला भिमाशंकरी खार असेही म्हटले जाते. तांबूस रंगाच्या या खारीचा विणीचा काळही डिसेंबर-जानेवारी असल्याने या महिन्यात भेट देणाऱ्यांना पिलांसह खार बघण्याचा योग येऊ शकतो. नैसर्गिक अधिवासात प्राण्यांना आपल्या पिलांसोबत बघण्याचा आनंद जंगलात जाऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्याशिवाय घेता येत नाही, त्याचे वर्णन डोळ्यांच्या पटलावर चित्र रेखाटूनच करायचे.
भिमाशंकरला रस्त्याने जायला पुणे-नगर रस्त्यावरच्या मंचरला फाटा आहे. मुंबईहून हे अंतर अडीचशे-पावणेतीनशे किमी एवढे आहे. पुण्याहून भिमाशंकर 168 किमी आहे. मुंबईहून जायला दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे कल्याणनगर रस्त्याने मुरबाड, माळशेज घाट पार करत आळेफाटा गाठायचे. पुढे पुण्याच्या दिशेला असलेल्या नारायणगावमार्गे मंचरला वळायचे. दुसरा मार्ग म्हणजे मुंबई-पुणे मार्गावरील लोणावळा ओलांडून तळेगावहून आतल्या रस्त्याने राजगुरूनगर मार्गे मंचर गाठायचं. मंचर-भिमाशंकर हे अंतर साधारण 70 किमी असून मार्ग दाट जंगलाचा व निर्जन आहे. कोकणातून भिमाशंकरला पायी जाण्याचा मुख्य मार्ग खांडसहून आहे. कर्जत खांडस अंतर सुमारे 14 किमी आहे. कर्जत-मुरबाड रस्त्यावर कशेळे आहे. इथून खांडसला जायचे वळण आहे. खांडसहून भिमाशंकरचा ट्रेक साधारण अकरा किमीचा खड्या चढणीचा आहे. इथूनदेखील वर जाणारे दोन मार्ग आहेत. दोन्ही वाटा डोंगराच्या पहिल्या पठारावर मिळतात. एक मार्ग ‘गणपतीघाट’ या नावाने ओळखला जातो. दुसरा मार्ग शिडीचा रस्ता म्हणून डोंगर भटक्यांना परिचित आहे. या मार्गातली तीन-चार ठिकाणे अतिधोकादायक आहेत. इथे दोन ठिकाणी कपरीत शिड्या लावलेल्या आहेत. ट्रेकींगची सवय असणाऱ्यांना या साहसी मार्गानेच जायला आवडते.
हिरव्याकंच पर्णभाराने लगडलेल्या वृक्षांवर गोड कुंजन करणारे बुलबुल, फुलाफुलांवर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे, आकर्षक रंगांनी मन आकर्षित करून घेणारे तऱ्हेतऱ्हेचे कीटक, या सर्वांचे निरीक्षण करणे हा अद्भुत अनुभव असतो. रोजच्या धकाधकीच्या शहरी जीवनाचा उबग आलेल्यांना तर हा परिसर म्हणजे नंदनवनच वाटावा, यात काहीच आश्यर्च नाही. नागफणी या उंच शिखरावरून आसपासच्या दऱ्याखोऱ्यांचे विहंगम दृश्य मनाला भुरळ पाडते. याच क्षेत्रातून भीमा नदीचा उगम होतो आणि आग्नेय दिशेने वाहत ती पुढे कर्नाटकातील रायचूरजवळ कृष्णा नदीत विलीन होते.
भीमाशंकर - महाराष्ट्रातल्या तमाम वारकरी संप्रदायाला पूज्य असलेली चंद्रभागा नदीचे मूळ येथील ज्योतिर्लिंगात आहे. येथे ती भिमा नावानेच उगम पावते पुढे पंढरपुरात चंद्रभागा म्हणून ओळखली जाते. ज्योतिर्लिंगात जरी ती उगम पावत असली तरी तिथून ती गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे 1.5 किमी. पूर्वेला पुन्हा प्रकटते. या जागेला गुप्त भिमाशंकर म्हणून ओळखले जाते.
कोकण कडा - भिमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा आहे. साधारणपणे 1100 मीटर इतकी त्याची उंची आहे. येथून अरबी समुद्रही दिसू शकतो. हे दृश्य अगदी विलोभनीय आहे.
सीतारामबाबा आश्रम - घनदाट जंगलाचा प्रवास करत दोन्ही बाजू आपल्या डोळ्यात साठवत, कोकणकड्यापासून पुढे गेल्यावर हे ठिकाण लागते. येथूनच नागफणीला जायला पायवाट आहे. समुद्रसपाटीपासून 1230 मीटरवर असलेल्या या नागफणीवरून दिसणारे दृश्य अतिशय विहंगम असे आहे. एखादा नाग फणा काढून उभारल्यावर जसा दिसेल तसे हे शिखर कोकणातून दिसत असल्याने याला नागफणी म्हटले जाते.
कसे जावे :पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकातून तसेच नारायणगाव किंवा मंचरहून एसटी बसेस भीमाशंकरला जातात. पुण्यापासून जवळ असलेले हे ठिकाण अंदाजे 125 किलोमीटर भरते. सकाळी लवकर निघून संध्याकाळपर्यंत एका दिवसात पुण्यात येता येण्यासारखे हे स्थळ आहे.
कोठे राहाल :
खासगी हॉटेल्स येथे भरपूर आहेत मात्र सलग सुट्ट्यांच्या काळात राहण्यासाठी अगोदरच जर आरक्षण करून ठेवले तर तेथे जादा पैसे आणि वेळ वाया जाणार नाही....

भिमाशंकर मंदिर
भिमाशंकर मंदिर नगारा शैलीत अठराव्या शतकात बांधण्यात आले आहे. त्याच्या बांधकामावर आर्य शैलीचा प्रभाव दिसून येतो. येथे महादेवाचे स्वयंभू लिंग आहे. पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीस यांनी मंदिराचे शिखर बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांनीही या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत दिल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. मंदिराच्या कोरीव दगडी खांबांवर पौराणिक देखावे खोदण्यात आले आहेत. मंदिराच्या आवारात शनिमंदिरही आहे. या क्षेत्राचा पुराणातही उल्लेख सापडतो.
- प्रवीण कुलकर्णी
- प्रवीण कुलकर्णी
0 comments:
Post a Comment