नाशिक जिल्हा

नाशिक

नाशिक हे भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. जवळपास २००० लहानमोठी मंदिरे येथे पहावयास मिळतात. गोदावरीच्या तीवरावर वसलेल्या या प्राचीन शहरामध्ये दर १२ वर्षांनी एकदा सिंहस्थ कुंभमेळा भरतो.

देवळाली
नाशिकचे उपनगर असलेले देवळाली हे ठिकाण लष्करी प्रशिक्षण शाळांसाठी प्रसिद्ध आहे.

गंगापूर धरण
देशातील सर्वात मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक असलेल्या गंगापूर धरणाच्या परिसरात अतिशय सुंदर असे उद्यान आहे. तसेच हे एक पर्यटकांचे आवडते स्थान आहे.

पांडवलेणी
मुंबई-नाशिक महामार्गापासून केवळ ८ कि.मी. अंतरावरील ही लेणी १२० मीटर उंचीच्या टेकडीवर वसली आहेत.

त्र्यंबकेश्वर
देशातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे स्वाभाविकच महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव भरतो. तसेच दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ यात्राही भरते.

वणी सप्तश्रृंगी
साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेले वणी येथील सप्तश्रृंगी गडावरील देवीचे हे स्थान भाविकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

काळाराम मंदिर
पंचवटी भागात स्थित असलेले काळाराम मंदिर मध्यवर्ती बस स्थानका पासून 3 कि.मि.अंतरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी नाशिक शहरातून विविध ठिकाणाहून शहर बस सेवा व ऑटोरिक्षा उपलब्ध आहेत. काळाराम मंदीर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले. मंदिराच्या बांधकामासाठी 2000 कारागीर 12 वर्ष राबत होते. 245 फूट लांब व 145 फूट रुंद मंदिर परिसराला 17 फुट उंच दगडाची भिंत आहे.

खंडोबा मंदीर
देवळाली छावणी परिसरात लहान टेकडीवर खंडोबा मंदिर वसलेले आहे. भगवान शंकराचे अवतार मानले जाणारे श्री खंडोबा महाराजांचे हे मंदिर 500 वर्ष जुने आहे. या टेकडीला ‘खंडोबाची टेकडी’ असे देखील म्हणतात.

कावनई-कपिलधारा तिर्थ
हे तिर्थक्षेत्र इगतपुरी तालुक्यात असून नाशिक शहरापासून 50 कि.मी. अंतरावर स्थित आहे. इगतपुरी पासून कावनाईचे अंतर 12 कि.मी. आहे. श्री संत गजानन महाराज यांनी या परिसरात तपश्चर्या केली असे मानले जाते. हे ठिकाण कावनाई किल्ल्याच्या पायथ्याशी असून सभोवतालचा परिसर नयनरम्य आहे. कपिलधारा तिर्थ येथे विविध मंदीरे असून जवळच माता कामाक्षी मंदीर देखील आहे. या ठिकाणी वर्षभर वाहणारा नैसर्गिक पाण्याचा झरा देखील आहे.

कुशावर्त तिर्थ
कुशावर्त तिर्थ हे त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यभागी श्री त्र्यंबकेवर ज्योतिर्लिंग मंदिरा पासुन अदमासे 300 मी.अंतरावर स्थित आहे. कुशावर्त तिर्थ हे 21 फुट खोलीचे नैसर्गिक पाण्याचे झरे असलेले कुंड सन 1750 मध्ये बांधण्यात आले. गोदावरी नदी ब्रम्हगिरी पर्वतावरुन लुप्त झाल्यांनतर हया ठिकाणी प्रकट होते अशी काही लोकांची श्रध्दा आहे.

मांगी तुगी मंदिर
मांगी तुगी मंदीर नाशिक पासुन 125 कि.मि. अंतरावर सटाणा तालुक्यात आहे. समुद्रसपाटीपासुन 4343 फुट उंचीवर मांगी शिखर तर समुद्र सपाटीपासून 4366 उंचीवर तुंगी शिखर आहे. मांगी तुंगी हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. मांगी मांगी शिखराची उंची जास्त नसली तरी येथे सराईत गिर्यारोहकच चढू शकतात. शिखराच्या पायथ्याशी भगवान महावीर, अदिनाथ, पार्श्वनाथ, हनुमान, वाली, सुग्रीव इ. यांच्या 356 कोरीव मुर्ती आहेत. गुफांमध्ये देखील काही कोरीव काम आढळते. या ठिकाणी ‘मांगीगिरी मंदीर’ आहे. तुंगी तुंगी शिखर मांगी शिखरापेक्षा उंच आहे. या शिखराला देखील तुंगी शिखरासारखीच प्रदक्षिणा करता येते. प्रदक्षिणा मार्गावर तीन गुंफा आहे. त्या पैकी एका गुंफेत ‘तुंगीगिरी मंदीर’ असून भगवान बुद्धांच्या 99 कोरीव मूर्ती येथे आहेत

चांभारलेणे
"चांभारलेणे" हा 11 व्या शतकातील जैन मंदीरांचा समुह आहे. नाशिक शहराच्या बाह्य भागात रामशेज किल्ल्याजवळ एका टेकडीवर ही मंदिरे स्थित आहे.

