पर्यटन महामंडळाची ‘डिस्काऊंड ऑफर’… पर्यटकांना घडवील सुखाची सफर..

महाराष्ट्राचा देशाच्या पर्यटनातील टक्केवारी दिवसेंदिवस वाढत असून पर्यटकांचा ओघ वाढत आहे. स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे, स्फुर्ती देणारे ऐतिहासिक गड किल्ले, मनशांती देणारी तीर्थस्थळे, निसर्ग पर्यटनाचा आनंद देणारे अभयारण्ये, जंगले अशी कितीतरी पर्यटनस्थळे पर्यटकांना साद घालत असतात. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रयत्नांतून राज्यातील महत्‍त्वाच्या पर्यटनस्थळांवर विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यात महामंडळाकडून पर्यटकांना दिलेली सर्व सुविधांनी युक्त अशी निवासाची व्यवस्था उल्लेखनीय ठरत आहे. या निवास व्यवस्थेचा समाजातील दुर्बल घटक, ज्येष्ठ नागरिक यांना फायदा घेता यावा यासाठी महामंडळाने खास सवलती जाहीर केल्या आहेत. ‘महामंडळाची डिस्काऊंड ऑफर… ही सर्वसामान्य पर्यटकांना सुखाची सफर घडविणारी ठरणार आहे.’

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या विविध योजना राबवित आहे. त्याचबरोबर स्वच्छता मोहिमेसारख्या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रयत्न महामंडळाकडून केले जात आहेत. याअंतर्गतच राज्यातील माजी सैनिकांसह, अपंग नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांनादेखील पर्यटकांचा आनंद घेता यावा यासाठी महामंडळाकडून पर्यटक निवासांच्या भाड्यामध्ये सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे –

माजी सैनिकांसाठी सवलत :-

पर्यटन महामंडळाने आपल्या पर्यटक निवासांच्या दरपत्रकामध्ये भारतीय सैन्य दलातील माजी सैनिकांसाठी सर्व हंगामात 20 टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. ही सवलत फक्त एका कक्षाच्या आरक्षणावर लागू राहील.

अपंग व्यक्तींसाठी सवलत:-
सर्व पर्यटक निवासात राहण्यासाठी येणाऱ्या अपंग व्यक्तींसाठी एका कक्षासाठी 20 टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. ही सवलत अपंगत्वाचे प्रमाण 40 % व त्यावरील ओळखपत्र सादर करणाऱ्यांसाठी लागू राहील.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत :-
महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना ते राहत असलेल्या एका कक्षाच्या आरक्षणावर 20 टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. याचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना घेता येईल. 

याचबरोबरअनिवासी भारतीय आणि शासकीय कर्मचारी या पर्यटन व्यवसायासाठी महत्‍त्वाच्या ठरणाऱ्या घटकांसाठीदेखील सवलती देण्यात आल्या आहेत.

अनिवासी भारतीयांसाठी सवलत :-
देशात येणाऱ्या अनिवासी भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या पर्यटक निवासामध्ये अनिवासी भारतीयांसाठी एका कक्षासाठी 10 टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी उपभोक्त्यांना त्यांच्या पासपोर्टची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. 

शासकीय कर्मचा-यांना सवलत :-
महामंडळाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र दर्शन सवलत योजनेअंतर्गत प्रवास करणाऱ्‍या महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी एका कक्षाच्या आरक्षणावर पर्यटक हंगामामध्ये 10 टक्के व बिगर हंगाम कालावधीमध्ये 20 टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. याचा लाभ शासकीय कर्मचारी घेऊ शकतात.

राज्यातील पर्यटन विकासासाठी भरीव प्रयत्न करणाऱ्या पर्यटन विकास महामंडळाने सामाजिक बांधिलकीचा विचार करुन या योजना जाहीर केल्या आहेत. समाजातील दुर्बल घटकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना या योजनांमुळे देशाटन करतांना नक्कीच फायदा होणार आहे. तर मग चला निघुया महाराष्ट्र फिरायला…! 

विजय अ.कोळी, 
प्र.जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

2 comments:

सागवान (साग ) लागवड़ said...

टिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते ,9 ते 10 वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625

सागवान (साग ) लागवड़ said...

टिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते ,9 ते 10 वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India