रत्नागिरी जिल्हा

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळत असते. आज पाहू या रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती...

रत्नागिरी

लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान असलेले रत्नागिरी समुद्राच्या शेजारी वसलेले आहे. येथील बंदर तसेच १५व्या शतकातील किल्ला आणि आंब्यांच्या बागा ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.

गणपतीपुळे

समुद्र किनाऱ्या शेजारी वसलेले स्वयंभू गणपतीचे हे पवित्र स्थान भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ट्य असे की हे मंदिर समुद्रकिनारी आहे. मंदिरातून बाहेर पडल्यावर लगेचच आपण समुद्र किनाऱ्‍यावर उतरतो. एका बाजूला समुद्र म्हणजे वाळू आणि दुसऱ्‍या बाजूला खडकाळ प्रदेश असा हा अनोखा संयोग येथे पहावयास मिळतो.

हर्णे

रत्नागिरी जिल्ह्यातील हे छोटेसे निसर्गरम्य गाव समुद्राच्या शेजारी वसलेले असून आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती मंदिर आणि सुवर्णदुर्ग ही येथील महत्त्वाची ठिकाणे आहेत.

जयगड

जय किल्ल्यासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण एक छोटेसे मासेमारी गाव आहे. येथील नारळीच्या बागा पर्यटकांना मोहवून टाकतात.

मार्लेश्वर

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात देवरुख ह्या गावापासून अंदाजे १६ किमी अंतरावर मार्लेश्वर हे प्रसिद्ध ठिकाण आहे. हे शिवस्थान डोंगरावरील गुहेत आहे. या स्थानाचे आणखी एक आकर्षण म्हणजे येथे वाहणारा धबधबा. सुमारे २०० फूट उंचीवरून पडणारा हा धबधबा धारेश्वर ह्या नावाने ओळखला जातो. 

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India