तपोवन
तपोवन म्हणजे ‘तपस्वी लोकांचे वन’ हे ठिकाण नाशिक येथे पंचवटी पासुन 1.5 कि.मी.अंतरावर खालच्या बाजुस गोदावरी नदी तिरी आहे. तपोवन हे एकेकाळी दंडकारण्याचा भाग होता.

कैलास मठ / भक्तीधाम
हा आश्रम नाशिक येथील पंचवटी भागात स्थित असून यास ‘भक्तीधाम’ असे देखील म्हटले जाते. या ठिकाणी विविध देवतांची मंदिरे आहेत. ‘कैलास मठ’ हा जुना आश्रम असून या ठिकाणी वेद शिकविले जातात. परमपुज्य स्वामी हृदयानंद महाराज यांनी सन 1920 मध्ये या आश्रमाची स्थापना केली. सद्यस्थितीत आचार्य महामंडलेश्वर स्वामी संविदानंदजी स्वरस्वती येथील प्रमुख आहेत. श्रावण महिन्यात तेथे विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात.

मुक्तिधाम
मुक्तीधाम हे नाशिक शहरात नाशिक रोड रेल्वे स्टेशनजवळ स्थित आहे. या मंदिराचे बांधकाम पांढऱ्या रंगाच्या मकराणा संगमरवरी दगडांत केले आहे. या मंदिराचा श्वेतरंग पवित्रता व शांतीचा संदेश देतो. येथे 12 ज्योर्तिलिंगाची प्रतिकृती स्थापित करण्यात आलेली आहे. मंदिराच्या भिंतीवर गितेचे 18 अध्याय कोरलेले आहेत.

पंचवटी

नाशिक शहरात पंचवटी परीसर हा गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे. काळाराम मंदिरा जवळ वटवृक्षांचा समुह असून हा समूह पाच वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने या परिसरास ‘ पंचवटी ’ असे म्हटले जाते. ‘पंच’ म्हणजे पाच व ‘वटी’ म्हणजे वडाचे झाड असा अर्थ होतो.

सितागुंफा

नाशिक शहरात मध्यवर्ती बस स्थानकापासुन 3 कि.मी.अंतरावर पंचवटीत सितागुंफा स्थित आहे. वनवासा दरम्यान माता सिता येथे रहात होत्या असे म्हटले जाते.पहिल्या मुख्य गुंफेत राम, सिता व लक्ष्मण यांच्या मुर्ती असुन, दुसऱ्‍या लहान गुंफेत शिवलींग आहे.

रामकुंड
रामकुंड हे नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात असून मध्यवर्ती बसस्थानकापासून दोन कि.मी. अंतरावर आहे. वनवासादरम्यान या ठिकाणी प्रभुराम स्नान करीत होते अशी मान्यता असल्याने यास पवित्र समजले जाते. भाविक आपल्या मृत नातेवाइकांच्या अस्थि, अस्थिविलयकुंडात विसर्जित करतात. महात्मा गांधी,पंडीत नेहरु, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांचेसह अनेक महान नेत्यांच्या अस्थि रामकुंड येथे विसर्जित करण्यात आल्या आहेत. 

रिंकु राजगुरू -: मी एक मराठी कलाकार













माहुली किल्ला

माहुली किल्ला हा ऐतिहासिक किल्ला असून गिरीदुर्ग प्रकारातील आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर-आसनगावजवळ एक दुर्गत्रिकुट आहे. माहुली-भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे. माहुलीच्या किल्ल्यामध्ये असलेल्या विशिष्ट अंतरामुळे किल्ल्याचे तीन भाग पडले आहेत. उत्तरेचा पळसगड, मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारगड. ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण म्हणून माहुली किल्ला प्रसिद्ध आहे. ट्रेकर्स साठी हा किल्ला म्हणजे एक प्रकारची पर्वणीच आहे. 

