पुणे तिथे काय उणे...

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्यामध्ये मुळची मराठी संस्कृती व इतर संस्कृतीचे गुणविशेष ज्यामध्ये शिक्षण, कला, हस्त व्यवसाय, आणि नाट्यशाळा यांची विशिष्टता आहे. पुण्यातील देहू ही संत तुकाराम महाराज यांची तर आळंदी ही संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी आहे. महान स्वातंत्र्य सैनिक बाळ गंगाधर टिळक, आगरकर आणि गोपाळकृष्ण गोखले यांचे हे माहेरघर आहे. जयंत नारळीकर, प्रसिद्ध संशोधक हे ही पुण्यातीलच आहेत. पुणे हे भारतीय शास्त्रीय संगीतासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात तीन दिवस ‘सवाई गंधर्व’ हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यासाठी जगभरातून रसिक हजेरी लावतात. पुण्यामध्ये संस्कृती व वारसा यांचा आधुनिकतेशी सुरेख संगम झालेला आहे. पुणे फेस्टीवल व ओशो आंतरराष्ट्रीय आश्रमामुळे पुणे हे महाराष्ट्र राज्याचे विविध भावनांचे अधिष्ठान मानले जाते. पुण्याचा गणेशोत्सव संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. शिवाय जिल्ह्यात किल्लेही पाहण्यासारखे आहेत. म्हणूनच म्हणतात... पुणे तिथं काय उणे...

आज आपण शहरातील पर्यटन ठिकाणांची माहिती घेणार आहोत...
-ऐतिहासिक स्थळे-
आगाखान पॅलेस
वैशिष्ट्ये- गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटिशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांच्यासाठी भारत छोडो आंदोलनात तुरुंग म्हणून केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.

उपलब्ध सोयी- आगाखान पॅलेस हे ठिकाण पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथे जाणे सोईस्कर आहे. तसेच सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत.
संपर्क - 020-26880250

शनिवारवाडा
वैशिष्ट्ये- पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवारवाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाड्याची रचना करण्यात आलेली आहे. शनिवारवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवारवाड्यासमोर पहिल्या बाजीरावाचा घोड्यावर बसलेला पुतळा आहे.

शनिवारवाड्यात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाड्याच्या मजबूत तटबंदी असणाऱ्या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.

उपलब्ध सोयी- शनिवारवाडा हा मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत.

सिंहगड

वैशिष्ट्ये- पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिध्द व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. पुणे शहरापासून 25 कि.मी. अंतरावर हा किल्ला असून तो 1290 मीटर उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकून छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले "गड आला पण सिंह गेला" त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.

उपलब्ध सोयी- सिंहगड येथे जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सिंहगड पायथ्यापर्यंत आहेत. तेथून लोकल जीप अथवा पायी चालत जावू शकता. सिंहगड परिसरात खाण्याचीपिण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची मान्यताप्राप्त निवास व न्याहरी योजना व महाभ्रमण अंतर्गत देखील निवासाची सोय परिसरात आहे. शिवाय वनविभागाचे गेस्ट हाउस देखील आहे.

पर्वती
वैशिष्ट्ये- पर्वती हे पुण्याचे स्थान दर्शविणारे प्रसिद्ध ठिकाण आहे. पर्वतीची टेकडी ही जरी शहराच्या दक्षिणेकडील भागात असली तरीसुद्धा ती शहराच्या जवळजवळ सर्वच भागातून दिसू शकते. मंदिराला आठ पायऱ्या आहेत, ज्या पार्वती व देवडेश्वरांना अर्पण केलेल्या आहेत. तेथे विष्णू, गणेश व कार्तिकस्वामी यांचेही मंदिर आहे. टेकडीच्या माथ्यापर्यंत चढून गेल्यावर आपल्याला सर्व बाजूने पुणे शहराचे सुंदर दर्शन घडल्याचा आनंद लुटता येतो.

उपलब्ध सोयी - पर्वती हे मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे सर्वसोयी सुविधा उपलब्ध आहेत.
संकेतस्थळ- www.parvatidarshan.in

मोराची चिंचोली
वैशिष्ट्ये- मोराची चिंचोली म्हणजेच नावाप्रमाणे याठिकाणी आपल्याला मोर पाहायला भेटतात. मोर सकाळी 5.30 ते 7.30 आणि संध्याकाळी 4.30 ते 7.00 या कालावधीमध्ये आढळून येतात.

उपलब्ध सोयी- येथे राहण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकृत मंजुरी असलेले जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र आहे.
संपर्क क्रमांक- 9987401828/9423004740
संकेतस्थळ- www.morachichincholi.com

लोणावळा-खंडाळा
वैशिष्ट्ये- पुणे-मुंबईच्या दरम्यान रेल्वेने अन् सडकेने जोडलेली... सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असलेली... अनेक प्रेक्षणीय स्थळे असणारी... वनस्पती-पक्षी आदी निसर्गसंपदा असणारी... गावांची जोडगोळी म्हणजे लोणावळा-खंडाळा. येथे खूप ठिकाणे पाहण्याजोगी आहेत.

