माणसाच्या जीवनातील धावपळ जसजसी वाढत जाईल, तसतसे ताणतणावाला फाटे देवून चैतन्याच्या वाटाही शोधण्याची वृत्ती वाढली आहे. त्यामुळे विविध निमित्तांनी, उद्देशाने, मार्गाने पर्यटनाचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी केवळ धार्मिक उद्देशाने होणाऱ्या पर्यटनाचे स्वरुप आज नक्कीच बदलले आहे. निखळ आनंद, मौजमजा यापासून अगदी सामाजिक विषयावरील जनजागृतीपर्यंतच्या साऱ्या उद्देशांना पर्यटन या विषयाने स्वत:मध्ये सामावून घेतले आहे. धार्मिक, सामाजिक, गडकिल्ले पाहणी असो, वन्यजीवांना विविध वनस्पतींना भेटणे असो, पर्यटनाच्या साऱ्या वाटा, सारे रस्ते आपसूकच कोल्हापुरला आल्याशिवाय राहत नाहीत हेच खरं... आणि एकदा कोल्हापूरात आलं म्हटलं की, कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरची भेळ, कोल्हापुरी साज, करकरीत वाजणारी कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी गुळाचा गोडवा, कोल्हापूरची चंदेरीनगरी, हुपरी येथील चांदीचे कलाकुसरीचे दागिने, कोल्हापुरी फेटा या साऱ्या गोष्टींबरोबरच ‘या पाव्हणं’ असं म्हणणारी कोल्हापुरी माणसं आहेतच आपल्या स्वागताला ...तर आपण आज जाणून घेऊयात कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाविषयी...
दक्षिण काशी...महालक्ष्मी
रंक असो वा राव साऱ्यांचे हात निस्सीम भक्तीनं जिथं जोडले जातात ती सर्व महाराष्ट्रासाठी आराध्य दैवतं असणारी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी. हेमाडपंथी वास्तूरचनेचे काळ्या दगडातील हे कोरीव मंदीर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे वैभव आहे. सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते. नगारखाना, प्रवेशद्वारे, दरवाजावरील घंटा, दगडी चौथरे आणि त्यावरील कोरीव काम ही प्रेक्षणीय आहेत. याठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्रातील रोषणाई या मुळातच अप्रतिम सुंदर असणाऱ्या मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलविते. किरणोत्सव हे या मंदिराचे वैशिष्ट्य मानले जाते. जुना राजवाडा आणि भवानी मंडप हे याठिकाणचे आकर्षण आहे.
कोल्हापूर एस. टी. स्टँडपासून केवळ दोन कि.मी. अंतर आहे. बस, रिक्षा, आदि सर्व माध्यमातून या ठिकाणी पोहोचता येते.
दख्खनचा राजा ज्योतिबा
दख्खनचा राजा असा लौकिक असणारे सर्व महाराष्ट्राचे श्रद्धास्थान म्हणजे ज्योतिबा. लगतच्या अन्य राज्यांमधूनही भाविक याठिकाणी येतात. वाडी रत्नागिरी येथे हे हेमाडपंथी मंदिर काळ्या दगडात असून केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंग या तीन मंदिरांचा समूह आहे. ज्योतिबाला घातले जाणारे खेटे हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. ज्योतिबाच्या सासन काठ्या प्रसिद्ध आहेत. ज्योतिबावर 12 ज्योतिर्लिंगांची मंदिरे आहेत. पहाटे 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत मंदिर खुले असते. यात्रेच्यावेळी कित्येक टन गुलाल, खोबरे उधळले जाते. जवळच यमाई मंदिर आहे. यात्रेत ज्योतिबाची पालखी यमाई मंदिरास भेट देते.
कसे जाल- कोल्हापूरपासूनचे अंतर 20 कि. मी.चे आहे. त्यासाठी सुमारे 40 मिनिटे लागतात. बसस्थानकापासून एस. टी. महामंडळाच्या बसेस अथवा खाजगी वाहने उपलब्ध आहेत.