माहुली किल्ल्याचा इतिहास : १४८५ च्या सुमारास हे ठिकाण नगरच्या निजाम शाहीच्या संस्थापक असलेल्या मलिक अहमद याच्याकडे आले. पुढे शहाजीराजे निजामशाहीचे संचालक बनल्यावर दिल्लीच्या मोगल फौजा व आदिलशाही सेना संयुक्तपणे निजामशाही बुडवण्यासाठी प्रयत्न करू लागल्या. १६३५-३६ च्या सुमारास शहाजींनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून जुन्नर-शिवनेरीहून जिजाबाई व बाळ शिवाजीसह माहुलीला मुक्काम हलवला. खानजमान म्हणजे महाबतखानाच्या मुलाने माहुलीला वेढा दिला. शहाजीराजांनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली. पण त्यांनी नकार दिला असता शहाजींनी शरणागती पत्करली. पुढे १६५८ मध्ये जानेवारी रोजी शिवरायांनी हा किल्ला मोगलांकडून परत मिळवला. पण १६६१ मध्ये तो मोगलांना परत द्यावा लागला. लगेचच तो परत जिंकून घेतला गेला. १६६५ च्या पुरंदरच्या तहात हे दुर्गत्रिकुट परत गमवावे लागले. त्यानंतर मोगलांचा मनोहरदास गौड हा धोरणी कर्तबगार सरदार माहुलीवर कारभार पाहू लागला. त्याने गडावर बरेच बांधकाम करून घेतले. फेब्रुवारी १६७० मध्ये खुद्द शिवाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली माहुलीवर केलेला हल्ला अयशस्वी ठरला. दीड हजार मराठी मावळ्यांपैकी तब्बल हजार मावळ्यांचा मोगलांनी वध केला. मराठ्यांचा दणदणीत पराभव झाला. या यशानंतरही मनोहरदास गौडने किल्लेदारी सोडली. त्याच्या जागी अलाविर्दी बेग हा किल्लेदार रुजू झाला. नंतर १६ जून १६७० रोजी दोन महिन्यांच्या वेढ्या नंतर दोनशे मोगल सैनिकांचे रक्त सांडले. मोरोपंत पिंगळ्यांनी माहुली, पळसगड व भंडारगड हे त्रिकूट स्वराज्यात सामील करून घेतले.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : आसनगावमार्गे माहुली गावातून शिडीच्या वाटेने किल्ल्यावर आल्यावर समोरच पाण्याच्या दोन टाक्या आहेत. पाच मिनिटांवर आणखी एक पाण्याची टाकी आहे. उजवीकडे गेल्यावर खाली पहारेकऱ्यांच्या देवळ्या आहेत. समोरच ढासळलेल्या अवस्थेतला महादरवाजा आहे. इथून भातसा राशी, अलंग, मदन, कुलंग व कळसूबाई पर्वतरांग दिसते. तर पूर्वेला हरिश्चंद्रगड, आजोबा, दक्षिणे पूर्वेला माथेरान रांग, दक्षिण पश्चिमेला तानसा खोरे तुंगारेश्वर रांग असलेला प्रचंड मुलुख दिसतो. शिडीच्या वाटेने दोन मिनिटे पुढे गेल्यावर डावीकडे जंगलात एक वाट जाते. वाटेतच छप्परवजा असणारे महादेवाचे मंदिर आहे. पुढे वाड्याचे काही अवशेष आढळतात. समोरच पाण्याचा फार मोठा तलाव आहे. पुढे गेल्यावर जांभळाचे रान लागते ही वाट खिंडीत जाऊन पोहोचते. ही खिंड म्हणजे माहुली आणि भंडारगड दरम्यानची खिंड आहे. खिंडीच्या थोडे वर गेल्यावर उजव्या बाजूस ५०० ते ६०० फुट खाली उतरल्यावर कड्यालगतच कल्याण दरवाजा आहे. खिंडीतून वाटेने वर चढत गेल्यावर झाडीमध्ये बारमाही पाण्याची भुयारी टाकी आहे. येथून पुढे जाणारी वाट गडाच्या दक्षिण टोकापाशी म्हणजेच भंडारगडावर घेऊन जाते. भंडारगडावरून समोरच उभे असणारे भटोबा, नवरा व नवरीचे सुळके दिसतात. समोरच उजवीकडे असणाऱ्या डोंगररांगेवर वजीरचा सुळका दिसतो.

कसे जाल ? 
आसनगाव मार्गे : मुंबई-नाशिक लोहमार्गावरील आसनगाव स्टेशन गाठावे. इथून ५ कि.मी. अंतरावरील गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या माहुली या गावी रिक्षाने जाता येते. गडाच्या पायथ्याशी महादेवाचे सुंदर मंदिर आहे. इथून उजवीकडे एक ओढा पार करून ३ कि.मी. चा चढाव चढून जावे. वाटेत एक लोखंडी शिडी आहे. ती पार करून वर गेल्यावर समोरच पाण्याच्या दोन टाक्या दिसतात. या वाटेने गडावर जाण्यास २ तास लागतात.

वाशिंदमार्गे : लोकलने किंवा एस.टी. ने वाशिंदला उतरावे. उत्तरेला दहागाव आणि पुढे चाप्याचा पाडा गाठावा. चंदेरीचा डोंगर उजवीकडे ठेवून माहुलीच्या दक्षिण टोकापासून निघालेल्या व पश्चिमेला पसरलेल्या सोंडेवर चढावे. कल्याण दरवाजावर एक शिलालेख आढळतो.

राहण्याची सोय : 
भंडारगडावर राहण्याची कोणतीही सोय नाही. किल्ले माहुलीवर मुक्काम करण्यासाठी पहारेकऱ्यांच्या देवळ्या आहेत, परंतु तसे असले तरीही सुरक्षिततेच्या दृष्टीने माहुली किल्ल्याची सफर एक दिवसाची असलेली बरी आहे. किल्ले माहुलीवर पहारेकऱ्यांच्या देवळ्यासमोर पाण्याची टाकी आहे. येथील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. भंडारगडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे तेथे जाताना पाण्याचा साठा जवळ ठेवावा लागतो. किल्ल्यावर जाण्यासाठी आसनगाव मार्गे दोन तास तसेच कल्याण दरवाजा मार्गे ६ ते ८ तास लागतात. त्यामुळे आसनगाव मार्गे केलेला प्रवास अधिक सोयीचा ठरतो.