किल्ले- लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा, कोरीगड, घनगड, राजमाची.

लेणी- कार्ले, भाजे व बेडसे.

जलाशय- वळवण, तुंगार्ली, भूशी लोणावळा व शिवाजी तलाव इत्यादी.
येथील प्रसिद्ध म्हणजे लोणावळा चिक्की.

उपलब्ध सोयी- पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर ही लेणी आहे. पुण्याहून येथे जाण्यासाठी पुणे-लोणावळा लोकलची सोय आहे. दीड तासात लोकलने लोणावळ्यात पोहोचता येते. पुणे-मुंबई महामार्ग असल्यामुळे जेवणाची उत्तम सोय आहे. राहण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास कार्ला हे सुसज्ज अशा निवासाची सोय येथे आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची मान्यताप्राप्त निवास व न्याहरी योजना व महाभ्रमण अंतर्गत देखील निवासाची सोय परिसरात आहे.
-लेणी-
भाजे लेणी
वैशिष्ट्ये- भाजे लेणी हा 18 लेण्यांचा समुह आहे. 12 व्या लेणीत चैत्यागृह आहे. भाजे लेण्यात कलाकुसर अधिक सूक्ष्म वाटते.

पुण्याहून येथे जाण्यासाठी पुणे-लोणावळा लोकलची सोय आहे. दीड तासात लोकलने लोणावळ्यात पोहोचता येते. तेथून लेणीला जाण्यासाठी ऑटो रिक्षांची सोय आहे. पुणे-मुंबई महामार्ग असल्यामुळे जेवणाची उत्तम सोय आहे. राहण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास कार्ला हे सुसज्ज आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची मान्यताप्राप्त निवास व न्याहरी योजना व महाभ्रमण अंतर्गत देखील निवासाची सोय परिसरात आहे.

बेडसे लेणी
वैशिष्ट्ये- पुणे-मुंबई रस्त्यावरील कामशेतपासून आठ-नऊ कि.मी. अंतरावर बेडसे नावाचे गाव आहे. या गावाजवळ भातराशी नावाच्या दुर्गम पहाडात ही बौद्ध लेणी हीनयान पंथाची आहेत. लेण्यांमध्ये हत्ती, घोडे, बैल इत्यादी प्राण्यांबरोबरच निरनिराळे अलंकार घातलेल्या स्त्री-पुरुषांच्या मुर्ती विलोभनीय आहेत. गावापासून साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर ही लेणी आहेत. चैत्यभूमी, प्रार्थना हॉल, भव्य स्तूप ही येथील वैशिष्ट्ये आहेत.

उपलब्ध सोयी- पुण्याहून येथे जाण्यासाठी पुणे-लोणावळा लोकलची सोय आहे. दीड तासात लोकलने लोणावळ्यात पोहोचता येते. तेथून लेणीला जाण्यासाठी ऑटो रिक्षांची सोय आहे. राहण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास कार्ला हे सुसज्ज आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची मान्यताप्राप्त निवास व न्याहरी योजना व महाभ्रमण अंतर्गत देखील निवासाची सोय परिसरात आहे.

कार्ला लेणी
वैशिष्ट्ये- इसवी सनाच्या पहिल्या शिल्पकलेचा नि लेणी कलेचा उत्कृष्ठ नमुना म्हणजे कार्ले लेणी. कार्ले लेण्यातील चैत्यगृह हे महाराष्ट्रातील बहुदा सर्वात मोठ्या आकाराचे खोदीव दालन असावे.

उपलब्ध सोयी- पुण्याहून येथे जाण्यासाठी पुणे-लोणावळा लोकलची सोय आहे. दीड तासात लोकलने लोणावळ्यात पोहोचता येते. तेथून लेणीला जाण्यासाठी ऑटो रिक्षांची सोय आहे. राहण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास कार्ला हे सुसज्ज आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची मान्यताप्राप्त निवास व न्याहरी योजना व महाभ्रमण अंतर्गत देखील निवासाची सोय परिसरात आहे.

-पर्यटनस्थळे-
कात्रज सर्पोद्यान
वैशिष्ट्ये- नावाप्रमाणेच या उद्यानामध्ये साप, सरपटणारे प्राणी, पक्षी, कासवे यांचा संग्रह आहे. येथे सापाच्या 160 प्रजाती आहेत. निलमकुमार खैरे यांनी सन 1986 मध्ये या उद्यानाची स्थापना केली. त्यानंतर हे उद्यान सन 1999 मध्ये राजीव गांधी उद्यानामध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यात आता प्राणीसंग्रहालयाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. हे उद्यान पुण्यापासून 8 कि.मी. अंतरावर पुणे-सातारा रोडवर भारती विद्यापीठाजवळ आहे. सकाळी 10.30 ते संध्याकाळी 6.00 पर्यंत चालू असते व बुधवारी सुट्टी असते.