न्यू पॅलेस म्युझियम
कोल्हापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी न्यू पॅलेस दिमाखात उभा आहे. काळ्या कातीव दगडांनी बांधलेली ही वास्तू कोल्हापुरचे वैभव आहे. येथील छत्रपती शहाजी म्युझियम हे खास आकर्षण आहे. राजघराण्यातील वापरातील वस्तू, शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे, युद्धात वापरली जाणारी शस्त्रे, शिकार केलेले प्राणी, दुर्मिळ पत्रव्यवहार, राजप्रासाद घड्याळाचा मनोरा हे या वास्तूचे वैशिष्ट्य आहे.
मध्यवर्ती बसस्थानकापासून 3 मि.मी. अंतरावर हे ठिकाण असून बससह सर्व प्रकारच्या वाहनांची सुविधा उपलब्ध आहे.
टाऊन हॉल म्युझियम
कोल्हापूर शहरात नवगॉथिक वास्तूकलेचा उत्कृष्ठ नमुना असलेले टाऊन हॉल हे वस्तूसंग्रहालय असून याठिकाणी सातवाहनकालिन अनेक वस्तू आहेत. ग्रीक देवता, योद्धे, जुनी शस्त्रास्त्रे, दुर्मिळ शिल्पाकृती, चंदन आणि हस्तीदंताच्या कोरीव कलाकृती येथे पाहता येतात. बोटॅनिकल गार्डन, अनेक दुर्मिळ वृक्ष येथे आहेत.
बसस्थानकापासून 2 कि.मी. व 15 मिनिटांच्या अंतरावर असून बससह सर्व प्रकारच्या वाहनांची सुविधा उपलब्ध आहे.
रंकाळा तलाव
कोल्हापूरच्या प्रेक्षणीय स्थळांपैकी एक असलेले रंकाळा तलाव. याच्या मध्यभागी रंगभैरवाचे मंदिर आहे. तलावाच्या एका बाजूला संध्यामठाचे शिल्प आहे. पश्चिमेस शालिनी पॅलेस आहे. ही वास्तू शिल्पकलेचा अद्वितीय नमूना आहे.
कोल्हापूर बसस्थानकापासून 3 कि.मी. व 15 मिनिटांच्या अंतरावर. याठिकाणी बस व रिक्षानेही जाता येते.
खासबाग मैदान
कुस्ती म्हटले की कोल्हापूर ही संज्ञाच ठरलेली. खासबाग मैदान म्हणजे देशोदेशीच्या मल्लांच्या शिक्षणाचे माहेरघर, राजर्षि शाहू महाराजांनी दिलेली अनमोल भेट. 20 ते 30 हजार लोक कुस्ती पाहू शकतील इतके प्रशस्त मैदान. कुस्ती परंपरेत अजूनही या मैदानाला मानाचे स्थान आहे.
कोल्हापूर बसस्थानकापासून 2 कि.मी. व 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. बसेसच्या सुविधा आहेत. रिक्षानेही जाता येते.

राजर्षि शाहू जन्मस्थळ- लक्ष्मीविलास पॅलेस
द्रष्टा राजा म्हणून ज्या राजाकडे पाहिजे जाते ते राजर्षि शाहू महाराज यांचे जन्मस्थळ लक्ष्मीविलास पॅलेस, आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून शासन विकसित करीत आहे. शाहूकालिन कागदपत्रे, आरक्षणाचा जाहीरनामा, महाराजांच्या वापरातील वस्तू याठिकाणी आहेत.
कोल्हापूर बसस्थानकापासून 3 कि.मी. व 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. बस व रिक्षानेही जाता येते.