ट्रेकर्स प्रेमींनी त्यांना आवश्यक असणारे साहित्य माहुली गडावर जातांना सोबत बाळगावे, त्यामुळे त्यांना गडावर जातांना कोणतीही अडचण येणार नाही. माहुली गडावर जातांना स्पोर्टी शूज चा वापर करावा. पिण्याचे पाणी तसेच खाण्याचे पदार्थ सोबत ठेवावेत.

थंडगार वारा, सुंदर देखावा, तलाव, बहरलेली हिरवळ या सर्व रमणीय निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर माहुली गडाला एकदा नक्की भेट दिली पाहिजे !

-किशोरी घायवट

सिंधुदुर्ग जिल्हा

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळत असते. आज पाहू या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती... 

विजयदुर्ग
विजयाचे प्रतिक असलेला हा किल्ला प्रचंड दगडी भिंतींनी वेढलेला असून आतील भव्य बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. श्रीरामेश्वराचे मंदिर येथील प्रमुख आकर्षण आहे.

आंबोली
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे थंड हवेचे ठिकाण वेंगुर्ला व सावंतवाडीपासून जवळच आहे. येथील हिरवीगार वनश्री पर्यटकांना आकर्षित करते.

मालवण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे केंद्र असलेला सिंधुदुर्ग किल्ला तसेच पद्मगड आणि सर्जेकोट या किल्ल्यांसाठी आणि इतिहासकालिन व्यापाराचे केंद्र म्हणून मालवण सुप्रसिद्ध आहे.

तारकर्ली
आंतरराष्ट्रीय हेब्रीडीयन स्पीरीट या प्रवासी जहाजाचा नियमित थांबा असलेले तारकर्ली हे ठिकाण माालवण पासून अंदाजे ८ कि.मी. अंतरावर आहे. येथील शांत समुद्र किनारा व विस्तीर्ण खाडी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.

शिरोडा
मराठी साहित्याचे मानबिंदू श्री.वि.स.खांडेकरांचे १९२० ते १९३८ पर्यंत येथे वास्तव्य होते. महात्मा गांधींच्या आदेशाने येथे मिठाचा मोठा सत्याग्रह झाला होता.

कुणकेश्वर
यादवांनी बांधलेले ११व्या शतकातील हे शिवमंदिर समुद्र किनारी वसले आहे. अतिशय सुबकरित्या घडविलेले हे मंदिर भाविकांमध्ये लोकप्रिय आहे.

मिठबाव
कुणकेश्वर मंदिरापासून फक्त १२ किमी अंतरावर वसलेले मिठबाव हे गाव येथील सलग ६ किमी लांबीच्या रुपेरी सागर किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.

मोचेमाड
वेंगुर्ल्याहून रेडी येथे जाताना हे प्रेक्षणीय ठिकाण वाटेत लागते. हिरवीगार निसर्ग संपदा, निळा समुद्र व प्रचंड खडक ही येथील आकर्षणे आहेत.

सिंधुदुर्ग किल्ला
जलदुर्ग म्हणून प्रसिद्ध असलेला हा किल्ला १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी आरमाराचे केंद्र म्हणून बांधला. मालवण शहरापासून समुद्रामध्ये अंदाजे ३ किमी आतमध्ये हा किल्ला वसला आहे.

सावंतवाडी
लाकडी खेळणी व गंजिफा पत्त्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर वसलेले आहे. कोकणचे महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले आंबोली गिरीस्थान येथून जवळच आहे.

धामापूर तळे
मालवणमध्ये असलेले हे ऐतिहासकि तळे अंदाजे ५ एकरावर वसले आहे. सागरी खेळांसाठी हे एक उत्तम स्थान आहे.

पिंगुळी
अतिशय उत्कृष्ट रंगसगतीद्वारे पौराणिक कथांचे चित्रीकरण येथे पहावयास मिळते.

रत्नागिरी जिल्हा

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळत असते. आज पाहू या रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती...

रत्नागिरी

लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान असलेले रत्नागिरी समुद्राच्या शेजारी वसलेले आहे. येथील बंदर तसेच १५व्या शतकातील किल्ला आणि आंब्यांच्या बागा ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.

गणपतीपुळे

समुद्र किनाऱ्या शेजारी वसलेले स्वयंभू गणपतीचे हे पवित्र स्थान भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ट्य असे की हे मंदिर समुद्रकिनारी आहे. मंदिरातून बाहेर पडल्यावर लगेचच आपण समुद्र किनाऱ्‍यावर उतरतो. एका बाजूला समुद्र म्हणजे वाळू आणि दुसऱ्‍या बाजूला खडकाळ प्रदेश असा हा अनोखा संयोग येथे पहावयास मिळतो.

हर्णे

रत्नागिरी जिल्ह्यातील हे छोटेसे निसर्गरम्य गाव समुद्राच्या शेजारी वसलेले असून आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती मंदिर आणि सुवर्णदुर्ग ही येथील महत्त्वाची ठिकाणे आहेत.

जयगड

जय किल्ल्यासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण एक छोटेसे मासेमारी गाव आहे. येथील नारळीच्या बागा पर्यटकांना मोहवून टाकतात.