उपलब्ध सोयी- कात्रज सर्पोद्यान हे मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
संपर्क- 020-24367712

राजा दिनकर केळकर संग्रहालयवैशिष्ट्ये- डॉ. दिनकर केळकर यांनी 1920 साली प्रदर्शन भरविण्यास सुरूवात केली. 1960 पर्यंत त्यांनी एकामागून एक विविध प्रकारचे आकर्षक असे 15 हजार संग्रह जमा केले. त्यांनी हे त्यांचे संग्रह मित्र, पर्यटक, परदेशी पर्यटक यांच्यासमोर दाखविले. अशा प्रकारे त्यांनी खाजगी संस्था, सरकारी संस्था यांची मने जिंकून घेतली. त्यामुळे सरकारी संस्था यांनी मोठ्या स्तरावर प्रदर्शन भरविण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यास व मदत करण्यास तयार झाले. त्याचप्रमाणे या संग्रहालयाची ख्याती वाढविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. 1962 नंतर डॉ.केळकर यांनी हे संग्रहालय पुढील देखभालीसाठी पुरातत्व खात्याकडे वर्ग केले.

उपलब्ध सोयी- राजा दिनकर केळकर संग्रहालय हे मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
संपर्क- 020-24482101/24474466
संकेतस्थळ- rajakelkarmuseum.com

अप्पू घरवैशिष्ट्ये- अप्पू घर हे निगडीपासून दोन कि.मी. व पुणे शहरापासून 22 कि.मी. अंतरावर आहे. हे दिल्लीच्या अप्पू घरासारखेच आहे. तेथे असलेले असंख्य खेळ, गंमती व बागडण्यासाठी पर्यटक आतुरतेने वाट पहात असतात. अप्पू घरात वॉटरपार्कची सोय आहे. असंख्य खेळांमध्ये लहान मुले रमून जातात तर तेथे असणारे सुंदर थंडगार तळे, दुर्गामातेचे मंदिर व फिरण्याकरिता मोठ्या टेकड्या सर्व पिढीतील लोकांना आकर्षित करतात.

उपलब्ध सोयी- अप्पू घर हे पुण्यापासून जवळच निगडी या परिसरात असल्यामुळे सर्व सोयी उपलब्ध आहेत.
संपर्क- 9850841414/9890886666
संकेतस्थळwww.appugharpune.com/
-धार्मिक स्थळे-
भीमाशंकर
वैशिष्ट्ये- भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम झाला आहे. हे पुणे शहरापासून 125 कि.मी. अंतरावर खेड तालुक्याजवळ आहे. महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. नाना फडणवीसांनी याठिकाणी शंकराचे मंदिर बांधले होते. भीमाशंकरच्या जवळच मनमाडच्या टेकड्या आहेत. या टेकड्यांवर भुतींग, अंबा-अंबिका व भीमाशंकर यांच्या कोरीव लेण्या आहेत. मान्सून आणि थंडीच्या दिवसात भीमाशंकरच्या सौंदर्यात अधिक भर पडते. भीमाशंकर हे राखीव जंगल आहे आणि तेथे जंगली प्राण्यांचे अभयारण्य आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी, झाडे व फुले पहायला मिळतात.

उपलब्ध सोयी- भीमाशंकर येथे जाण्यासाठी घोडेगाव, ता. आंबेगाव येथून जावे लागते. भीमाशंकरला जाण्यासाठी स्वारगेट व पुणे स्टेशन येथून एसटी बसेसची सुविधा आहे. येथे छोटे हॉटेल व फुलांची दुकाने आहेत. तसेच राहण्यासाठी वनविभागाचे गेस्ट हाउस व खाजगी हॉटेल आहेत.
संपर्क - 9405162974 (योगेश गावंडे)

कार्ला एकविरा देवीवैशिष्ट्ये- कार्ले येथील बौद्ध लेणे व तेथील विहार यांच्या व्यवस्थेसाठी दिलेली वर्षासने-दान जमिनी यावर बरेच वाद गुप्त कालोत्तर काळात झाले. परंतु आपापसात हे वाद चर्चा करुन मिटविण्यात आले. त्यामुळे यांची स्मृति म्हणून येथे ऐक्या विहार स्मृतिस्तभांची निर्मिती झाली. याच स्मृतिस्तंभाला एकविरा म्हणू लागले.

उपलब्ध सोयी- पुण्याहून येथे जाण्यासाठी पुणे-लोणावळा लोकलची सोय आहे. लोणावळ्यापासून अवघ्या 12 कि.मी. अंतरावर किंवा मळवली स्टेशनापासून नऊ कि.मी. अंतरावर एकविरा देवीचे मंदीर आहे. पुणे-मुंबई महामार्ग असल्यामुळे जेवणाची उत्तम सोय आहे. राहण्यासाठी काही अंतरावरच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास कार्ला हे सुसज्ज आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची मान्यताप्राप्त निवास व न्याहरी योजना व महाभ्रमण अंतर्गत देखील निवासाची सोय परिसरात आहे.

संकलन: जिल्हा माहिती कार्यालय, पुणे.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India