कणेरी येथील सिद्धगिरी मठ
करवीर तालुक्यात कणेरी येथील सिद्धगिरी मठ हे धार्मिक तसेच पर्यटन केंद्र आहे. ग्रामजीवन समृद्धी, शिल्पे पाहण्यासाठी पर्यटकांची याठिकाणी गर्दी असते. उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा असणारे हॉस्पिटल येथे आहे. प्राचिन विद्वानांची शिल्पे आहेत.
कोल्हापूर बसस्थानकातून 15 कि.मी. व 40 मिनिटांच्या अंतरावर हे ठिकाण आहे. कोल्हापूर बसस्थानकापासून एस. टी. ची सुविधा आहे. तसेच बस व अन्य खाजगी वाहनांचीही सोय आहे.
दत्ताची वाडी अर्थात नृसिंहवाडी
शिरोळ तालुक्यात कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर श्री दत्ताचे 500 ते 800 वर्षांची परंपरा असलेले पुरातन व प्रशस्त देवस्थान आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो भाविकांची याठिकाणी उपस्थिती असते. श्री नृसिंह सरस्वती यांचे याठिकाणी 13 व्या शतकाच्या उत्तरार्धात वास्तव्य होते. त्यांना दत्ताचा अवतार मानले जाते. देशभरातून भाविक दत्त पादुकांच्या दर्शनासाठी येतात. याठिकाणी मंदिराच्या पायऱ्या नदीपात्रापर्यंत आहेत.
कोल्हापूरपासून 55 ते 60 कि. मी. अंतर असून तेथपर्यंत जाण्यासाठी 1.30 ते 2 तास असा कालावधी लागतो. नजिकच्या शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड याठिकाणी राहण्याची व जेवणाची स्वस्त दरात सोय होऊ शकते. याठिकाणी कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली, मिरज आदी स्थानकांपासून बसची सुविधा उपलब्ध आहे.
जैन धर्मियांचे पवित्र स्थळ श्री क्षेत्र बाहुबली
पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे जैन तीर्थक्षेत्र म्हणून याचा उल्लेख केला जातो. गुरुकुल पद्धतीचे शिक्षण ही या ठिकाणाने दिलेली देणगी आहे. कमालीची स्वच्छता व निसर्ग सौंदर्य आणि भगवान श्री बाहुबलींची 28 फुटी संगमरवरी देखणी आणि भव्य मूर्ती हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. सभोवताली 24 तीर्थकरांची लहान-लहान मंदिरे आहेत. दर बारा वर्षांनी याठिकाणी महामस्तकाभिषेक होतो. या ठिकाणी दुर्गामातेचे पठार व त्यावर दुर्गामातेचे पुरातन मंदिर आहे.
जवळच नव्याने बांधण्यात आलेले जहाज मंदिर असून म्हैसूरच्या वृंदावन गार्डनच्या धर्तीवर संग्रहालय, कारंजे, रंगसंगतीचा नाविन्यपूर्ण अविष्कार, उद्यान, धबधबे यामुळे येथे मोठ्या प्रमाणात लोक पर्यटनासाठी येतात. श्री आदिश्वर स्वामींची विशाल प्रतिमा परिवारासह आहे. श्री क्षेत्र बाहुबली हे आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिकदृष्ट्याही महत्वाचा परिसर आहे.
कोल्हापूरपासून 27 कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. सुमारे एक तास लागतो. कोल्हापूर, हातकणंगले स्थानकापासून बसच्या सुविधा आहेत. रिक्षानेही जाता येते.
रामलिंग, धुळोबा मंदिर, अल्लमप्रभुहातकणंगले तालुक्यात आळते परिसरात डोंगरावर रामलिंग, धुळोबा ही देवस्थाने आहेत. रामलिंग मंदिर ही एक कोरीव गुंफा आहे. हे फार पुरातन देवस्थान आहे. आतील बाजूस शिवलिंग व गणपती मुर्ती आहेत. त्यांच्यावर सतत पाण्याची धार असल्याने याठिकाणी छोटे पाणी तळे तयार झाले आहे. बाहेरील बाजूस हेमाडपंथी शिल्प आहे. कन्नड भाषेतील शिलालेख आहेत. थोड्या अंतरावर धुळोबा देवस्थान आहे. हे अतिशय पुरातन देवस्थान आहे. याच परिसरात डोंगरमाथ्यावर अल्लमप्रभू हे लिंगायत समाजाचे देवस्थान आहे. येथे मध्ययुगीन बांधणीचे अल्लमप्रभूंचे मंदिर आहे.