मार्लेश्वर

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात देवरुख ह्या गावापासून अंदाजे १६ किमी अंतरावर मार्लेश्वर हे प्रसिद्ध ठिकाण आहे. हे शिवस्थान डोंगरावरील गुहेत आहे. या स्थानाचे आणखी एक आकर्षण म्हणजे येथे वाहणारा धबधबा. सुमारे २०० फूट उंचीवरून पडणारा हा धबधबा धारेश्वर ह्या नावाने ओळखला जातो. 

मालवण देवबागचं अनोखं 'त्सुनामी आयलंड'..!!

दोन दिवसांपूर्वी गावाकडे आलोय सिंधुदुर्गात.. सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत प्रचंड गरम..! घरात राहणं कठीण..! रात्री मात्र पांघरूणाशिवाय झोप यायची नाही येवढी छान थंड हवा..!

काल घरातील सर्वांना घेऊन बहुचर्चित मालवण, तारकर्ली, देवबागला गेलो होतो.. माझ्यासारख्या कोकणी माणसाला समुद्राचं कौतुक ते काय? परंतू देवबागच्या समुद्र किनाऱ्यावरील 'त्सुनामी आयलंड' बघण्याची उत्सुकता होती..

'त्सुनामी आयलंड' हा एक निसर्गाचा चमत्कार आहे.. या बेटाच्या निर्मितीमागे काही शास्त्रीय कारणं असतील परंतू मला वैज्ञानिकीय शास्त्रीय कारणांमध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही.. कोणत्याही गोष्टीमागील कारणाचं अॅनालिसीस केलं की त्यातला रोमॅंटीसीझम संपलाच समजायचं..

हे आयलंड सभोवार पाणी आणि मध्येच जमीन अशा नेहेमीच्या प्रकारापेक्षा थोडं वेगळं आहे.. इथं सभोवार पाणी आणि मध्येही पाणीच असा काहीसा प्रकार आहे.. फरक येवढाच की सभोवतालच्या पाण्याचा ड्राफ्ट (खोली) २० फुटांचा असेल तर आयलंडवरच्या पाण्याची खोली ओहोटीच्या वेळेस जेमतेम दोन-तीन फूट तर भरतीच्या वेळेस चार-पाच फूट असते.. म्हणजे ऐन भरतीच्या वेळेस या ठिकाणी गेलो असता समोरून पाहीलं असता माणूस भर समुद्रात (खरंतर ही खाडी आहे) पाण्यात गुडघाभर पाण्यातच उभा आहे असंच दिसतं.. ओहोटीच्या वेळेस मध्यास मात्र थोडी पुळण जमिन, तिही फारतर अर्धा स्क्वेअर किमिची असेल, दिसते.. इथं काही स्टॉल्सही आहेत मात्र ते मताणासारखे बांबूंच्या उंच प्लॅटफॉर्मवर उभारलेले आहेत कारण खाली पाणीच असतं.. इथं संध्याकाळनंतर कोणालाही थांबता येत नाही..

या आयलंडला देवबागच्या किनाऱ्यावरून बोटीने जावं लागतं.. या सोयी उत्तम व किफायतशीरही आहेत.. हा आयलंड तसा फार पूर्वीपासून या ठिकाणी आहे.. स्थानिक लोक या बेटाला 'भाट' असं म्हणायचे. मात्र २००८ साली आलेल्या त्सुनामीमुळे या बेटाच्या रचनेत थोडा बदल झाला आहे.. हे बेट आता थोडं थोडं समुद्रात बुडत चाललंय अशी स्थानिकांची माहिती आहे.. सध्या इथं अनेक प्रकारचे वॉटर स्पोर्टस् चालतात.. तारकर्लीला जाणाऱ्यांनी या अनेख्या 'त्सुनामी आयलंड'ला जरूर भेट द्यावी..

- गणेश साळुंखे

रायगड जिल्हा

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळते. आज पाहू या रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती...

रायगड किल्ला, अलिबाग
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी म्हणून रायगड इतिहास प्रसिद्ध आहे. येथून जवळच असलेला कुलाबा तसेच अलिबाग किल्ला पाहता येईल. 

चौल
पोर्तुगीज, मोगल व मराठ्यांच्या काळातील विविध ऐतिहासिक स्थानं चौल परिसरात वसलेली आहेत. म्हणूनच याला पश्चिम भारताच्या इतिहासाचे संग्रहालय म्हणून संबांधले जाते.

कर्नाळा पक्षी अभयारण्य
मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल येथे असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्गप्रेमींसाठी जणू स्वर्गच आहे. विविध प्रजातींचे तसेच स्थलांतरित पक्षी हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे. 

किहीम
निळाशार पसरलेला अथांग समुद्र आणि लांबच लांब रूपेरी वाळूचा सागर किनारा किहीममध्ये येणाऱ्या पर्यटकांना मोहवून टाकतो. 

महाड
सावित्री नदीच्या काठी वसलेल्या या शहराला मराठ्यांच्या इतिहासात प्रमुख स्थान आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढ्याने इतिहास प्रसिद्ध झालेले चवदार तळेही याच शहरात आहे. 

महड
महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे प्रमुख स्थान आहे. येथील गणपतीस श्री वरदविनायक म्हणून ओळखले जाते. 

माथेरान 
डोंगरमाथ्यावर वसलेले हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. मुंबई पासून जवळच असलेले हे निसर्गरम्य ठिकाण येथील छोट्याशा रेल्वेगाडीसाठीही प्रसिद्ध आहे. मुंबई-कर्जत रेल्वेमार्गावरील नेरळ स्थानकावर उतरून माथेरानसाठी जाता येते. 

मुरूड-जंजिरा
ऐतिहासिक जलदुर्गासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण येथील सागर किनाऱ्यांसाठीही पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. 

पाली (बल्लाळेश्वर)
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गणपतीच्या आठ स्थानांपैकी पाली येथील श्री बल्लाळेश्वर हे भक्तांमध्ये लोकप्रिय आहे. अष्टविनायकाचे हे स्वयंभू स्थान आहे.

हरीहरेश्वर
काळभैरव शिवमंदिर हे हरीहरेश्वरचे प्रमुख आकर्षण आहे. तसेच येथील निसर्गरम्य सागर किनारा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.

ठाणे/ पालघर जिल्हा

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळते. यापूर्वी आपण मुंबई जिल्ह्याची माहिती घेतली आहेच. आज पाहू या ठाणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती...

अंबरनाथ
ठाणे जिल्ह्यात मुंबई उपनगरीय मध्य रेल्वे मार्गावर वसलेले अंबरनाथ हे शहर ११ व्या शतकातील सोमनाथ मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवान शंकराचे अतिभव्य असे हेमाडपंथी बांधणीने उभारलेले हे मंदिर पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.

वसई किल्ला
पोर्तूगीज राजवटीचे केंद्र असलेला वसईचा हा किल्ला नंतर मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला. हा किल्ला मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावरील वसई स्थानकापासून जवळ आहे. 

डहाणू
मुंबईपासून अंदाजे १४० किमी अंतरावर असलेले डहाणू हे ठिकाण चिकूच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. येथील महालक्ष्मी मातेचे मंदिर भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. तसेच येथील रूपेरी सागर किनारे पर्यटकांना भुरळ घालतात. 

घोडबंदर
ठाण्यातील घोडबंदर मार्गावर असलेले हे ठिकाण खाडीच्या किनारी असलेल्या घोडबंदर किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. टेकडीवरील या किल्ल्यावरून आसपासचा रम्य परिसर न्याहाळता येतो. 

तानसा तलाव
२१६.७५ चौ.कि.मी. परिसरात पसरलेल्या या प्रचंड जलाशयाद्वारे मुंबई व आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा होतो. या तलावाच्या परिसरातच अभयारण्य आहे. 

वज्रेश्वरी-अकलोली-गणेशपुरी
वज्रेश्वरी देवीचे स्थान असलेले हे सुप्रसिद्ध ठिकाण मुंबई-अहमदाबाद मार्गाहून ११ कि.मी. अंतरावर आहे. अकलोली येथे गरम पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत. हे झरे औषधी आहेत असे मानले जाते. तसेच गणेशपुरी येथे श्री नित्यानंद स्वामी महाराजांचा आश्रम आहे. या आश्रमास देश विदेशातून भाविक भेट देतात. 

बोर्डी
रूपेरी वाळूच्या सागर किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेले बोर्डी हे ठिकाण महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला लागून आहे. येथून जवळच असलेले उदवाडा हे ठिकाण पारशी समाजाचे पवित्र स्थान असून येथील अग्यारीत एक हजार वर्षांपासून प्रज्वलित अग्नी जतन करून ठेवण्यात आला आहे.

टिटवाळा
मुंबई उपनगरीय मध्य रेल्वे मार्गावर वसलेले टिटवाळा हे महागणपतीचे सुप्रसिद्ध स्थान आहे. येथून जवळच्या शहाडला विठ्ठलाचेही प्रसिद्ध मंदिर आहे. तसेच ११ व्या शतकातील हेमाडपंथी बांधणीचे शिवमंदिर आहे. 

जव्हार
महाराष्ट्रातील वनवासी समाजाच्या संस्थानांपैकी हे एक आहे. जव्हार वारली चित्रांकरिता जगप्रसिद्ध आहे. मुकणे घराण्याचा राजवाडा जय विलास पॅलेस तसेच भूपतगड आणि दादरा कोपरा धबधबा ही येथील काही प्रेक्षणीय स्थळे आहेत. 

कोकणातील पर्यटन जगभर पोहोचविणारा 'रत्नागिरी पर्यटन महोत्सव'

कोकण म्हटले की निसर्गाचे वरदान ठरलेला प्रदेश. समुद्र, नद्यानाले, निसर्ग सौंदर्य आणि येथील कोकणी राहणीमान, संस्कृती, झाकडी, नमन, दशावतार यासारखी पुन्हा-पुन्हा पहावी अशी लोककला. साताससमुद्र पार केलेला रत्नागिरी हापूस आंबा आणि विविध प्रकारच्या मच्छिंचा अंतर्भात असणारी कोकणी मेजवाणी. त्यातच येथील निसर्गाच्या सानिध्यात वसलेली अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांना भुरळ घालतात. अशा या कोकणातील पर्यटन जगभर पोहोचविणारा नेत्रदीपक सोहळा 'रत्नागिरी पर्यटन महोत्सव 2016' चिपळूण नगरीत 7 ते 9 मे 2016 या कालावधीत भरणार आहे.