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिरशिरोळ तालुक्यात कर्नाटक-महाराष्ट्र सिमेवर कृष्णा नदीच्या काठी खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर आहे. प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्य शैलीचे हे मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर बारा राशींचे बारा खांब आहेत. अत्यंत कोरीव नक्षीदार खांब, हत्ती, रामायण, महाभारतातील प्रसंग, राशिचिन्हे, प्राणी यांची कलाकुसर मंदिरावर आहे. प्रत्येक कोरीव काम वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मंदिराला भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
कोल्हापूरपासून 70 कि. मी. अंतरावर हे ठिकाण अडीच तासाच्या अंतरावर आहे. कोल्हापूर, मिरज, सांगली स्थानकातून बससह अन्य खाजगी वाहनांचीही सोय आहे. नृसिंहवाडी, कुरुंदवाड जयसिंगपूर याठिकाणी हॉटेल सुविधा आहे.
श्रीक्षेत्र आदमापूर- संत बाळूमामाप्रति पंढरपूर म्हणून हे क्षेत्र ओळखले जाते. संत बाळूमामा यांची समाधी, सुरेख कोरीव दगडी महाद्वार त्यावर विविध शिल्पाकृती याठिकाणी साकारलेल्या आढळतात. मंदिरात अन्नछत्र आहे.
कोल्हापूरपासून 70 कि. मी. अंतरावर हे ठिकाण दोन तासाच्या अंतरावर आहे. कोल्हापूर, मिरज, सांगली, कोल्हापूर-गारगोटी, निपाणी, राधानगरी येथील बसस्थानकातून एस. टी. बसची सुविधा आहे. एस. टी.सह अन्य खाजगी वाहनांचीही सोय आहे. कोल्हापूर- आदमापूर मार्गावर विविध ठिकाणी हॉटेल्स आहेत.
पन्हाळगडछत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहारच्या वेढ्यातून विशाळगडावर सुरक्षित पोहोचण्याच्या आणीबाणीप्रसंगी बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशिद यांनी पन्हाळगडावर सैन्याला थोपवून धरले तो पन्हाळगड, कोल्हापूरची पहिली राजधानी म्हणून ओळखला जातो. पुसाटी बुरुज, तबक उद्यान, नायकिनीचा सज्जा, तीन दरवाजा, धान्य कोठार, अंबरखाना, धर्मकोठी, हिरकणी बुरूज, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय तसेच येथून जवळच मसाई पठारावर बौद्धकालीन गुहा व लेणी पहावयास मिळतात. पांडव झरा येथे असून बारमाही पाणी असते. बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा आणि वीर शिवा काशिद यांची समाधी याठिकाणी आहे.
कोल्हापूर एस. टी. स्थानकातून हे ठिकाण 20 कि.मी. व 40 मिनिटांच्या अंतरावर असून कोल्हापूर बस स्थानकापासून एस. टी. ची सुविधा आहे. अन्य खाजगी वाहनांचीही सोय आहे.
खेळणा-विशाळगडमूळ खेळणा असे नाव असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्याला विशाळगड असे नाव दिले. शाहूवाडी तालुक्यात हा किल्ला आहे. गडाच्या चोहोबाजूने मोठे खंदक आहेत. गडावर चार दरवाजा, तळे, वृंदावने, टकमक कडा, रामचंद्र निळकंठ यांचा जुना राजवाडा, हजरत रेहान मलिक दर्गाह, पाताळनगरी आदि ठिकाणे प्रेक्षणीय आहेत.
कोल्हापूर एस. टी. स्थानकातून 80 कि.मी. व दोन तासाच्या अंतरावर असून कोल्हापूर बसस्थानकापासून एस. टी. ची सुविधा आहे. अन्य खाजगी वाहनांचीही सोय आहे.
पारगड किल्लानिसर्गाची उधळण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेम लाभलेला पारगड किल्ला चंदगड ते तिलारी मार्गावर आहे. चिरेबंदी पायऱ्या, डोंगरदऱ्या, हिरवीगर्द झाडी, निरव शांतता हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र शासनाने या किल्ल्याच्या विकासाची घोषणा केली आहे.
कोल्हापूर बसस्थानकातून 90 कि.मी. व अडीच तासाच्या अंतरावर हे ठिकाण असून एस. टी.सह अन्य खाजगी वाहनांचीही सोय आहे.
दाजीपूर अभयारण्य, राधानगरी/काळम्मावाडी धरणराधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य मुख्यत: गव्यासाठी प्रसिद्ध आहे. हरिण, सांबर, चितळ, बिबट्या, अस्वले, साळींदर, कोल्हा, निलगाय विविध जातींचे साप यासह हा परिसर ओतप्रोत भरलेला आहे. याठिकाणी तंबू निवासाची, भोजन व निवासाची वन विभागातर्फे सोय आहे.
भोगावती नदीवर राजर्षि शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी बांधलेले हे धरण. हे धरण पूर्ण भरल्यावर स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडतात. हे दृष्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात. या धरणाशेजारीच काळम्मावाडी धरण आहे. येथे म्हैसूरच्या वृंदावन गार्डनसारखे गार्डन विकसित करण्यात आले आहे. याठिकाणी जंगल भ्रमंतीलाही वाव आहे.
कोल्हापूर एस. टी. स्थानकातून 75 ते 80 कि.मी. व दोन तासाच्या अंतरावर हे ठिकाण आहे. कोल्हापूर बसस्थानकापासून तसेच रंकाळा बसस्थानकापासून एस. टी. ची सुविधा आहे. अन्य खाजगी वाहनांचीही सोय आहे.
थंड हवेचे ठिकाण-आंबाशाहूवाडी तालुक्यातील आंबा हे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. आंबा घाट, जंगल, जैव विविधता, औषधी वनस्पती, अधिक पावसाचा भाग, झरे, धबधबे, प्रसन्न वातावरण हे या ठिकाणचे वैशिष्ट्य. हा परिसर सर्व ऋतुत पर्यटकांना खुणावतो.
कोल्हापूर एस. टी. स्थानकातून 70 कि.मी. व दीड तासाच्या अंतरावर हे ठिकाण असून कोल्हापूर बसस्थानकापासून एस. टी. ची सुविधा आहे. अन्य खाजगी वाहनांचीही सोय आहे.
रामतीर्थ धबधबाआजरा तालुक्यात हिरण्यकेशी नदीवर रामतीर्थ धबधबा प्रसिद्ध आहे. याठिकाणी विविध छोटी-छोटी मंदिरे आहेत. पावसाळ्यात निसर्गाचा अविष्कार येथे पहावयास मिळतो.
कोल्हापूर एस. टी. स्थानकातून 85 कि.मी. व अडीच तासाच्या अंतरावर हे ठिकाण असून कोल्हापूर बसस्थानकापासून एस. टी. ची सुविधा आहे. अन्य खाजगी वाहनांचीही सोय आहे.
धार्मिक असो, ऐतिहासिक असो, दूर्ग पर्यटन असो वा जंगलसफारी असो निमित्त कोणते का असेना. चला तर मग तयारी करुया लयभारी कोल्हापूरला निघण्याची !
-वर्षा पाटोळे,
जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर.
0 comments:
Post a Comment