निसर्गाची भटकंती मध्ये पर्यटकांना आमराई सफर, क्रोकोडाईल सफारी, कोकणी मेजवानीचा घेता येणार आस्वाद आणि पर्यटकांना स्कुबा डायव्हिंग, व्हॅली क्रॉसिंग या साहसी खेळांचा थरार अनुभवता येणार रत्नागिरी पर्यटन महोत्सवात. पवन तलाव मैदान, चिपळूण, जि.रत्नागिरी येथे 7 ते 9 मे 2016 या कालावधीत भरणार रत्नागिरी पर्यटन महोत्सव 2016.

तीन दिवस चालणाऱ्या या पर्यटन महोत्सवात रोज सकाळी सकाळी 8.00 वाजता धामणवणे येथील रेडीज फार्मवर पर्यटन सहल, पक्षी निरीक्षण, आमराई सफर. गांधारेश्वर मंदिर चिपळूण येथे सकाळी 9.30 वाजता वॉटर स्पोर्टस्, रिव्हर क्रॉसिंग, कयाकिंग, जेटस्की, बंपर राईड, बनाना राई, स्कुबा डायव्हिंग, रॉक क्लायंबिंग बर्माब्रिज, आर्चरी, वॉर जॉरबिंग. सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत गोवळकोट बॅकवॉटर गोवळकोट धक्का, चिपळूण येथे क्राकोडाईल सफारीचे आयोजन. रविवार 8 मे 2016 रोजी सकाळी 7.00 वाजता विशेष आकर्षण भोगाळ मैदान चिपळूण येथे एरो मॉडलिंग, रिमोटद्वारे विमानांचे हवाई प्रात्यक्षिक.

याशिवाय कृषि प्रदर्शन, कोकणातील पर्यटनाचे बदलते स्वरुप व संधी या विषयावर केसरी टूर्सचे केसरी पाटील याचे चर्चासत्र, चंद्रशेखर भडसावळे व संजीव अणेराव यांचा सहभाग असलेला कृषि पर्यटन परिसंवाद, रांगोळी स्पर्धा, सुरक्षित सागरी पर्यटन या विषयावर व्याख्यान, नितीन बानुगडे पाटील याचे शिवचरित्र व्याख्यान, तायक्वांदो प्रात्यक्षिक, पुष्परचना फळ भाज्यांवरील कोरीव काम स्पर्धा, प्रसिद्ध शेफद्वारे पाककला मार्गदर्शन, हॉस्पिटॅलिटी (आदरातिथ्य) व्यवस्था मार्गदर्शन आणि दररोज सकाळी 9.00 वाजता आरोग्य शिबीर आणि सायंकाळी 6.00 वाजता स्थानिक लोककलांचे सादरीकरण.

महोत्सवाच्या पूर्व संध्येला 6 मे 2016 रोजी सायंकाळी 4.00 वाजता निघणार भव्य शोभायात्रा. सायंकाळी 6.00 वाजता ‘जुनून’ सूफी संगीताची मैफिल.

पर्यटन महोत्सवात दररोजचा शेवट होणार मनोरंजन कार्यक्रमाने
शनिवार 7 मे रोजी सायंकाळी 7.00 वाजता कॉमेडीचा कल्ला “चला हवा येऊ द्या”. रविवार 8 मे रोजी सायंकाळी 7.00 वाजता मुंबई विद्यापीठ आयोजित नामवंत कलाकारांचे सादरीकरण “महाराष्ट महोत्सव”. सोमवार 9 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता सुप्रसिध्द सिनेगायक सुदेश भोसले यांची सुरेल -मैफिल “अमिताथ और मै”.

मान्यवरांचे उपस्थितीत होणार उद्घाटन

शनिवार 7 मे 2016 रोजी सायंकाळी 6.00 वाजता केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर आणि रत्नागिरी जिल्हा परिषदचे अध्यक्ष तुकाराम गोलामडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी पर्यटन महोत्सव 2016 चे उद्घाटन होणार आहे. जिल्ह्यातील राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद, विधानसभा सदस्य, चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व पंचायत समितीचे सभापती यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, कोकण विभागाचे आयुक्त तानाजी सत्रे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन-नानौटिया यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

रत्नागिरी जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ग्लोबल चिपळूण टुरिझम सह आयोजक असलेल्या जिल्ह्यातील सर्वस्तरातील लोकसहभागातून पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणाऱ्या रत्नागिरी पर्यटन महोत्सव 2016 चे अध्यक्ष तथा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाधिकारी प्रभाकर प्रदीप, पोलीस अधीक्षक डॉ.संजय शिंदे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण यांनी जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील, राज्याबाहेरील पर्यटकांनी मोठ्या संख्येने या पर्यटन महोत्वाचा आनंद लुटावा, असेआवाहन केले आहे.
-सदाशिव किलजे
जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी

Rajesh Khadke PPPMS INDIA



मी एक मराठी कलाकार Rajesh Khadke







बापू सेवाग्रामला मुक्कामी जाण्याची आठवी दशकपूर्ती

  • मगनवाडी (सध्याच्या एमगिरी) परिसरातून पायदळ गेले होते सेवाग्रामला 
जमनालालजी बजाज यांच्या आग्रहाने बापू वर्ध्यात राहायला आले. वर्ध्यात राहण्याऐवजी त्यांनी खेड्यात राहण्याचा मनोदय व्यक्त केला व त्यानुसारच बापूंनी त्यावेळी मगनवाडी (सध्याच्या एमगिरी) परिसरात असलेल्या जमनालालजी बजाज यांच्या बागेतील बंगल्यातून पायदळ सेवाग्रामला जात सेवाग्रामच्या झोपडीत आपला मुक्काम हलविला. तो दिवस होता 30 एप्रिल 1936. त्यामुळे शनिवारी (ता.30) बापू सेवाग्राम येण्याला 80 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल बापूंची पदचिन्हे उमटलेल्या रस्त्याने पदयात्रेने गांधी विचारक एमगिरी परिसरातील बापूंच्या निवासस्थानापासून सेवाग्राम आश्रमापर्यंत पदयात्रेने जाणार आहेत.

1920 मध्ये सेठ जमनालालजी बजाज बापूंचे शिष्यच नव्हे तर पाचवे पुत्र बनले. बापूंच्या कामापासून सेवाव्रताची प्रेरणा घेत सेठ जमनालालजी बजाज यांनी 1924 मध्ये महिला आश्रम स्थापन केला होता. त्यावेळी त्याचे पहिले नाव हिंदू महिला मंडळ असे होते. पुढे त्याचे 1933 मध्ये महिला आश्रम असे नामकरण करण्यात आले. साबरमती येथील आश्रमाचा निरोप घेऊन बापू 12 मार्च 1930 रोजी दांडीयात्रेला निघाले त्याचवेळी त्यांनी स्वराज्य मिळाल्याशिवाय साबरमती आश्रमात परतणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. इतकेच नव्हे तर 31 जुलै 1933 रोजी त्यांनी साबरमती आश्रमच इंग्रजांच्या स्वाधीन करुन दिला. 26 ते 28 ऑक्टोबर 1936 रोजी काँग्रेसचे मुंबईच्या वरळी येथे अधिवेशन झाले.

या अधिवेशनाच्या वेळी बापूंनी कायम वास्तव्याकरीता वर्ध्यात यावे, अशी सेठ जमनालाल बजाज यांनी बापूंना विनंती केली. त्यापूर्वी 1933 मध्ये बापू एकदा वर्ध्यात आले होते. सेठ जमनालाल बजाज यांनी केलेली विनंती मान्य करुन बापू मुंबईच्या काँग्रेस अधिवेशनातून थेट 29 ऑक्टोबर 1934 रोजी रेल्वेने वर्ध्यात आले. त्यांचा मुक्काम सध्याच्या सेवाग्राम मार्गावरील महिला आश्रम परिसरातील बजाज यांच्या बंगल्यात होता. 20 फेब्रुवारी 1935 रोजी बापू या निवासस्थानातून मगनवाडी परिसरातील जमनालालजी बजाज यांचया बागेतील बंगल्यात निवासास गेले. दरम्यान 1936 मध्ये लखनौ येथे काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. त्यावेळी बापूंनी मला खेड्यात राहायचे आहे, असा निश्चय व्यक्त केला व 17 एप्रिल 1936 रोजी हरिजन बहूलवस्तीच्या सेगाव (सध्याचे सेवाग्राम) येथे स्थायिक होण्याचा निश्चय व्यक्त केला.

त्यानंतर मगनवाडीतील बजाज यांच्या बंगल्यातून बापू 30 एप्रिल 1936 रोजी चालत सेगाव येथे गेले. सेगाव हे बजाज यांचे मालगुजारीतील गाव होते. बापू सेगाव (सेवाग्राम) ला पोहोचल्यानंतर त्यांचा तीन दिवस मुक्काम या परिसरातील अमृतफळाच्या झाडाखाली होता. त्यानंतर ते आदीनिवास या चट्याच्या झोपडीत राहायला गेले. जुलै महिन्यात कस्तुरबा, सरहद्द गांधी खान अब्दुल गफ्फारखान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदी निवासात राहायला आले. त्यानंतर सेवाग्राम आश्रम स्वातंत्र्याच्या लढ्याची राजधानी झाली. येथेच स्वातंत्र्य लढ्याचे नियोजन व्हायचे. डॉ. राजेंद्रप्रसाद, पं. जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, चक्रवर्ती राजगोपालाचारी, यांच्यासह विविध राष्ट्रीय नेते याच आश्रमात येत व स्वातंत्र्य लढ्याचे नियोजन केले जायचे. 5 मार्च 1940 रोजी बापूंनीच सेगावचे नामकरण सेवाग्राम असे केले होते.

30 एप्रिल 1936 रोजी सेवाग्रामच्या आश्रमात बापूंची पहिली पावले उमटली. त्यानिमित्तचा जागर शनिवारी (ता.30) केला जाणार असून गांधीजींची नात उषा गोकाणी यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
महात्माजींविषयी आदर असणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी या ऐतिहासिक स्थळास भेट दिली पाहिजे असे आर्वजून नमूद करावेसे वाटते.

- प्रकाश कथले 
9922447981 
 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India